🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 2 days ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सायबर गुन्हेगारांच्या नेक्सस वर दिल्ली पोलिसांचा कुठाराघात. दिल्ली पोलिसांनी नुकत्याच सायबर फसवणुकी विरुद्ध, २० नोव्हेंबर रोजी आणि पुढे ४८ तास एक मोठं ऑपरेशन 'ऑपरेशन साइहॉक' राबवलं. या कारवाईत तब्बल ८७७ लोकांना अटक करण्यात आली असून ४,४६७ संशयितांवर चौकशी सुरू आहे. इतर ५०९ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश दिल्ली आणि एनसीआरमध्ये ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या सायबर क्राइम गँगचा पूर्णपणे शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करणं हा होता. या कारवाईत पोलिसांनी अनेक बनावट कॉल सेंटर्सवर छापा टाकला, जिथून जॉब, इन्व्हेस्टमेंट, वर्क फ्रॉम होम अशा नावाखाली फसवणूक केली जात होती. याच ठिकाणी संगणक, मोबाइल, सिमकार्ड, क्रेडिट कार्ड्स जप्त करण्यात आले, जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ऑपरेशनमध्ये दिल्लीतील सुमारे १८० पोलिस ठाण्यांनी आणि स्पेशल सेलच्या टीमनी भाग घेतला. ही कारवाई इतिहासातील सर्वांत मोठी समन्वयीत सायबर-एंटी फ्रॉड ऑपरेशन म्हणता येईल. ज्याने शहरातल्या सायबर गुन्हेगारांच्या गटांना खूप मोठा धक्का बसला आहे. हे ऑपरेशन सतत आणि जोरदारपणे पुढे सुरू रहाणे आवश्यक आहे.
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महायुतीतील समीकरणे व भाजपची भूमिका
एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडून भाजपला साथ दिली, तर अजित पवारांनी मोदींचे नेतृत्व मान्य करून महायुतीत प्रवेश केला. या दोन्ही हालचालींनी महाराष्ट्रातील राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले. शरद पवार व अजित पवार एकच आहेत असे मानणाऱ्यांसाठी भाजपने दोन्ही पवारांना रडारवर ठेवले आहे. २०२९ साली स्वतंत्र लढती झाल्यास पवारांचे पाय बांधले जातील, अशी तयारी दिसते.स्थानिक स्तरावरही भाजपने राष्ट्रवादीतील नेत्यांना थेट आव्हान दिले आहे—मुळशीत, मोहोळ, माढा, पाथरी, नगर, फलटण, पारनेर अशा ठिकाणी भाजपचे उमेदवार सज्ज आहेत. त्यामुळे शिंदे वा पवारांचा पक्ष वाढवायचा व टिकवायचा हा भार भाजपवर नाही. युती कायमस्वरूपी नसते, म्हणूनच भाजपने स्पष्ट संदेश दिला आहे: सत्ता, मंत्रिपदे, महामंडळ मिळतील, पण स्थानिक निवडणुकीत दूध का दूध, पाणी का पाणी ठरेल.
🖋️ अभिजीत राणे लिहितात
उपराष्ट्रपती हमीद अंसारी , सुप्रीम कोर्ट जज अब्दुल नजिर आणि पूर्व निवडणूक आयुक्त कुरेशी यांच्या सापेक्ष वर्तनासंदर्भात इशारा देणारी ही प्रचलित सोशल-मीडियावरील माहिती तथ्य म्हणून स्वीकारणे धोकादायक असले तरी, तिच्यातून उभा राहणारा व्यापक प्रश्न दुर्लक्ष करता येत नाही. न्यायपालिका, उपराष्ट्रपती पद किंवा निवडणूक आयोग – या संस्था व्यक्तींच्या धर्मावर नव्हे तर त्यांच्या निष्पक्षतेवर टिकून असतात. पण काही निर्णय, काही सार्वजनिक भूमिकांमुळे या संस्थांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याची जनता व्यक्त करते, हेही वास्तव आहे. लोकशाहीतील विश्वास हेच तिचे प्राणवायू; आणि हा विश्वास ढासळला की कोणतीही संस्था पवित्र राहात नाही. म्हणूनच, व्यक्ती कोणतीही असो—पद, शिक्षण वा प्रतिष्ठेपेक्षा संविधानाचा निष्ठेने पालन करणारी कार्यसंस्कृती महत्त्वाची ठरते. देशासाठी सर्वात मोठा धोका म्हणजे कोणत्याही संस्थेला धर्म किंवा गटनिष्ठेची छटा लागू लागणे. अशी भावना निर्माण होणेही लोकशाहीस अपायकारक आहे.
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ऐतिहासिक निर्णय: उपवर्गीकरणाचा मार्ग
१ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) समुदायांमध्ये उपवर्गीकरण करता येईल असा ऐतिहासिक निर्णय दिला. सात न्यायाधीशांच्या संविधान पीठाने ६:१ बहुमताने ठरवले की आरक्षणाचा लाभ सर्वांना समान न देता सर्वात वंचितांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. या निर्णयाने ई.व्ही. चिनैय्या प्रकरणातील जुना निकाल पलटला.न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी स्पष्ट केले की आरक्षणाचा खरा उद्देश तेव्हाच साध्य होईल जेव्हा तो सर्वात मागासलेल्या वर्गांपर्यंत पोहोचेल. त्यांनी दाखवून दिले की ५०% विद्यार्थी पाचवीपूर्वी, ७५% आठवीपूर्वी व ९५% हायस्कूलपूर्वी शिक्षण सोडतात. त्यामुळे उच्च शिक्षण व आरक्षणाचा लाभ संपन्न वर्गांपुरता मर्यादित राहतो. मित्तल यांनी प्राचीन भारतातील गुणकर्माधारित वर्णव्यवस्थेचा उल्लेख करून सांगितले की संविधानाचे ध्येय जातिविहीन समाज होते. हा निर्णय सामाजिक न्यायाला नवी दिशा देणारा ठरतो
🖋️ अभिजीत राणे लिहितात
हिंदुत्ववादी नितीश कुमार सरकार कामाला लागले. बिहारमध्ये नितीश कुमार सरकारकडून सनातन धर्मप्रसारासाठी राज्यातील सर्व 38 जिल्ह्यांत संयोजक नेमण्यात आले आहेत! संयोजकांचे कार्य पुढीलप्रमाणे असेल. संबंधित जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत मंदिरे आणि मठ दर महिन्याला अनुक्रमे पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी श्रीसत्यनारायण पूजा आणि आई भगवतीची पूजा करतात का याची खात्री करणे.सर्व नोंदणीकृत मंदिरे आणि मठ या दोन्ही पूजांचे महत्त्व जनतेला पटवून देत आहेत की नाही, याचीही खात्री करणे तसेच लोकांना त्यांच्या घरात दर महिन्याला अशा पूजा आयोजित करण्यास प्रोस्ताहित करणे. मंदिरे आणि मठांतर्फे हिंदू समाजासाठी उपक्रम राबविण्याबाबत देखरेख करणे. या उत्तम निर्णयाचे काही परिणाम पण झाले आहेत. मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे डावे, पुरोगामी, समाजवादी, सेक्युलर या निर्णयाने प्रचंड संतापले आहेत. थोडक्यात बिहारच्या जनतेने योग्य लक्ष्यभेद केला आहे.
#CyberCrime #DelhiPolice #OperationSyHawk #PoliticalAnalysis #MaharashtraPolitics #DemocraticInstitutions #Judiciary #Reservation #SocialJustice #SCST #BiharNews #Governance #AmeetSatam












Comments