गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची उलटी गिनती सुरू होईल...
- dhadakkamgarunion0
- 5 hours ago
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची उलटी गिनती सुरू होईल, या भ्रमात वावरणाऱ्या विरोधी पक्षांना सर्व विधानसभा निकालांनी जबरदस्त धक्का दिला आहे. आगामी निवडणुकांमध्येही काही वेगळे घडण्याची चिन्हे नसल्याने विरोधकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळेच, जे मतपेटीतून साध्य होत नाही, त्याचा बदला थेट रस्त्यावर उतरून घेण्याचा घातक खेळ सुरू झाला आहे. तरुणांची माथी भडकवून देशात अराजकता माजवण्यासाठी परकीय शक्तींकडून कोट्यवधींचा निधी ओतला जात आहे. परदेशांतून सोशल मीडियावर प्रक्षोभक मजकूर पसरवून देशातील वातावरण दूषित केले जात आहे. काहीही करून दंगली घडवणे, अशांतता पसरवणे आणि त्यातून स्वतःची राजकीय पोळी भाजून भाजपला सत्तेतून खाली खेचणे, हेच या षड्यंत्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशा वेळी, देशहितासाठी जनतेने या राजकीय कटांना ओळखून सतर्क आणि संयमी राहणे अत्यंत गरजेचे आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
जंतर-मंतरवरील कथित विद्यार्थी आंदोलनाचे रूपांतर जेव्हा राजकीय गुंडगिरी आणि देशद्रोहात झाले, तेव्हा स्वतःला 'तटस्थ' म्हणवून घेणाऱ्या दांभिक विचारवंतांचा खरा आणि भेसूर चेहरा उघडा पडला. ही हिंसक परिस्थिती पाहूनही हे लोक केवळ 'व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचे फॉरवर्ड्स' म्हणून सत्याकडे डोळेझाक करत राहिले. आंदोलनातील उघड शिविगाळ आणि अराजकतेचा स्पष्ट शब्दांत निषेध करण्याची हिंमत यांच्यात नव्हती. पोलिसांच्या लाठीमारावर तातडीने टीका करणारे हे पळपुटे, गर्दीत लपलेल्या देशद्रोही आणि नक्षलवादी तत्त्वांवर मात्र ब्र काढायला तयार नव्हते. "दोन्ही बाजू बघा" असा सुर लावून निष्पक्षतेचा आव आणणारे हे दांभिक प्रत्यक्षात उघड्या डोळ्यांनी हिंसाचाराला मूक संमती देत होते. अशा भ्याड आणि 'मंकी बॅलन्सिंग' करणाऱ्या पलायनवाद्यांमुळेच देशातील अराजकतेला खतपाणी मिळते, हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
जंतर-मंतरवरील गर्दीत तरुण-तरुणींनी केलेले हिडीस आणि बीभत्स वर्तन कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. ज्येष्ठ नेत्यांबद्दल वापरलेली गलिच्छ भाषा, घाणेरड्या शिव्या आणि किळसवाणे हातवारे हे Gen Z चा अत्यंत विकृत चेहरा समोर आणतात. या पिढीतील सर्वांना सरसकट दोषी धरता येणार नाही; मात्र हे वर्तन भारतीय संस्कृतीच्या चिंतेत पाडणारे आहे. Gen Z आणि Gen Alpha ला उत्तम शिक्षणाची गरज नक्कीच आहे, पण त्याहून अधिक गरज संस्कारांची आहे. मुलांमधील या बेतालपणाचा दोष काही प्रमाणात ज्युनिअर Gen X आणि सिनियर Millennials पालकांकडेही जातो, जे संस्कार देण्यात अपयशी ठरत आहेत. जर हा उनाडपणा देशाच्या तरुणाईचे प्रातिनिधिक रूप असेल, तर महान परंपरा लाभलेल्या या देशाचे भविष्य नेमके कुठे चालले आहे, हा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या नावाखाली नुकतेच गुंडगिरी आणि देशविरोधी विचारांचे उघड प्रदर्शन पाहायला मिळाले. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे गुंड घुसले होते, ज्यांनी हिंसक मार्गाने आपले राजकीय हिशोब चुकते करण्याचा कट रचला होता. त्यांच्या घोषणा आणि खुनशी आविर्भावातून त्यांचा खरा हेतू स्पष्ट दिसत होता.या अराजकतेला योगेंद्र यादव यांच्यासारख्या राजकीय गुन्हेगारीचे समर्थन करणाऱ्या देशद्रोही नेत्यांची फूस होती. तर दुसरीकडे, नेपाळ आणि बांगलादेशप्रमाणे जनतेला रस्त्यावर उतरण्याची चिथावणी देणारे आणि अर्बन नक्षलवादाला खतपाणी घालणारे अरविंद केजरीवाल यांचीही यात गुप्त साथ होती. या गर्दीत कलम ३७० हटवल्यामुळे व्यथित झालेले घटक आणि अल्लाचा जयजयकार करणाऱ्या धार्मिक कट्टरतावाद्यांचा भरणा होता. थोडक्यात, हे कोणतेही जनआंदोलन नसून देशविरोधी, अर्बन नक्षली आणि संधीसाधू राजकीय ताकदींचा एकत्र आलेला कट होता.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
हल्ली आपल्याकडे न मागता ज्ञान पाजळणाऱ्या 'फुकट सल्लेबाजां'ची मुळीच कमतरता नाही. येता-जाता, उठता-बसता आणि जन्मापासून मरणापर्यंत फुकटचे सल्ले देणारे सल्लेखोर गल्लीबोळात खंडीने मिळतील. गंमत म्हणजे, जे लोक वर्षानुवर्षे महत्त्वाच्या पदांवर असतात, निवृत्त झाल्यावर अचानक त्यांचे डोके चालायला लागते आणि ते ज्ञान वाटू लागतात. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या बातमीने तर अशा सल्लेबाजांना उकळीच फुटली आहे.पण एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे; देशाचे नेतृत्व करणाऱ्या मोदी आणि शाह यांच्याकडे आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त माहिती, 'इनपुट्स' आणि २५ वर्षांहून अधिक काळाचा यशस्वी राजकीय अनुभव आहे. निर्णय कधी, कसा आणि का घ्यायचा, हे त्यांना उत्तम ठाऊक आहे. त्यामुळे असल्या फुकटच्या सल्लेबाजांकडे दुर्लक्ष करा. धैर्य आणि संयम ठेवा, योग्य वेळी सर्वकाही ठीक होईल!
🔽









Comments