भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे...
- dhadakkamgarunion0
- 13 hours ago
- 5 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे – सोर्स कोडशिवाय कोणतेही परदेशी शस्त्र स्वीकारले जाणार नाही. राफेलची ताकद मान्य असली तरी ‘बंद पेटी’सारखे शस्त्र भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारे ठरते. आता भारत केवळ खरेदीदार नव्हे तर मालक बनण्याच्या भूमिकेत आहे. रशियाची एसयू-57 ही पाचव्या पिढीची स्टील्थ फायटर जेट्स भारतासाठी नवी संधी ठरू शकते. रडारच्या आवाक्याबाहेर राहणारी ही अदृश्य शक्ती शत्रूला गोंधळात टाकते. रशियाने तंत्रज्ञान सामायिक करण्यात दाखवलेले मोठेपण भारताच्या हिताचे आहे. मोदी सरकारचा हा मास्टरस्ट्रोक पाश्चिमात्य मुत्सद्देगिरीला हादरवणारा ठरेल. भारत यापुढे कोणत्याही देशाचे डंपिंग ग्राउंड राहणार नाही; समान अधिकार मिळतील तिथेच करार होईल. राफेलवरून एसयू-57 कडे वळणे हे भारताच्या सुरक्षेसाठी योग्य आणि दूरदर्शी पाऊल आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
बच्चू कडूंचं राजकारण हे उद्धव ठाकरे यांच्या सहिष्णुतेचं जिवंत उदाहरण आहे. एकटेच आमदार असताना, कोणतीही अट न घालता त्यांना मंत्रीपद दिलं, ही उदारमतवादी शैली होती. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. पण आजच्या मोदी युगात अशी उदारता पाप ठरते. शिंदेंनी फक्त एका विधान परिषदेच्या आमदारकीसाठी अख्खा पक्ष गिळला, हीच खरी तुलना आहे. सभ्य, सुसंस्कृत आणि उदार राजकारणी कोण, याचं उत्तर बच्चू कडूंनी मनातल्या मनात दिलं असेल – ‘उद्धव ठाकरे’. पण वास्तव हे आहे की सहिष्णु राजकारणाला आता जागा नाही. सत्ता मिळवण्यासाठी निर्दयता, हात पिरगळणे आणि पक्ष फोडणे हीच नवी पद्धत झाली आहे. उदारमतवाद हरला, आणि व्यवहारवाद जिंकला.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
२०१० मध्ये नियामगिरी टेकड्यांतील वेदांतचा बॉक्साइट प्रकल्प भारताला जगातील नं. १ अॅल्युमिनियम उत्पादक बनवू शकला असता, पण राहुल गांधींच्या विरोधामुळे तो थांबला. आज पुन्हा तशीच परिस्थिती आहे. अंदमान-निकोबारमध्ये ट्रान्सशिपमेंट बंदर, विमानतळ, ऊर्जा प्रकल्प आणि शहर उभारून भारताला स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मलक्का सामुद्रधुनी जवळ असल्याने हा प्रकल्प धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो, कारण चीनचा बहुतांश पुरवठा या मार्गावरून होतो. तरीही राहुल गांधी पर्यावरण आणि आदिवासींच्या नावाखाली विरोध करत आहेत, जरी फक्त १.८२% जंगल प्रभावित होणार असून कोणतेही विस्थापन नाही. हा विरोध चीनच्या हितासाठी असल्याचा आरोप होत आहे. जनता मूर्ख नाही; नेहरूंपासून २०१४ पर्यंत काँग्रेसने चीनला दिलेल्या संधी सर्वांना आठवतात. भारताला आता अडथळे नव्हे तर स्वावलंबन हवे आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
