शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला ...
- dhadakkamgarunion0
- 6 days ago
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला डॉक्टरच्या कानाखाली दिली, तिथेच असलेल्या पुरुष डॉक्टरला मारहाण केली.त्यांच्या कार्यकर्त्यांनीही डॉक्टरांना मारहाण केली. महाराष्ट्रातील कायद्यानुसार अशा प्रकारे डॉक्टरांना मारहाण केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा नोंद होऊन अटक केली जाते.तसेच ३ वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. पोलीस अटक करतील म्हणून रमेश ज्या सरकारी दवाखान्यात हा ऍडमिट होण्यासाठी गेला तिथल्या डॉक्टरांनी आणि नर्सेसने याच्यावर ईलाज करण्यास नकार दिला. अटक होऊ नये म्हणूनचे प्रयत्न फेल गेल्यानंतर याने कोर्टाला माझी एक किडनी नाहीये त्यामुळे मेडिकल टर्म्सनुसार मला कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. ज्या डॉक्टरांना मारहाण करण्यात आली आहे त्यातला एक डॉक्टर ठाणे शहर सोडून गेला आहे.बाकीचे डॉक्टरही भयभीत आहेत. कोर्टाने याची व्हिडिओ कॉन्फरन्सने उपस्थित राहण्याची परवानगी नाकारली परंतु सुनावणीमध्ये जामीन मंजूर करून टाकला. गुन्हा करणार्यांना अश्या पद्धतीने संरक्षण मिळणार असेल तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
तुकाराम मुंढेंनी मंचरमधून चालणारे दूध भेसळ रॅकेट उध्वस्त करून माफियांना अटक केली. मंचर हा दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ असल्याने त्यांना याचा त्रास जास्त जाणवतोय. नव्या गुणवत्ता मानांकनांना विरोध करणे हा त्याचाच भाग दिसतो. प्रत्यक्षात या मानकांमुळे शेतकऱ्यांचे कसलेही नुकसान होत नाही, उलट ग्राहकांना शुद्ध दूध मिळते. मग वळसे पाटील इतके दुखावले का, हा प्रश्न जनतुकाराम मुंढेंनी मंचरमधून चालणारे दूध भेसळ माफियांचे रॅकेट उध्वस्त करून गुन्हेगारांना अटक केली. मंचर हा दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ असल्याने या कारवाईचा राजकीय परिणाम त्यांच्यावर स्पष्ट दिसतोय. नव्या गुणवत्ता मानांकनांना विरोध हा त्याचाच भाग वाटतो. शेतकऱ्यांचे कसलेही नुकसान या मानकांमुळे होत नसताना वळसे पाटील इतके दुखावले आहेत हे समजणे कठीण आहे. भेसळखोरांना थारा देणाऱ्या राजकारणाला विरोध करणे हीच खरी जनतेची अपेक्षा आहे. गुणवत्ता मानकांमुळे ग्राहकांचे संरक्षण होते, शेतकऱ्यांना न्याय मिळतो आणि बाजारपेठेत विश्वास वाढतो. त्यामुळे या विरोधामागे शेतकऱ्यांचा प्रश्न नसून राजकीय अस्वस्थता अधिक दिसते.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
नितीन गडकरी यांनी पत्रकारांना ऑन कॅमेरा अब्रूनुकसानीचे खटले दाखल करण्याच्या धमक्या दिल्या, ही गंभीर बाब आहे. पब्लिक डोमेनमधील माहितीवर प्रश्न विचारणे चुकीचे नाही; उलट गैरसमज दूर करणे हे नेत्यांचे काम असते. गडकरी यांनी गंगा शुद्धीकरण, उडत्या टॅक्सी, पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्ग यांसारखी अनेक आश्वासने दिली पण ती पूर्ण झाली नाहीत. मग जनतेने खोटी आश्वासने दिल्याबद्दल केस कराव्यात का? इथेनॉल प्रश्नावर सरकारला रोज बचाव करावा लागतो, कंपन्यांना पुढे करावे लागते, व्हिडिओज डिलिट करावे लागतात. लोकांचा आक्रोश सोशल मीडियावर स्पष्ट दिसतो. अशा धमक्या सुरू राहिल्या तर गडकरी ‘Defamation Minister’ म्हणून ओळखले जातील अशीच चिन्हे आहेत. इथेनॉल प्रकरण एकंदर मोदी सरकारला जड जाताना दिसत आहे. नितिन गडकरी यांचे वैफल्यग्रस्त वागणे त्याचेच निदर्शक आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
बोगस पीक विमा काढल्यास शेतकऱ्याला पाच वर्षांसाठी ब्लॅक लिस्ट करणार असा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत योग्य असून गरीब आणि गरजू शेतकर्यांना विमा केल्याचा मोठाच आधार असतो. लहरी हवामानामुळे पीक जरी बाद झाले तरी विम्यामुळे शेतकर्याला किमान गुंतवलेली रक्कम तरी परत मिळते. केवळ व्यवसायाने शेतकरी आहे म्हणजे माणूस म्हणून तो अप्रामाणिक,लबाड,खोटारडा,सरकारी योजनांचा गैरफायदा घेणारा नसेल असे नाही.त्यामुळे उगाच सर्वांना अन्नदाता,अन्नदाता म्हणून डोक्यावर बसवून ठेवणे हा समाजातील इतर व्यवसाय क रणाऱ्या घटकांवरअन्याय ठरू शकतो.ते टाळलेच पाहिजे.शेतकऱ्याने पिकवलेल्या आणि ग्राहकाच्या घरी पोहोचलेल्या धान्यात सुद्धा कधी बारीक खडे मिळतातच ना?ते खडे जसे काढून फेकून दिले जातात त्याच प्रमाणे अप्रामाणिक,खोटारडे शेतकरी सुद्धा काळ्या यादीत फेकले गेले पाहिजेत व इतर शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे लाभ त्यांना देणे बंद केले पाहिजे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
गेल्या काही दिवसांत शरद पवार, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही फाळणी पुन्हा एकत्र येऊन एनडीएला पाठिंबा देणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. केंद्रात १८ जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याने या भेटींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. एकेकाळी फडणवीसांवर टीका करणारे पवार आता त्यांच्याकडे चकरा मारत आहेत, हे विरोधकांसाठी धक्कादायक आहे. राजकारणात कायमस्वरूपी वैर नसते, तर परिस्थितीनुसार समीकरणे बदलतात, याचे हे ताजे उदाहरण आहे. ब्रिगेडी मराठ्यांनीही लक्षात घ्यावे की पवार स्वतः फडणवीसांकडे जात आहेत, म्हणजेच राजकीय वास्तव थोरवीपेक्षा जास्त प्रभावी ठरते.
🔽









Comments