top of page

मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा!...

dhadakkamgarunion0
Jul 21
3 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा! आणि जाता जाता शाह, योगी, हिमंता किंवा शुभेंदू यांच्यापैकी एका कट्टर नेत्याच्या हाती देशाची सूत्रे सोपवून जावे. आम्हाला तर 'जेन झी'ला बरबाद करायला निघालेल्या त्या दिपके आणि वांगचूकला पोलिसांनी दिलेली कडक 'थर्ड डिग्री' थेट बघायची आहे! आणि त्यासोबत त्या केजरीवालला तर बर्फाच्या लादीवर नागडं झोपवून पोलिसांनी तुडवायलाच हवे, तेव्हाच कलेजाला थंडावा मिळेल! आणि मोदीजी, जर तुम्हाला लोकशाहीच्या चौकटीत राहून हे असले 'कडक' कार्यक्रम करायचे नसतील, तर मग उगाच ही संविधानाची नाटकं कशाला? तुम्ही एकदाचे अधिकृत 'हुकूमशहा'च होऊन टाका ना! बाकी, देशातील बेरोजगारी, महागाई, पेपरफुटी आणि उद्ध्वस्त होणारे शिक्षण क्षेत्र या क्षुल्लक गोष्टींवर चर्चा करायला संसदेत वेळ कोणाकडे आहे? हुकूमशाही जिंदाबाद!

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

२०१८ मध्ये मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरची महापूजा टाळली होती. वारकऱ्यांची सुरक्षा अग्रक्रमी ठेवून घेतलेला तो निर्णय प्रशासकीय संवेदनशीलतेचा भाग मानला गेला. त्यानंतरच्या काळात सत्तांतर झाले, परंतु पंढरपूरच्या वारीचे आणि वारकऱ्यांच्या निष्ठेचे मोल अबाधित राहिले. आज वारीदरम्यान पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सेवा, तात्पुरते तंबू आणि सिलिंडर पुरवठ्यासारख्या सोयीसुविधांचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. भाविकांना मिळणाऱ्या या सोयी कौतुकास्पद आहेत. भक्ती आणि श्रद्धेचा हा सोहळा राजकीय चिखलफेकीपासून दूर राहणेच गरजेचे आहे. वारकऱ्यांचा सन्मान आणि त्यांच्या सोयी हा कोणत्याही सरकारचा प्राथमिक धर्म असायला हवा, परंतु त्याची जाणीव आणि त्यानुरूप कृती ही केवळ देवेंद्र फडणवीस यांनीच केली आहे हे इतिहासात नक्की लिहिले जाईल.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

आता एक आंदोलन हिंदुत्ववादी लोकांनी त्यातही जेन झीला शिव्या देणाऱ्या भाजपा समर्थकानीही करावं..मागण्या दोनच असाव्या.कोणत्याही परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या गुन्हेगारांना मग ते सरकारी बाबू का असेनात लगेच फास्टट्रॅक वर केस चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी... आणि त्यांची पूर्ण मालमत्ता जप्त करण्यात यावी.कोणताही राजकीय पक्ष किंवा व्यक्ती जर राजकीय फायद्यासाठी विद्यार्थ्यांना वापरून देशात अराजक माजवण्याच्या प्रयत्न करत असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टात गुन्हा सिद्ध होताच त्या पक्षावर आणि त्या व्यक्तीवर आजन्म निवडणूक लढण्यासाठी बंदी घालावी... आणि त्या व्यक्तीला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा द्यावी....खुप झाला हा लोकशाही, अभिव्यक्तीचा तमाशा.... या देशात आता कंट्रोल्ड डेमोक्रेसीची गरज आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

शांततापूर्ण आंदोलनाच्या नावाखाली पोलिसांवर आणि सुरक्षारक्षकांवर दगडफेक करणाऱ्यांना 'क्रांतिकारी' किंवा 'पीडित विद्यार्थी' संबोधणे, म्हणजे हिंसेचे आणि अराजकतेचे थेट समर्थन करणे होय. लोकशाहीत अहिंसक विरोधाचा अधिकार सर्वांना आहे; परंतु सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे आणि कायदा हातात घेणे याला कोणतीही सनदशीर मान्यता असू शकत नाही.ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच NEET परीक्षेची तयारी करून आपले भविष्य घडवायचे होते, त्यांनी परीक्षा देऊन प्रवेश प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, परीक्षा संपल्यानंतरही रस्त्यांवर सुरू असलेला हा हिंसक गोंधळ आणि उग्र निदर्शने केवळ विद्यार्थ्यांच्या मागण्या पुरती मर्यादित राहिलेली नाहीत. देशातील शांतता ढळवून नेपाळ किंवा बांगलादेशसारखी राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे हे प्रयत्न आहेत का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशा हिंसक प्रवृत्तींना वेळीच वेसण घालणे काळाची गरज आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

कालच्या चलो संसद मोर्चामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि भयावह दृश्य बघायला मिळाले. एक आई वडील आपल्या तान्ह्या बाळांना घेऊन या मोर्चात आले होते. त्यांनी त्या लहान बाळांना आपल्या पोटाला बांधले होते आणि ते मोर्चात सहभागी झाले होते. हे आंदोलन देशद्रोही शक्तींनी प्रायोजित केले होते याचे हे उघड उघड उदाहरण आहे. मोर्चात लाठीमार झाला आणि या लहान मुलांना इजा झाली तर तान्ह्या मुलांवर पोलिसांनी हल्ला केला म्हणून आरडाओरडा करण्यासाठीच ते पालक आले होते हे उघड सत्य आहे. युरोप किंवा अमेरिकेत असे झाले असते तर बेजबाबदार आई बाप म्हणून त्या मुलांना त्यांच्याकडून काढून घेऊन अनाथाश्रमात तिथल्या सरकारने वाढवले असते. परंतु भारतात असे क्रूर पालक मोकाट सुटतात. त्यांचे फोटो सोशल साईट वर फिरत आहेत. सरकारने त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page