सुप्रीम कोर्टाने जंतर मंतरवरील आंदोलनातील हिंसेचा तपास सुरू ठेवण्याचे आदेश...
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
सुप्रीम कोर्टाने जंतर मंतरवरील आंदोलनातील हिंसेचा तपास सुरू ठेवण्याचे आदेश देत स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची गरज व्यक्त केली, पण CJP ने ही ऑर्डर मान्य नसल्याचे सांगून उद्धटपणा दाखवला. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नाकारणे म्हणजे अराजक निर्माण करण्याचा प्रयत्नच. त्यांचे प्रवक्ते सौरव दास यांनी CNN TV18 वर दिलेल्या मुलाखतीत आंदोलनाच्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिसांनी येऊ दिले असा प्रश्न उपस्थित केला, पण आयोजक म्हणून जबाबदारी टाळून ती पोलिसांवर ढकलण्याचा हा अंगचोरपणा आहे. अशा प्रवृत्तीचे लोक तरुण वर्गाचे प्रतिनिधी म्हणून हाताळण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांचा मग्रूर स्वभाव आणि अराजकवादी वृत्ती देशासाठी धोकादायक आहे, आणि म्हणूनच त्यांना “kid gloves” वापरून नव्हे तर कठोरपणेच हाताळले पाहिजे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या दोन जणांना फाशी देण्यात आली ही बातमी पाहून भारतातील तथाकथित आंदोलनवीर तरुण-तरुणींनी आपण लोकशाहीत किती सुखी आहोत ते पाहिले पाहिजे. जंतरमंतरवर कॉक्रोच जन्ता पार्टीच्या आंदोलनात अश्लील बोर्ड्स फिरवणे, ओंगळ हावभाव करून नाचणे, मोदींना घाणेरड्या शिव्या देणे हे करून घरी परतलेले अनेक तरुण आता समाजात ठिकाणावर आणले जात आहेत. कुणाला घरातून हाकलले गेले, कुणाला शेजाऱ्यांनी धडा शिकवला. त्यांचे व्हिडिओज् समाज माध्यमांवर झळकत आहेत आणि त्यांच्याबद्दल दया कुणालाच येत नाही. उलट खरी Gen Z तीच मानली जाते जी देशाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे. त्यामुळे पुढे जर दिपके-दास-रांका यांनी पुन्हा आंदोलनाचा खेळ मांडला तरी बहकलेले तरुणही त्यांच्यासोबत उभे राहणार नाहीत, कारण आधीच बेकार झालेल्यांचा धसका सर्वांनी घेतलेला आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
लोकसभेत शिक्षण सुधारणा विधेयकावर चर्चा होत असताना काँग्रेसकडे बोलण्यासारखे काही नव्हते, म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी वैयक्तिक स्तरावर जाऊन घाणेरड्या टिप्पणी केल्या. राहुल गांधींनी शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींना “फिल्दी पर्सन” म्हटले तर प्रियंका वाड्रांनी IIT चेन्नई प्रमुख व पद्मश्री सन्मानित व्ही. कामकोटी यांना “गोमूत्र एक्सपर्ट” असा अपमानास्पद उल्लेख केला. हे गांधी कुटुंब—आई आणि तिची दोन मुले—संस्कारहीन, स्वार्थी आणि देशद्रोही असल्यामुळे काँग्रेसचे पतन अपरिहार्य झाले आहे. सर्जनशीलतेचा अभाव, वैयक्तिक हल्ले आणि स्वार्थी राजकारण यामुळे काँग्रेसची प्रतिमा अधिकच खालावली आहे. लोकशाहीत विचारांची ताकद महत्त्वाची असते, पण काँग्रेसकडे तीच नाही, म्हणूनच त्यांचे नेतृत्व सतत हास्यास्पद ठरते.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व हे महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत लोकप्रिय आहेत आणि त्यांना सर्वपक्षीय स्वीकार मिळतो. आयुष्यभर केलेल्या संघर्षातून त्यांच्यातील कार्यकर्ता ते नेता असा प्रवास घडला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांशी जोडलेले नाते , वैयक्तिक दुःखातून आलेली संवेदनशीलता आणि निर्णयक्षमता यामुळे ते वेगळे ठरतात. मुख्यमंत्री असोत वा उपमुख्यमंत्री, ते कार्यकर्त्याला नावाने ओळखतात, त्याचे म्हणणे ऐकतात आणि मदत करतात. त्यांच्या उपलब्धतेमुळे आणि अहंकाराच्या अभावामुळे विरोधकही त्यांच्याशी सहज संवाद साधतात. मोदी-शाह यांचा विश्वास, प्रशासनातील निर्णयक्षमतेची प्रतिमा आणि कार्यकर्त्यांशी जपलेला आपलेपणा हे त्यांच्या नेतृत्वाचे आधारस्तंभ आहेत. म्हणूनच एकनाथ शिंदे हे पद असल्यामुळे नेते म्हणवले जात नसून ते कार्यकर्त्यांमधून घडलेले आणि कार्यकर्त्यांमध्येच राहिलेले नेते आहेत.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
दिल्लीमध्ये राहुल गांधी झुरळ जन्ता पार्टीला पाठिंबा देतात, तर केरळमध्ये त्यांच्या निवडलेल्या मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांच्या सरकारकडून झुरळ पार्टीला पाठिंबा देणाऱ्या मोर्चांत सहभागी झालेल्यांवर पोलिस केसेस दाखल होतात यातून स्पष्ट होते की संसदेत बडबड करणे वेगळे आणि सत्तेत बसून कारभार चालवणे वेगळे. ग्रामपंचायतीचा अनुभव नसलेल्या राहुल गांधींना पंतप्रधानपदासाठी लोकांचा पाठिंबा मिळतो हेच आश्चर्यकारक आहे. कारण विचारले तर समर्थकांकडे ठोस उत्तर नसते. विचारशून्य नागरिक मतदानाचा हक्क वापरतात, पण त्यांचा आधार काय हेच कळत नाही. अशा लोकांना सहन करणे हीच खरी मजबुरी आहे, कारण मतदानाचा हक्क काढून घेणे शक्य नाही. स्वतंत्र विचार करणाऱ्यांसाठी ही एक कटू वास्तवता आहे.
🔽









Comments