🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Mar 4
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
शरद पवार स्वतः साठीत असताना एका निवडणूक पूर्व जनसभेत स्वतःपेक्षा फक्त ५ वर्षांनी मोठ्या असलेल्या विरोधी उमेदवाराबद्दल म्हणाला होते की बैल म्हातारा झाल्यावर त्याला कसाईखाना दाखवला जातो. आज सुप्रिया सुळे आणि आव्हाड महाविकास आघाडीच्या नेत्यांना गळ घालत आहेत की पवारांना खासदार करा. खरंच काय गरज आहे पुन्हा एकदा खासदार होण्याची? मदत घेतल्याशिवाय चालता येत नाही,काय बोलतात ते बहुतेक लोक समजू शकत नाहीत,तरीही पुन्हा एकदा खासदारकी घेऊन काय करणार आहेत?त्यांच्या समर्थकांना आवडणार नाही, पण आताशा जेव्हा जेव्हा यांचे टीव्हीवर आणि/किंवा वर्तमान पत्रात दर्शन होते तेव्हा तेव्हा बहुतेकांना ते यांनीच कधीकाळी दिलेलं म्हाताऱ्या बैलाचं उदाहरण आठवत असेल. तुमचं कर्म तुमची पाठ सोडत नाही आणि बुमरॅंग सारखं तुमच्याच अंगावर येऊन आदळतं ते हे असं.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अमेरिका‑इस्रायल‑इराण संघर्ष हा केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित नाही; त्याचे परिणाम जगभर जाणवू लागले आहेत. तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ होऊन ब्रेंट क्रूड $१००‑$१२० प्रति बॅरलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा फटका भारत, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया यांसारख्या आयातदार देशांना बसणार आहे. इंधन व वीज अनुदानाचा भार वाढल्याने सरकारांना पायाभूत सुविधा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील खर्च कमी करावा लागू शकतो.महागलेले तेल वाहतूक व अन्नधान्याच्या किंमती वाढवेल, ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट विस्कळीत होईल. त्याचवेळी जागतिक गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तेकडे वळल्याने उदयोन्मुख बाजारातील चलनांवर दबाव येईल. रुपया, रुपिया किंवा येन यांसारख्या चलनांचे अवमूल्यन आयात महागाई वाढवेल. हा संघर्ष जगाच्या अर्थव्यवस्थेला अस्थिरतेच्या नव्या टप्प्यात ढकलू शकतो.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
मुळात इराणी मुस्लिमांना खोमेनीची सत्ता नको होती. खोमेनी मारला गेल्यावर तिथल्या मुस्लिम जनतेने आनंद साजरा केलाय. पण भारतीय मुस्लिमांना खोमेनी आपला वाटतोय. खिलाफत चळवळीचंही हेच होतं. तुर्की जनतेला ऍटोमॅन खलीफाचं राज्य नको होतं. त्यांना केमाल अतातुर्क हवा होता. पण भारतीय मुस्लिमांना ऍटोमन खलिफा हवा होता. इतिहासातील तुर्की असो की मॉडर्न काळातील खोमेनी असो... त्या देशातील जनतेला ते नकोयत... आणि भारतीय मुस्लिम त्या नेत्यांबद्दल बाप मेल्यासारखं मातम करतात. वर यांची इच्छा असते की यांच्या देशभक्तीवर संशय घेतला जातो. असे कारनामे असतील तर का नाही लोक यांच्या निष्ठा आणि देशभक्तीवर संशय घेणार??
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अमेरिकन संविधानात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च मान दिला आहे. जगात कुठेही अमेरिकन नागरिक अडचणीत आला तर तो राष्ट्राध्यक्षावर झालेला हल्ला मानला जातो आणि सरकार तातडीने कारवाई करते. यामुळे अमेरिकन नागरिक आत्मविश्वासाने जगभर फिरतात. २०१४ पर्यंत भारताला आत्मभान नव्हते; गुलामगिरीच्या मानसिकतेत जगणारा देश आता जागा झाला आहे. आज भारत स्वतःला ब्रॅंड म्हणून सिद्ध करत आहे. ब्रॅंड असण्याचे मूल्य म्हणजे जगभरातील भारतीय नागरिक संकटात आले तर सरकारने त्यांच्यासाठी धावून जाणे. हे सरकार करत आहे आणि ते योग्य आहे. आखाती देश भारतीय कामगारांशिवाय चालू शकत नाहीत. पर्यटक व व्यावसायिकांची उत्तम काळजी घेतली जाते. तरीही सरकार उपाययोजना करून नागरिकांना परत आणत आहे. टीका न करता या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सुद्धा हे कार्य करत आहेत त्यांचे कौतुक करणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर मुख्य आरोपी, वरिष्ठ अधिकारी प्रदिप फाटे याला बीड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. जाधवर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये फाटे यांच्याकडून होणाऱ्या मानसिक छळाचा स्पष्ट उल्लेख केला होता. मात्र, राजकीय दबावामुळे आजवर फाटेवर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप केला जात होता. न्यायासाठी जाधवर कुटुंबीयांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले, तेव्हा कुठे पोलीस प्रशासनाला जाग आली आणि ही कारवाई करण्यात आली. जाधवर यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बेड्या ठोकणे, ही त्यांना न्याय मिळवून देण्याच्या लढ्यातील पहिली महत्त्वाची पायरी मानली जात आहे. प्रशासकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि छळाविरुद्ध हा एक मोठा इशारा आहे. जाधवर यांच्या कुटुंबीयांनी आता फाटेला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
🔽
#SharadPawar #SupriyaSule #MVA #USIsraelIranConflict #OilPrices #GlobalEconomy #Khomeini #KhilafatMovement #IndianPolitics #CitizenSafety #DevendraFadnavis #EknathShinde #GSTCase








Comments