राहुल गांधीबद्दल मतं वेगवेगळी असली तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही गोष्टी निर्विवाद आहेत...
- dhadakkamgarunion0
- 20 hours ago
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
राहुल गांधीबद्दल मतं वेगवेगळी असली तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही गोष्टी निर्विवाद आहेत. तो कपटी नाही, मत्सरी नाही, द्वेषभावना नाही, आणि सत्तेची हावही नाही. त्याचं राजकारण प्रवाहासोबत वाहण्याचं नाही तर स्वतःच्या मार्गाने चालण्याचं आहे—पडला तरी पुन्हा उठून लढण्याचं. वडिलांच्या मारेकऱ्यांना माफी देण्याइतकं मोठं हृदय त्याच्याकडे आहे, ही त्याच्या माणुसकीची खरी ओळख. राजकारण बाजूला ठेवलं तर तो मस्तमौला, राग-लोभाच्या पलीकडचा माणूस आहे. देशभर फिरून तो प्रेम आणि सद्भावना वाटतोय, राजकीय गणित न मांडता. त्याचं धैर्य हेच त्याचं खरं बळ आहे. आमच्या लाडक्या राव्हल्याला ५६ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा—भावा, प्रयत्न करत रहा, एक दिवस नक्की यश मिळेल.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने भावपूर्ण भाषण केले परंतु त्यांच्या राजकारणावर असणारे सर्वात मोठे प्रश्नचिन्ह हे पक्षनिष्ठा विरुद्ध लोकसेवा याचे आहे. उद्धव रावांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सभागृहात प्रवेश केला नाही, पण महाराष्ट्राने त्यांना महान नेता म्हणून स्वीकारलं. आज मात्र उद्धव यांच्या पक्षाचा गट झाला आणि आता या गटातून सुद्धा नेते बाहेर पडत आहेत आणि त्यांना ‘गद्दार’ ठरवलं जातं आहे. लोकसेवा करण्यासाठी निधी, नेतृत्व आणि विकास आवश्यक असतो; हे मिळवण्यासाठी कोणी पक्ष सोडत असेल तर त्याला गद्दार म्हणायचं की लोकसेवक, हा विचार नेतृत्वाने करायला हवा. भास्कर जाधव यांनी बरोबर सांगितलं आहे,” टाळी एका हाताने वाजत नाही.” उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदावर टिकून रहातात की राजीनामा देतात हा उद्धव ठाकरेंचा वैयक्तिक निर्णय असेल, पण महाराष्ट्राला आज खरी गरज आहे ती लोकसेवेची, तुम्ही घरात बसून राहणार , कुणालाही भेटणार नाही आणि वैतागून लोकांनी पक्ष सोडल्यावर तुम्ही केलेल्या निष्ठेच्या घोषणा वांझोट्या आहेत.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*,
डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी इराण युद्धाचा वापर अमेरिकेतली शेअर मार्केट मध्ये स्टॉक्स च्या किंमत वाढवणे आणि पाडणे यासाठी केल्याचा आरोप होतो आहे. होरमुझ बंद झालं की तेलाचे आणि शेअर्सचे भाव वाढतात. होरमुझ सुरु झालं की तेलाचे आणि शेअर्सचे भाव पडतात. शेअरच्या या उलाढालीत ट्रंप बख्खळ धन मिळवतात कारण ट्रंप यांची वक्तव्येच इराणला होरमुज च्या संदर्भात अशी धरसोड भूमिका घेण्यास प्रेरित करतात. अमेरिकेतल्या प्रतिष्ठित पेपरांनी गुप्त सुत्रांचा हवाला देऊन प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार इराणने चक्क डोनाल्ड ट्रंप यांनाच होरमुझ प्रकरणात मिळालेल्या पैशाचा चाळीस टक्के वाटा आपल्याला मिळाला पाहिजे अशी मागणी केलीय. कारण हे धन आपल्यामुळंच मिळालं असा इराणचा दावा आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली, पण या निकालाने न्यायव्यवस्थेतील सुरुवातीच्या तपासाची कमजोरी पुन्हा उघड झाली. २००६ मध्ये जेव्हा हत्या झाली, तेव्हा प्राथमिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासाची दिशा याच्यावर संपूर्ण केस उभी होती. त्या काळात पद्मसिंह पाटील सत्ताधारी पक्षाशी जोडलेले होते, त्यांचे राजकीय नातेसंबंध आणि गृहमंत्र्यांची भूमिका यामुळे तपास ढिला झाला, असे कोर्टानेही सूचित केले. वीस वर्षांच्या तपासानंतरही सुरुवातीच्या चुका दुरुस्त झाल्या नाहीत. न्यायालयाने आज ताशेरे ओढले, पण महाराष्ट्राला हा धडा लक्षात ठेवावा लागेल – सुरुवातीचा तपास जर निर्दोष नसेल तर कितीही वर्षे गेली तरी न्याय मिळत नाही.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*,
ब्रिटनमधील ‘ग्रूमिंग गँग’ अहवालाने समाज हादरला आहे. २१९ पानांच्या या चौकशीत किमान २.५ लाख श्वेतवर्णीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे नमूद आहे. ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान पुरुष असून काही प्रकरणांत सोमाली, सीरियन, इराणी व तुर्कीये येथील पुरुषही सहभागी होते. मुलींना प्रेम, भेटवस्तू, दारू व अमली पदार्थांच्या आमिषाने जाळ्यात ओढले जात असे; ११ ते १३ वर्षांच्या मुलींना शाळेबाहेरून उचलून हॉटेल्समध्ये नेऊन टोळ्या बलात्कार करत. पोलीस, शाळा व प्रशासनाला संकेत मिळूनही वर्णद्वेषाचा आरोप होण्याच्या भीतीने कारवाई झाली नाही. परिणामी हजारो मुली सतत शोषणाच्या शिकार झाल्या. खासदार रूपर्ट लोव यांच्या समितीने सर्व प्रकरणांची पुन्हा चौकशी व संस्थात्मक अपयशावर स्वतंत्र तपासाची मागणी केली आहे. हा अहवाल ब्रिटनच्या सामाजिक ढोंगीपणावर कठोर प्रकाश टाकतो.
🔽
#RahulGandhi #UddhavThackeray #DonaldTrump #Iran #HormuzStrait #PadmasinhPatil #PawanrajeNimbalkar #UKPolitics #GroomingGangs #MaharashtraPolitics #Justice #Leadership #CurrentAffairs #PoliticalDebate #NewsUpdate #DevendraFadnavis









Comments