top of page
Search


A new 0.4% fee on merchant UPI transfers above ₹2,000...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* A new 0.4% fee on merchant UPI transfers above ₹2,000, scheduled from October 15, has triggered concern among retailers, who warn that some small merchants could return to cash to avoid additional transaction costs. The policy question is not whether payment infrastructure should be free forever—banks and payment providers incur genuine costs—but how those costs should be distributed without weakening one of India’s most successful digital


गणेशोत्सवाच्या दिवशी पुण्यात सरसकट दारूबंदी करण्याचा प्रशासनाचा निर्णय...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* गणेशोत्सवाच्या दिवशी पुण्यात सरसकट दारूबंदी करण्याचा प्रशासनाचा निर्णय अखेर उच्च न्यायालयाच्या प्रश्नांनंतर मागे घ्यावा लागला. मुद्दा दारूचे समर्थन किंवा विरोधाचा नाही; मुद्दा शासनाच्या अधिकारांच्या मर्यादेचा आहे. कायदा-सुव्यवस्थेचा ठोस धोका असेल तर विशिष्ट परिसरात निर्बंध लावणे समजू शकते. पण धार्मिक उत्सव आहे म्हणून संपूर्ण शहरातील प्रौढ नागरिकांनी काय खावे-प्यावे हे सरकार ठरवणार असेल, तर उद्या प्रत्येक सणाला वेगळे सरकारी आचारनियम तयार होतील. विशेष


राजकीय मतभेद बाजूला ठेवून एखाद्या नेत्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची वस्तुनिष्ठता...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राजकीय मतभेद बाजूला ठेवून एखाद्या नेत्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची वस्तुनिष्ठता आपल्याकडे असली पाहिजे. दहीहंडीच्या बाबतीत जितेंद्र आव्हाड यांचे योगदान असेच निर्विवादपणे दखल घेण्यासारखे आहे. स्थानिक धार्मिक-सांस्कृतिक परंपरेच्या चौकटीत असलेल्या दहीहंडीला त्यांनी भव्य मंच, मोठी बक्षिसे, सेलिब्रिटी, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्पर्धात्मक स्वरूप देऊन आधुनिक ‘मेगा इव्हेंट’मध्ये रूपांतरित केले. त्यांच्या ‘संघर्ष दहीहंडी’ने गोविंदा पथकांना प


हायवेवरील दरोडेखोरांपासून सावध! समृद्धी महामार्गावरील दरोडेखोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* हायवेवरील दरोडेखोरांपासून सावध! समृद्धी महामार्गावरील दरोडेखोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रोड सेफ्टी तज्ज्ञांनी दिलेला एक इशारा प्रत्येक प्रवाशाने गांभीर्याने घ्यायला हवा. दरोडेखोर म्हणजे अचानक रस्ता अडवून लुटणारी टोळी एवढेच चित्र आता डोक्यातून काढावे लागेल. अशा टोळ्यांचे सदस्य ढाबे, हॉटेल किंवा विश्रांतीस्थळांवर सामान्य ग्राहकांसारखे बसून रेकी करू शकतात. आपल्या फोनवरील गप्पांमधून जमीन व्यवहार, रोख रक्कम, दागिन्यांची खरेदी, प्रवासाचे ठिकाण किंवा आर


मुंबईच्या विकासात सामान्य माणूस कुठे आहे?...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मुंबईच्या विकासात सामान्य माणूस कुठे आहे? मुंबईच्या कोस्टल रोडवर हजारो कोटी खर्च होतात; पण रोज लोकलच्या दरवाजात जीव मुठीत धरून लटकणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अजूनही स्वप्नच आहे. विकासाच्या प्राधान्यक्रमात सामान्य मुंबईकर नेमका कुठे आहे? मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि दरवर्षी रेल्वे अपघातांत अनेक जीव जातात. नवीन लोकल गाड्या येणार असल्या तरी त्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोस्ट


