top of page

लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव हिंदी भाषिक...

  • dhadakkamgarunion0
  • Apr 16
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव हिंदी भाषिक राज्यांना अधिक बळकट करणार आहे. लोकसंख्या हा निकष मानल्यास, ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल. परिणामी बिगर हिंदी भाषिक राज्यांचे खासदार कमी होतील आणि त्यांच्या आवाजाला संसदेत फारसा वजन राहणार नाही. हिंदी पट्ट्यातील राज्यांची पकड अधिक घट्ट होईल, तर दक्षिण व पूर्व भारतातील राज्यांना दुय्यम स्थान मिळेल. यामुळे देशाच्या राजकारणात ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. लोकसंख्या नियंत्रण करून विकासाला हातभार लावणाऱ्या राज्यांना शिक्षा मिळाल्यास संतुलन बिघडेल. त्यामुळे हा प्रस्ताव केवळ प्रतिनिधित्वाचा प्रश्न नाही, तर संघराज्याच्या तत्त्वांवरही गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात,

भाजपमध्ये सुरू झालेली खोगीरभरती आता हास्यास्पद पातळीवर पोहोचली आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये दिसणारा हा प्रकार आज भाजपमध्ये दिसतो—हवशे, नवशे, गवशे कुणीही पक्षात येतात आणि सत्तेसाठी तत्वांचा काडीमोड केला जातो. परिणामी, आग्र्यातील एका नेत्या आशा भोसले यांना “आशा घोसले” आणि “खोसले” म्हणत श्रद्धांजलीऐवजी “सदरांजली” अर्पण करते. इतकेच नव्हे तर “आशा खोसले सिंगर होती ना?” असे म्हणत दात काढते. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर अशा प्रकारे हसणे हेच का “पार्टी विथ डिफरन्स” चे संस्कार आहेत, असा प्रश्न निर्माण होतो. खोगीरभरतीमुळे पक्षाची प्रतिमा आणि सामान्य समज दोन्हींचा गळा घोटला जातो, हेच या प्रसंगातून स्पष्ट होते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात,

२०१५ ते २०२२ या काळात भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी बंगालचे प्रभारी म्हणून काम पाहिले आणि पक्षाला मोठी झेप मिळवून दिली. २०१९ मध्ये १८ लोकसभा जागा व २०२१ मध्ये ७७ विधानसभा जागा मिळाल्या. मात्र टीएमसीच्या आक्रमक रणनितीपुढे भाजपने बदल करत सप्टेंबर २०२५ मध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली. प्रचाराची जबाबदारी अमित शाह यांनी स्वतः घेतली. यादवांनी कार्यकर्त्यांना निडर बनवले, तर शाह यांनी ममता बॅनर्जीवर थेट हल्ले सुरू केले. भाजपने सॉफ्ट हिंदुत्व, स्थानिक नेतृत्व, महिला-केंद्रित योजना व भ्रष्टाचार, घुसखोरी यांसारख्या मुद्द्यांवर भर दिला. मोदींनी ‘जय माँ काली’ व ‘जय माँ दुर्गा’ घोषणांनी बंगालच्या परंपरांशी जवळीक साधली. ही रणनिती अधिक स्थानिक, सांस्कृतिक आणि सूक्ष्म प्रचार मोहिमेकडे निर्देश करते. आणि याचा सकारात्मक परिणाम या विधानसभा निवडणुकीत दिसून येणार आहेत यात संशय नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अमरावतीच्या परतवाडा शहरातील अयान अहमद या आरोपीने तब्बल १८० हिंदू मुलींना प्रेमजाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले व ३५० हून अधिक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. पोलिसांनी त्याला अटक करून बाल लैंगिक अत्याचारासह अनेक गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून सामान्य लोकांनी एन्काउंटरची मागणी केली आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीचे घर बुलडोजरने जमीनदोस्त केले. त्याला मदत करणाऱ्या साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी MIM पक्षाचा पदाधिकारी असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस आता या गुन्ह्यातील इतर जाळ्यांचा शोध घेत आहेत. ही घटना समाजाला हादरवणारी ठरली असून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

६ एप्रिल २०२६ रोजी कल्पक्कम येथील प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिऍक्टर ने ‘क्रिटिकलिटी’ साध्य केल्याची घोषणा भारताच्या अणुऊर्जा प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरली. जगभरातील अनेक देशांचे FBR प्रकल्प अपयशी ठरले असताना भारताने हे यश मिळवले. PFBR युरेनियम-२३८ चे प्लुटोनियम-२३९ मध्ये रूपांतर करून वापरापेक्षा अधिक इंधन निर्माण करते, पुढे थोरियम वापरून स्वच्छ ऊर्जा साध्य करण्याचा मार्ग खुला करते. भारताकडे जगातील सर्वाधिक म्हणजे २५% थोरियम साठा आहे, ज्यातून पुढील शेकडो वर्षांची ऊर्जा गरज भागवता येईल. सरकारचे ध्येय २०४७ पर्यंत १०० GW अणुऊर्जा क्षमता गाठण्याचे आहे. अधिकृत भूमिका नागरी वापरासाठी टिकाऊ, कमी-कार्बन ऊर्जा निर्मितीची आहे. ही घटना भारताला ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने जागतिक पातळीवर अग्रस्थानी नेणारी ठरली.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page