top of page
Search


व्यापारी एकता मंडळात गणरायाचे मनोभावे दर्शन
व्यापारी एकता मंडळाच्या निमंत्रणाचा मान राखून मंडळाला भेट देत श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने माझे आपुलकीने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शोभा ब्रह्मणे ताई, अनिता मुखर्जी मॅडम, अध्यक्ष अमित सिंह, मल्लिक भाऊ, इक्बाल खान, तबरेज भाऊ, उपाध्यक्ष अजय जाबडे, उपखजिनदार अश्विन पांडे, विशाल ब्रह्मणे तसेच समाजसेवक उपस्थित होते. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GaneshDarshan #MiraRoad #VyapariEkt


मनिष धुरी यांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. मनीष धुरी यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे बंधू श्री. कुशल धुरी व त्यांच्या सौभाग्यवती यांचीही स्नेहपूर्वक भेट झाली. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GaneshDarshan #Andheri #GanpatiUtsav


पत्रकार पंकज दळवी यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन
पत्रकार पंकज दळवी यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी दळवी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #GaneshDarshan #Goregaon #Ganeshotsav #Mumbai


अरुण भाटिया जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन
लोकप्रिय चित्रपटगृह समूह आयनॉक्स पीव्हीआरचे उपाध्यक्ष श्री. अरुण भाटिया यांच्या लोखंडवाला, अंधेरी येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भाटिया कुटुंबीयांनी केलेले आपुलकीचे स्वागत मनाला खूप भावले. भाटिया कुटुंबीयांसोबत काही निवांत क्षण घालवत स्नेहपूर्ण गप्पा मारल्या. हा स्नेहपूर्ण सहवास खरोखरच आनंददायी वाटला. गणपती बाप्पा मोरया! #PVR #INOX #ArunBhatia #BhatiaFamily #GanpatiBappaMorya #GaneshDarshan


मंगलमूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गोरेगावच्या राजाचे दर्शन
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी मंगलमूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या निमंत्रणाचा मान राखून उपस्थित राहून गोरेगावच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने माझा प्रेमपूर्वक सत्कार व सन्मान करण्यात आला. गोरेगावच्या राजाची सुबक आणि भव्य मूर्ती पाहून मन आनंदाने भरून आले. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GoregaonchaRaja #GaneshDarsha


प्रसाद लाड जी यांच्या कार्यालयात गणरायाचे दर्शन
भाजपा नेते व विधान परिषद सदस्य मा. श्री. प्रसाद लाड यांच्या सायन येथील क्रिस्टल ग्रुपच्या कार्यालयात विराजमान श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी प्रसादजींनी शाल व पुष्पगुच्छ देऊन माझा प्रेमपूर्वक सत्कार केला. तसेच शिवाजी सावंत लिखित ‘मृत्युंजय’ हे पुस्तक भेट म्हणून दिले. त्यांच्या या आपुलकीने आणि स्नेहाने मनापासून आनंद झाला. त्यांच्या प्रेमळ स्वागतामुळे दिवस आणखी आनंददायी झाला. या स्नेहासाठी प्रसादजींचे मनःपूर्वक आभार! #GanpatiBappaMorya #GaneshDarshan #PrasadLad #Sion


मानपाडा येथील राजा सार्वजनिक माघी गणेशोत्सवाला कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट
मानपाडा गावचा राजा सार्वजनिक माघी गणेशोत्सव जागृती मित्र मंडळ मानपाडा घोडबंदर ठाणे येथील गणेश उत्सव साठी धडक कामगार यूनियन चे संस्थापक तथा महासचिव श्री अभिजीत राणे साहेब यांनी गणेश दर्शन करून मंडळाला भेट दिली . मंडळ पदाधिकारी देवेंद्र वाईरकर आणि इतर पदाधिकारी राणे साहेबांचा सत्कार केला या वेळी धडक कामगार यूनियन चे ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे , सचिव राकेश सुर्यराव, अश्विन कांबळे उपस्थित होते. #GaneshDarshan #MaghiGaneshotsav #Manpada #Thane #DhadakKamgarUnion #Abhije
bottom of page