पुण्याच्या गणेशोत्सवातील डीजेच्या प्रश्नाला भारत-पाकिस्तान किंवा हिंदू-मुस्लिम...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* पुण्याच्या गणेशोत्सवातील डीजेच्या प्रश्नाला भारत-पाकिस्तान किंवा हिंदू-मुस्लिम वादाचे स्वरूप देण्याची अजिबात गरज नाही. प्रश्न अत्यंत सरळ आहे—ध्वनीप्रदूषण कोण करत आहे यापेक्षा ध्वनीप्रदूषण होत आहे का, हे महत्त्वाचे. गणेशोत्सव असो, ईद असो, राजकीय मिरवणूक असो किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम; कायद्याने ठरवून दिलेली डेसिबल मर्यादा सर्वांना समान असली पाहिजे. ईदच्या मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणी किंवा नियमबाह्य डीजे वाजले असतील तर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ढो


India may take pride in its military victories over Pakistan...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* India may take pride in its military victories over Pakistan, but one uncomfortable question has survived governments of every political colour: why has every confrontation ultimately left the fundamental security problem unresolved? From conventional wars to decades of cross-border terrorism, India has repeatedly demonstrated military superiority, yet Pakistan-based militant networks have repeatedly regenerated and struck again. Congress


नितिन गडकरी कितीही छाती ठोकून सांगत असले की माझे अधिकारी उत्कृष्ट काम करतात...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नितिन गडकरी कितीही छाती ठोकून सांगत असले की माझे अधिकारी उत्कृष्ट काम करतात , परंतु त्यांच्या कामाचे बिंग एका पावसाळ्यात उघड पडते आहे. निपाणीजवळ (कर्नाटक) पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (NH-48) बांधकामाधीन असलेला १२ मीटरचा आरई (RE) भिंतीचा भाग कोसळल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये प्रकल्प संचालक, पूल अभियंता आणि निवासी अभियंता यांचा समावेश असून कंत्राटदार व संबंधित अभियंत्याला कारणे दाखवा नोट


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशभरात पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशभरात पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल, एलएनजी (LNG) आणि हायड्रोजनचा आक्रमक प्रचार करत आहेत; मात्र वरकरणी 'ऊर्जा आत्मनिर्भरता' आणि 'शेतकरी कल्याणाचे' वाटणारे हे धोरण आता कौटुंबिक व्यावसायिक गणितांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सार्वजनिक नोंदींनुसार, गडकरींच्या पुत्रांच्या कंपन्या (उदा. मानस ग्रुप, सियान ॲग्रो) इथेनॉल निर्मिती आणि इंधन पंपांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत, तसेच आयुर्वेदिक क्षेत्रातील


महाराष्ट्रातील रस्ते आणि महाराष्ट्रातली स्वच्छता या दोन्हीचा दर्जा ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील रस्ते आणि महाराष्ट्रातली स्वच्छता या दोन्हीचा दर्जा अत्यंत खलवलेला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळमधील अंतर्गत रस्ते महाराष्ट्रातील टोलमुक्त रस्त्यांपेक्षा कैक पटीने सरस आहेत, तर तामिळनाडूमध्ये खड्डे नगण्य आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात टोल नाक्यांचा सुळसुळाट अधिक आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये रस्ते कंत्राटांमधील कथित टक्केवारी आणि लाचखोरीचे प्रमाण कमी असल्याने तिथल्या कामांचा दर्जा टिकून राहतो. महाराष्ट्रात महामार्ग


नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे – निकृष्ट दर्जाचं काम आणि पाण्याचा अयोग्य निचरा. रॅम्पसाठी वापरल्या जाणाऱ्या MSE/RE वॉल रचनेत पावसाचं पाणी बाहेर जाण्यासाठी ‘वीप होल्स’ आणि फिल्टर मीडिया असणं गरजेचं असतं. पण या पुलात नाही तर एकंदरच सगळ्याच सरकारी प्रकल्पांमध्ये हे नीट बसवलं जात नाही किंवा ते बांधकामादरम्यान ब्लॉक होतं. परिणामी पाणी भिंतीवर अतिरिक्त दाब निर्माण करते आणि मग भिंत कोसळते. शिवाय, योग्य मुरमाऐवजी चिकणमाती वापरली जात


केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मंत्रालयात एकाच वेळी ४ अत्यंत खास...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मंत्रालयात एकाच वेळी ४ अत्यंत खास आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. एपीएस सिद्धार्थ यादव, खाजगी सचिव अमर सिंह आणि अतिरिक्त खाजगी सचिव आयुष शरण व शैलेश कुमार सिंह यांच्या हकालपट्टीची थेट माहिती पंतप्रधान कार्यालयाला (PMO) देण्यात आली आहे. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या इतिहासात अशी धडक कारवाई कधीच झाली नव्हती. राजस्थानच्या सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील अवैध खाणकामाच्या कथित मंजुरीचे


A light-hearted anecdote shared by Sergio Gor involving U.S. President Donald Trump...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* A light-hearted anecdote shared by Sergio Gor involving U.S. President Donald Trump and Indian Prime Minister Narendra Modi has captured global social media attention. During an informal moment, Trump suddenly suggested calling Modi, prompting Gor to point out that it was 6:00 AM in India. Trump wittily replied, "Modi will be awake. He's like me—he doesn't sleep," highlighting Modi's well-known reputation for a demanding work schedule and


बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला. सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलांच्या वयात ५ वर्षांचे अंतर ठेवायला सांगते, पण आमीरने हा नियम आपल्या बायकांच्या वयासाठी वापरलेला दिसतोय. पहिली रीना, तिच्यापेक्षा ५ वर्ष लहान किरण आणि आता किरणपेक्षा ५ वर्ष लहान गौरी! आमीरच्या या 'रिटायरमेंट प्लॅनिंग'चे कौतुक करावे तितके थोडेच आहे.सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे, घटस्फोटानंतरही आमीरचे जुन्या बायकां


The Ayodhya Bar Association’s decision to bar its lawyers from representing...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The Ayodhya Bar Association’s decision to bar its lawyers from representing the accused in the Ram Temple donation theft case—under threat of a ₹5 lakh fine—highlights the intense emotional volatility surrounding the issue. For millions, the temple represents decades of struggle and sacred devotion; hence, any betrayal of that trust provokes immense public outrage and a demand for swift accountability. However, this boycott triggers a crit


A chief engineer drawing over ₹1 lakh monthly salary was caught with assets worth more...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* A chief engineer drawing over ₹1 lakh monthly salary was caught with assets worth more than ₹100 crore. His empire included 20 acres of land, 5 kg of gold, 7 luxury flats, a triplex villa, another lavish house, and even 60 bottles of foreign liquor. Yet, roads and bridges under his watch collapsed in the first rains. Why? Because public funds meant for asphalt and concrete were diverted to marble floors and golden lockers. Citizens suffer


नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे आणि बेफिकीरीचे ज्वलंत उदाहरण आहे. लष्कराचे सरकारी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाकडे ५००० रुपयांची लाच मागितली गेली, आणि नकार दिल्यावर एका पोलिसाने पेटती सिगारेट डिझेल टाकीवर फेकून ट्रक पेटवला. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे सामान जळत असताना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले, ही लाजिरवाणी बाब आहे. वाहतूक पोलिसांचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असते, पण ते पैसे खाण्यात गुंतलेले दिसतात.


नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे आणि बेफिकीरीचे ज्वलंत उदाहरण आहे. लष्कराचे सरकारी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाकडे ५००० रुपयांची लाच मागितली गेली, आणि नकार दिल्यावर एका पोलिसाने पेटती सिगारेट डिझेल टाकीवर फेकून ट्रक पेटवला. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे सामान जळत असताना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले, ही लाजिरवाणी बाब आहे. वाहतूक पोलिसांचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असते, पण ते पैसे खाण्यात गुंतलेले दिसतात.
bottom of page