विशाळगडावर छत्रपतींच्या सहकाऱ्यांच्या...
🖋️ अभिजीत राणे लिहितात
विशाळगडावर छत्रपतींच्या सहकाऱ्यांच्या समाध्या उघड्यावर पडलेल्या, मंदिरांसमोर बोकड कापले जाणारे, कचऱ्याचे ढिग दिसणारे हे दृश्य प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत पुरावे आहेत. अफजलखानाची कबर, मलिक रेहानचा दर्गा मात्र दिमाखात झळकत आहेत, पर्यटक खेचत आहेत. मग प्रश्न असा की, आपल्या वीरांच्या स्मृतींना छप्पर नाही, संरक्षण नाही, पण अतिक्रमणांना मूक संमती का? सरकारला वारसा जपण्याची जबाबदारी आहे, पण ती वारंवार अपयशी ठरते. शिवप्रेमींना आवाज उठवला की "आतंकवादी" ठरवले जाते, ही तर लोकशाहीची थट्टाच आहे. सारसबाग गणपतीसारखी मंदिरे टारगेट होत असताना प्रशासनाचे मौन हाच सर्वात मोठे अपराध आहे. महाराष्ट्रात सत्तांतर फक्त कागदावर झालेले आहे वास्तवात अजूनही हिंदू उपेक्षित आहे हेच सत्य आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात,
‘रॉ’ कधीच विसरत नाही, कधीच बोलत नाही – ही वाक्यं हबीब जहीरच्या रहस्यमय गायब होण्याने पुन्हा अधोरेखित झाली. कुलभूषण जाधव यांना पकडण्यासाठी सापळा रचणाऱ्या या पाकिस्तानी अधिकाऱ्याने भारताची खिल्ली उडवली होती, पण नियतीने त्यालाच गिळले. काठमांडूतील हॉटेलमध्ये शेवटचे दर्शन, भिंतीवर माकडांची चित्रं, आणि त्यानंतरचा पूर्ण अंधार – हे सर्व एका गुप्तचर युद्धाच्या छायाचित्रांसारखे वाटते. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने जाधवसाठी लढा दिला, फाशी रोखली, पण हबीबचा मागमूस नाही. गुप्तचर संस्थांची ही खेळी जगाला कधीच पूर्ण कळत नाही; फक्त एवढेच लक्षात राहते की, ‘रॉ’ कधीच विसरत नाही, कधीच बोलत नाही. रॉ च्या धुरंधर मंडळींनी हबीब जहीरला त्याच्या कर्मांची शिक्षा तर दिली परंतु कसे आणि काय केले याचा काहीही पुरावा मागे ठेवला नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात,
ढोंगी हिंदुत्ववादी नेत्यांची मराठी अस्मिता ही केवळ दिखावा आहे. अंबानी, अदानी, बॉलिवूड सिताऱ्यांच्या घरी पार्ट्या, बिर्याणी, लग्नसोहळे यांना हजेरी लावणारे हेच नेते गरीब पाणीपुरीवाल्यावर, भाजीवाल्यावर मराठीची सक्ती करतात. जावेद अख्तर मराठी दिनाला हिंदी बोलून जातात तेव्हा हे टाळ्या वाजवतात, पण जनतेला मराठी शिकवण्यासाठी गुंड पोसतात. ही अस्मिता विकाऊ आहे, टोमणे आणि मिमिक्रीवर धंदा चालवणारे नेते जनतेच्या विश्वासाचे नाहीत. महाराष्ट्राला लागलेली खरी कीड म्हणजे यांचे पाळीव गुंड आणि सतरंजी उचले. भाषेचं राजकारण करून गरीबांवर दडपण आणणारे हे लोक निर्लज्ज झाले आहेत. पुरोगामी म्हणवणारे नेतेच सर्वात ढोंगी, थर्ड ग्रेड आणि जनतेला मूर्ख बनवण्यात अव्वल आहेत. हमाम मे सब नंगे है.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
गुन्हा नोंदवला नाही म्हणजेच गुन्हेगारांना पाठीशी घातले, हे सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे. म्हाडाच्या १४,००० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल न करणाऱ्या तत्कालीन एसीबी प्रमुख सतीश माथुर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावण्याचे आदेश देऊन न्यायालयाने प्रशासनाला धक्का दिला आहे. कमलाकर शेनॉय यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत “कायद्यापुढे कोणीही मोठे नाही” हा संदेश दिला. ३८९ विकसकांनी अतिरिक्त बांधकाम क्षेत्र सरकारकडे न सोपवल्याने तिजोरीला हजारो कोटींचा फटका बसला, तरी अधिकाऱ्यांनी तपास टाळला. हे कर्तव्याकडे दुर्लक्ष असून गुन्हा ठरतो. न्यायालयाने दाखवून दिले की, जनतेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पेट्रोल टंचाई होणार ही भीती मीडिया आणि विरोधी पक्षांनी घातली आणि सामान्य माणसे मेंढरे होऊन त्यावर विश्वास ठेवून पंपांवर रांगा करून पेट्रोल घेऊ लागली. काल पंपावर शुकशुकाट होता. विचारलं, इतकी शांतता कशी? तर पंपावरील माणूस म्हणाला – भारत मूर्खांचा देश झालाय! काही दिवसांपूर्वी पाणी प्यायला वेळ नव्हता इतकी गर्दी होती, लोकांनी पाच-पाच, दहा-दहा हजाराचं पेट्रोल घरात साठवून ठेवलं. आता ते संपेपर्यंत गिऱ्हाईक येणार तरी कसं? काल परवा पासून पंप रिकामा, आज दोनचार आले पन्नास-शंभराचं पेट्रोल टाकायला तेव्हा थोडं बरं वाटलं. लोकांच्या घाबरटपणामुळे नुसता येड्यांचा बाजार झाला आहे. ही मानसिकता प्रशासनाच्या अपयशाची आणि जनतेच्या अविचारी वागण्याची जिवंत कहाणी आहे.
🔽
#MaharashtraPolitics #HeritageNeglect #GovernanceFailure #JusticeSystem #CorruptionExposed #PublicAccountability #PoliticalHypocrisy #MarathiAsmita #SocialReality #IndiaNews #BreakingViews #PublicVoice #SystemFailure #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJP #CitizenAwareness #GroundReality






Comments