top of page

ठाकरे यांना आमदार सोडून का जात आहेत ?...

  • dhadakkamgarunion0
  • Jul 1
  • 3 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

ठाकरे यांना आमदार सोडून का जात आहेत ? हे जाणून घ्यायचे असेल तर हा किस्सा आवर्जून वाचा. अंबादास दानवे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन इथं मविआच्या आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं. उद्धव आणि आदित्य ठाकरे, पितापुत्र तिथे अपेक्षित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पवार गटाचे शशिकांत शिंदे ठरल्याप्रमाणे, दिलेल्या वेळेला बरोबर सात वाजता कार्यक्रमस्थळी हजर झाले. ठाकरे वेळेवर आलेच नाहीत. पावणे दोन तासांनी ठाकरे पोहचले. उपस्थित आमदारांची वाट पाहून मान मोडली होती. अंबादास दानवे यजमान असल्याने पार हवालदिल झाले होते. वाट किती पहायची ? असं विचारून लोकांनी त्यांना भंडावून सोडलं होतं. अखेरीस सायंकाळी सातच्या कार्यक्रमाला पावणे नऊ वाजता ठाकरे आले आणि व्यासपीठावर जाऊन उपस्थितांनाच चार शब्द कोलून गेले. मविआ म्हणून आपण एक आहोत का? हा त्यांचे वाक्य अनेकांना खटकले. इतके सगळे झाल्यावर उद्धवजी सगळ्यांच्या सोबत बसून दोन घास खातील म्हणून आशाळभूत असलेल्या यजमानांना आणखी धक्का बसला. ठाकरे स्टेजवरून उतरून थेट गाडीत बसून निघून गेले. दानवे मान खाली घालून राहिले.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

गुजरात उच्च न्यायालयाने सोमनाथ मंदिराखाली बौद्ध अवशेष असल्याचा दावा करणारी जनहित याचिका फेटाळून लावताना कठोर भूमिका घेतली. महाराष्ट्रातील विलास तुकाराम खरात यांनी दाखल केलेल्या या याचिकेत कोणताही ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाने विचारलेले सरकारी कागदपत्र, वैज्ञानिक अहवाल किंवा विश्वासार्ह पुरावे सादर करण्यात ते अपयशी ठरले. उलट, सोशल मीडिया पोस्ट आणि वृत्तपत्रांवर आधारित दावे मांडले गेले. सरकारनेही सांगितले की, याचिकेत उल्लेखलेला कायदा अस्तित्वातच नाही. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका खोटी व दिशाभूल करणारी ठरवत फेटाळली आणि याचिकाकर्त्यावर २ लाख रुपयांचा दंड ठोठावला. या निर्णयातून स्पष्ट होते की, जनहित याचिकेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणाऱ्या देणग्यांमध्ये अपहार झाल्याचा आरोप खरा ठरला आहे. एसआयटीच्या प्राथमिक अहवालातच याची पुष्टी झाली असून काही आरोपी अटक झाले आहेत. भक्तांच्या श्रद्धेने दिलेल्या दानाचा हिशोबच नसेल तर तो विश्वासघात ठरतो. आश्चर्य म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप सरकारमधील एकाही मंत्र्याने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रभू रामचंद्रांच्या नावाने सत्ता मिळवणाऱ्यांनी देवाच्या दारात झालेल्या अपहाराकडे दुर्लक्ष करणे ही भक्तांच्या भावनांची अवहेलना आहे. अयोध्या मतदारसंघाने २०२४ मध्ये भाजपला नाकारले, आणि आता रामाला पुन्हा वनवासात ढकलल्यासारखे वाटते. श्रद्धा, सत्ता आणि भ्रष्टाचार यांचा हा संगम धर्म आणि लोकशाहीसाठी लज्जास्पद बाब आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

आजच्या राजकारणात जातीय समीकरणांचा खेळ उघडपणे दिसआजच्या राजकारणात जातीय समीकरणांचा फायदा घेण्याची स्पर्धा सुरू आहे. “वैचारिक मंडळी” लोकांना हिंदू म्हणून इस्लामविरोधात एकत्र आणण्याचा हट्ट धरतात, आणि त्यासाठी आरक्षणासारख्या सवलती देतात. मध्य प्रदेशात तर आरक्षण ७०% पर्यंत नेले गेले, ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला कानउघाडणी केली. मंडल आयोगानंतर आरक्षण ५०% पर्यंत वाढवले गेले, आणि भाजपने त्याचे समर्थन केले. सोशल मीडियावर हे योग्य ठरवणारे लोक खासगीत मात्र वेगळे बोलतात. इतिहासात शिवाजी महाराजांना जाती एकत्र करण्यासाठी ओढूनताणून प्रयत्न करावे लागले नाहीत, तरीही “अठरा पगड जाती एक केल्या” असा अनैतिहासिक दावा केला जातो. आजची वैचारिक मंडळी इस्लामविरोधात लढण्याचा दावा करताना हिंदू धर्मालाच कमजोर करण्याची भाषा करतात. थोडक्यात, तेलही गेले, तूपही गेले अशी स्थिती निर्माण होत आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

आदित्य ठाकरे यांनी व्यथित होऊन एक प्रश्न विचारला आहे. आम्ही सचिन अहिर यांना काय कमी केले ? अहिरांच्या भावाला बृहन्मुंबई महापालिकेत नगरसेवकपद दिले. मुलीला प्रभाग समिती दिली. त्यांना बेस्ट चे अध्यक्षपद दिले रोज त्यांना भेटत होतो तरीही ते पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. परंतु आदित्य ठाकरे जी तुम्ही ही जी सगळी सत्तेची पदे दिली आहेत. त्यात केलेल्या भ्रष्टाचार पचवण्यासाठी अहिरांना सत्तेची ऊब आवश्यक होती हे तुम्ही का विसरता ?? दूसरा मुद्दा त्यांना पुन्हा भ्रष्टाचार करण्यासाठी किंवा सत्तेची ऊब कायम मिळत रहाण्यासाठी निवडून यावे लागेल. ती हमी तुमच्या पक्षात राहून मिळणार आहे का ??? बुडत्या जहाजाला उंदीर सगळ्यात पहिले सोडतात हे व्यावहारिक सत्य समजून घ्या.



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page