अमोल मिटकरी यांची राजकीय कारकीर्द ही संधीसाधूपणाचं उत्तम उदाहरण आहे. वहिनीराज्यात पुन्हा आमदारकी मिळणं अशक्य असल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यांनी रोहित पवारांची री ओढायला सुरुवात केली. उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकली तरी आश्चर्य नाही. मिटकरी पक्षात असताना अजित पवारांच्या मृत्यूची चौकशीसुद्धा पक्षाला नकोय असं चित्र उभं करतात. सुनेत्रा पवारांच्या आजूबाजूच्या लोकांना टारगेट करून शेवटी कुटुंबियांवर हल्ला करणे ही त्यांची पद्धत आहे. विधानपरिषदेवर असताना पलट्या मारणं, पण पुन्हा आमदारकीसाठी काही काम न करणं ही त्यांची ओळख. राष्ट्रवादीला मुस्लीम व्होटबँक सांभाळण्यासाठी जिशान सिद्दिकी अपरिहार्य ठरले. निधी पुरवणाऱ्या घराण्याचा वारसा असल्याने त्यांची निवड पक्षासाठी फायदेशीर होती. मिटकरीपेक्षा सिद्दिकी हा सर्व बाजूंनी योग्य उमेदवार ठरतो.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. राहुल गांधींनी राजीव सातव यांच्या पश्चात त्यांना आमदारकी दिली होती, पण अधिक मोठ्या आश्वासनांच्या मोहात त्यांनी पक्ष सोडला. हिंगोली काँग्रेसमधील घुसमटही त्यामागे होती. दुसरीकडे विवेक कोल्हेंना थेट अमित शहांनी आश्वासन दिल्याने त्यांचा विचार यादीत झाला. मात्र दरवेळेसारखाच ‘सतरंज्या उचले’ ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला, ज्यात विरोधक आघाडीवर तर काही भाजपाईही साथ देतात. माधव भंडारी आणि नव्याने आलेले केशव उपाध्याय यांच्या नावांवर नाराजी व्यक्त होत आहे. हे नेते अशा प्रतिक्रिया देतात की पुढच्या वेळी आपला विचार व्हावा. त्यामुळे भाजपची यादी ही केवळ उमेदवारांची नाही तर अंतर्गत नाराजी आणि सोशल मीडिया ट्रेंड्सचीही कहाणी बनली आहे.
🔽
#UddhavThackeray #EknathShinde #RahulGandhi #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MaharashtraPolitics #StatePolitics #GrassrootsPolitics #DevelopmentPolitics #Infrastructure #EconomicGrowth #PolicyDebate #GlobalPolitics #IndiaRising #ForeignPolicy #IndiaDefense #NationalSecurity #Rafale #SU57
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
बच्चू कडूंचा राजकीय प्रवास म्हणजे सत्तेसाठी कुठेही, केव्हाही, काहीही करण्याची कहाणी. उमेदवारी न मिळाल्यावर सेना सोडली, हिंदुत्वाला फारकत दिली, मतांसाठी दाढ्या कुरवाळल्या आणि आमदारकी मिळवली. मंत्रीपदासाठी सर्वधर्मसमभावाचा ढोल वाजवला, लव जिहादचं समर्थन केलं, मोदी-फडणवीसांवर टीका केली. सत्ताबदलाचा सुगावा लागताच शेतकरी-अपंगांच्या नावाने गुहावटी गाठली. मंत्रीपद न मिळालं तर आंदोलन, उपोषणाची नौटंकी. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न, पुन्हा हिंदुत्वाशी फारकत. आता आमदारकीशिवाय जगणं मुश्किल झालं म्हणून पुन्हा भगवा खांद्यावर. थोडक्यात, सत्तेसाठी कोलांट उड्या मारणं हीच त्यांची ओळख. मित्रपक्षात आले आहात तर मित्रासारखे राहा, उगाचच मोदी-फडणवीसांवर टीका करून बोलबच्चन दिल्यास जनता उडू देईल. भगव्याचे इमान राखा, अन्यथा शेतकरी-अपंगांचे भांडवल पुढे करून पुन्हा रंग बदलाल.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
महावितरणच्या अन्यायी धोरणांमुळे सोलर पॅनल बसवणाऱ्या उद्योजकांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. सुरुवातीला सवलतींचे आश्वासन देऊन आकर्षित केले, पण आता ग्रीड सपोर्ट चार्जेस, हीलींग चार्जेस, टीओडी स्लॉट बदल, बॅटरी स्टोरेज कंपल्शन यामुळे बचत २५-४०% पर्यंत घटली आहे. गुंतवणुकीचा परतावा ४-५ वर्षांवरून ६-९ वर्षांपर्यंत वाढला आहे. स्वतः निर्मित वीज वापरण्याचे स्वातंत्र्य मर्यादित झाले आहे. दहा किलोवॅट