कपिल सिब्बल यांच्यासह २४ विरोधी पक्षनेत्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून लोकशाही धोक्यात...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
कपिल सिब्बल यांच्यासह २४ विरोधी पक्षनेत्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून लोकशाही धोक्यात असल्याचा आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आरोप केला आहे. मात्र, या पत्रातील दावे पूर्णपणे राजकीय हताशेतून आलेले आणि कायदेशीर निकषांवर फोल ठरणारे आहेत. २०१४ पूर्वी पंतप्रधान स्वतःच्या अधिकारात निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करत असत, तर सद्यस्थितीत संसद संमत कायद्यानुसार ही प्रक्रिया पार पडते. संसदेने संमत केलेला कायदा घटनाबाह्य (Ultra Vires) असल्याशिवाय न्यायव्यवस्था त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. पराभूत आणि निराश विरोधी पक्ष आता सरन्यायाधीशांना त्यांच्या घटनात्मक कक्षेबाहेर जाऊन निर्णय घेण्यासाठी उकसवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर सरन्यायाधीशांनी त्यांना या मुद्द्यांचे कायदेशीर पुरावे मागितले, तर विरोधकांची बोलती बंद होईल, इतके हे आरोप केवळ तोंडदेखले आणि राजकीय स्टंटबाजीचे आहेत.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
इंडोनेशिया सरकारने आपल्या देशात ईव्हीएम (EVM) द्वारे निवडणुका घेण्यासाठी भारताकडे तंत्रज्ञान आणि मदतीची मागणी केली असून, भारताने ती मान्य केली आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतातील ९६ कोटी मतदारांपैकी सुमारे ७२ कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. एवढ्या प्रचंड स्तरावर पारदर्शक मतदान आणि वेगवान मतमोजणीची ही प्रक्रिया पाहून 'जी-२०' देशांच्या प्रतिनिधींसह जगाला भारताच्या निवडणूक पद्धतीचे प्रचंड कौतुक वाटले आहे. इंडोनेशियानेही याच विश्वासातून भारताचे ईव्हीएम तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. एकीकडे संपूर्ण जग भारताच्या या अत्याधुनिक आणि विश्वासार्ह मतदान पद्धतीचा स्वीकार करत असताना, भारतातील विरोधी पक्ष मात्र निवडणूक जिंकल्यावर गप्प बसतात आणि हरल्यावर बॅलेट पेपरची मागणी करतात. जागतिक स्तरावर भारताचा गौरव होत असताना, विरोधकांचे हे दुटप्पी राजकारण अत्यंत हास्यास्पद आणि फोल ठरले आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडून बितांग आदि पूर्ण हा इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.हा मला वाटते मोदींचा ३४ व्या राष्ट्राकडून झालेला सन्मान आहे.नुसता तळतळाट,तडफडाट,जळफळाट, होतोय मोदी विरोधकांचा.आता मोदी पैसे देऊन सन्मान विकत घेतात वगैरे नेहमीचे आरोप सुरू होतील.काँग्रेसच्या एकाही पंतप्रधान पदावरील नेत्याला कधी याच्या एक दशांश राष्ट्रांचे सन्मान मिळवता आले नाहीत आणि तरीही स्वतःला,स्वतःच्या घराण्याला आणि पक्षाला अत्यंत थोर समजणाऱ्या काँग्रेसी राहुल गांधी च्या डोळ्यात त्या ३४ देशांनी घातलेले हे झणझणीत अंजन आहे.परंतु मोदी द्वेषाने आंधळा झालेल्या त्याची द्रृष्टी कधीच बदलणार नाही.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
वायनाडमधील ताज्या भूस्खलनात एक व्यक्ती ठार तर सात जण बेपत्ता झाल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. मात्र, या आपत्तीच्या काळात स्थानिक खासदार प्रियांका गांधी आणि माजी खासदार राहुल गांधी यांचे केवळ 'बोलबच्चन' राजकारण उघडे पडले आहे. जुलै २०२४ च्या भीषण भूस्खलनानंतर, तब्बल १९ महिन्यांच्या विलंबाने फेब्रुवारी २०२६ मध्ये गांधी भावंडांनी कलपेटा येथे पीडितांसाठी १०० घरे बांधण्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केली. 'आम्ही सदैव पाठीशी आहोत' असे आश्वासन देणाऱ्या काँग्रेस हायकमांडच्या या प्रकल्पात गेल्या चार महिन्यांत केवळ काही घरांचे फाउंडेशन झाले असून कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. याउलट, माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या एलडीएफ सरकारने १७८ घरे आणि मुस्लिम लीगने ५१ घरे बांधून ती पीडितांना हस्तांतरितही केली आहेत. काँग्रेसचे हे प्रयत्न केवळ तोंडदेखले आणि आश्वासने पोकळ ठरल्याचे यावरून स्पष्ट होते.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभूतपूर्व पुढाकाराने तब्बल ४७ वर्षांपासून प्रलंबित असलेला ४ राज्यांमधील नर्मदा नदी पाणी वाटपाचा वाद अखेर एकाच बैठकीत संपुष्टात आला आहे. या ऐतिहासिक करारामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी हक्काचे १० टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भविष्यातील सिंचन विकासाला मोठी गती मिळणार आहे. तसेच, सरदार सरोवर प्रकल्पातून महाराष्ट्राला मिळणारा १६% विजेचा वाटा आता कोणत्याही कायदेशीर अडथळ्यांशिवाय निर्धोकपणे सुरू राहील. नंदुरबार जिल्ह्यातील बुडित क्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या पुनर्वसनाचा आणि प्रलंबित आर्थिक भरपाईचा वर्षानुवर्षे रेंगाळलेला प्रश्न यामुळे कायमचा निकाली निघाला आहे. तापी मेगा रिचार्ज करारानंतरचा हा नर्मदा जलसमन्वय करार म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या अचूक समन्वयातून महाराष्ट्राच्या जलसुरक्षा धोरणाला मिळालेले एक अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक यश आहे.
🔽









Comments