युनिट्सना प्रचंड बिले आली असून उद्योजकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. ही समस्या उद्योजकांपुरती मर्यादित नाही, तर भविष्यात घरगुती ग्राहकांनाही झळ पोहोचणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या अन्यायी दरवाढीस विरोध करणे आवश्यक आहे. ऍपीलेट ट्रीब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटीमध्ये दाद मागणे हीच खरी दिशा आहे. “सोलर वाचवा, उद्योग वाचवा” हीच आता हाक आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
फडणवीस सरकारने विकासाच्या नावाखाली झाडे तोडण्याचा सोपा मार्ग निवडला आहे, पण एक झाड वाढवायला वीस वर्षे लागतात. फक्त लावणे पुरेसे नाही, त्याचे संगोपनही आवश्यक आहे. आज महाराष्ट्रात अतिक्रमणामुळे जंगल नष्ट होत आहेत, नद्या गटारासारख्या झाल्या आहेत, नैसर्गिक पाण्याचे स्रोत संपवले जात आहेत. झाडे तोडून रस्ते रुंद झाले, पण श्वास घेण्यासाठी जागा उरली नाही—हा कसला विकास? सरकार बदलतात, नेते बदलतात, पण तोडलेले झाड पुन्हा उगवत नाही. झाडे तोडून एसी लावणारे सरकार उद्या ऑक्सिजन विकत घ्यायला लावेल. विकास हवा, पण विनाश नको. पर्यावरणाचा समतोल राखणे हीच खरी जबाबदारी आहे. “झाड वाचवा, श्वास वाचवा”—हीच जनतेची हाक आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
१ मे रोजी सांगलीत मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा निघणार आहे. जैसलमेर संस्थानच्या वारसदारांनी केलेल्या अनैतिहासिक दाव्यामुळे NCERT ने पाठ्यक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा घेतलेला निर्णय हा राष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान मानला जात आहे. हा निर्णय बदलून ऐतिहासिक वस्तुस्थिती लक्षात घेऊन नकाशा पुन्हा पाठ्यक्रमात समाविष्ट करावा, अशी मागणी महाराष्ट्रासह देशभरातील राष्ट्रीय विचारांच्या लोकांकडून होत आहे. श्रद्धेय आईसाहेब कल्पनाराजे भोसले यांच्या उपस्थितीत सर्व राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या वतीने सांगलीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली व परिसरातील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठा साम्राज्याच्या सन्मानासाठी आवाज उठवावा, हीच खरी वेळ आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
प. बंगाल निवडणुकीत तज्ज्ञ संस्थांचे अंदाज इतके परस्परविरोधी आहेत की अभ्यासकही गोंधळले आहेत. पत्रकार मेघा प्रसाद यांनी सांगितलेले कारण धक्कादायक आहे—माईकसमोर मतदार तृणमूल जिंकणार म्हणतात, पण माईक दूर झाल्यावर ते बदल हवा आहे असे कबूल करतात. याचा अर्थ ममता बॅनर्जीच्या गुंडांची दहशत इतकी प्रचंड आहे की लोकांना खरी भावना व्यक्त करायलाही भीती वाटते. लाखो बांगलादेशी व रोहिंग्या मतदार घुसवून तृणमूलने मतपेटीवर पकड घट्ट केली आहे. अभिनेत्री रुपाली गांगुलीनेही सांगितले की अनेक स्त्रिया मतदानालाच बाहेर पडत नाहीत, कारण तृणमूलला मत न दिल्यास सुरक्षितता नाही. पांढऱ्या साडीत लोकशाहीची भाषा करणाऱ्या ममता बॅनर्जींचा हा ढोंगीपणा बंगालच्या जनतेला असह्य झाला आहे. बदल व्हायलाच हवा, हीच खरी जनभावना आहे.
🔽
#AbhijeetRane #BachchuKadu #DevendraFadnavis #NarendraModi #MamataBanerjee #RupaliGanguly #MeghaPrasad #BJP4IND














Comments