🖋️ अभिजीत राणे लिहितात
Updated: Apr 14, 2025
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मुंबई आता मनोरंजन विश्वाची जागतिक राजधानी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल & एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्हज ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेव्हजमुळे भारतातील मनोरंजन उद्योगात, विशेषतः मुंबईत लक्षणीय रोजगार-निर्मिती होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मते, मनोरंजन आणि क्रिएटिव्ह क्षेत्र 3 लाख नवीन रोजगार निर्माण करण्यास सज्ज आहे. मुंबईत भारताचे पहिले आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) उभारण्यात येणार आहे. मुंबई हे भारतीय चित्रपट उद्योगाचे हब आहे, जीथे सर्व भारतीय चित्रपटांपैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती होते. महाराष्ट्र हा भारतातील सॉफ्टवेअरचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे, ज्याची वार्षिक निर्यात ₹80000 कोटींपेक्षा जास्त आहे. एकट्या मुंबईत भारतातील 70%हुन अधिक ओटीटी, एंटरटेनमेन्ट, मीडिया (डिजिटल, इलेक्ट्रॉनिक etc) आणि मनोरंजन कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये आणि 90% हुन अधिक टर्नओव्हर तर आहेच, पण 'प्रॉडक्शन' साठी लागणारी इकोसिस्टिम उपलब्ध असल्याने मुंबई या कंपन्यांसाठी खऱ्या अर्थाने 'कर्मभूमी' पण आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
शाहीनबाग मध्ये ज्याप्रमाणे नकली शेरणी बसवल्या गेल्या आणि एन आर सी कायद्याला विरोध केला गेला , ज्याप्रमाणे सिंगूर मध्ये नकली शेतकरी आणले गेले आणि कृषि कायद्याला विरोध केला गेला त्याच प्रमाणे आता पैसे देऊन मुस्लिमांना समोर केले जात असून त्या माध्यमातून वक्फ सुधारणा कायद्याला विरोध केला जातो आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉं बोर्ड या कायद्याला विरोध करत आहे असे चित्र असले तरी स्थानिक पातळीवर पैसे खायला घालून निदर्शक आणले जात असून त्यांच्या मार्फत हिंसाचार सुद्धा घडवला जातो आहे. याचे खरे कारण असे आहे की राजकीय नेत्यांनी आणि लब्ध श्रीमंतांनी वक्फची जमीन कवडीमोलाने भाड्याने घेऊन त्या जमीनींवर मॉल आणि हॉटेल्स उभारली आहेत. बर्याच ठिकाणी सरकारी जमिनी वक्फच्या नावावर गिळंकृत करणे आणि मग तिथे मॉल उभे करणे हे उद्योग सुद्धा केले गेले आहेत. सुधारित कायद्यांचा सर्वात मोठा दणका या बेकायदेशीर ऊचापतींना बसणार आहे आणि त्यामुळे संबंधित अचानक मुस्लिमांचे कैवारी बनून समोर येत आहेत. सामान्य मुसलमानाला वक्फच्या मालमत्तांचा काडीचाही उपयोग होत नाही त्यामुळे त्याला याचा फरकच पडत नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मोहम्मद युनूस यांनी चीनमध्ये जाऊन आपली अक्कल पाजळली. भारतातील उत्तरपूर्व मधील सातही राज्ये ही लँडलोक्ड आहेत. या वक्तव्याचा अर्थ या भागातील समुद्रावर बांग्लादेशचे नियंत्रण आहे आणि आम्ही हवे ते करू शकतो. आजवर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेल्या भारताने आता मात्र बांग्लादेशला त्याची लायकी दाखवायला आरंभ केला आहे. भारत सरकारने घोषणा केली की यापुढे बांग्लादेश मधून निर्यात होणारे मटेरियल कलकत्ता बंदरातून जाणार नाही. तुम्हाला भारत फक्त नेपाळ आणि भुतानमध्ये जे सामान पाठवणार असाल त्यासाठी मदत करेल. यामुळे बांगलादेशाची निर्यात ठप्प होणार आहे. एकीकडे ट्रंपने टेरिफ लावले आहेत. भारताने ट्रान्स शिपमेंट सुविधा बंद केली. आता बांग्लादेश मधील वस्त्रोद्योगाला घरघर लागणे अपरीहार्य आहे. कारण आता माल पाठवायला उशीर होणार , ट्रान्सपोर्टची किंमत वाढणार. हे सगळे चीनच्या कृपेसाठी केलेले नाटक होते पण सध्या चीन भारताला दुखवण्याच्या मानसिकतेत बिलकुल नाही, त्यामुळे त्यांनी युनूसला फाट्यावर मारले. एकंदर मोहम्मद युनूस बांग्लादेशचा काळ बनूनच खुर्चीवर बसला आहे हे स्पष्ट आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटच्या निमित्ताने महाराष्ट्रात परत एकदा जातीयवाद पेटवण्याचे षडयंत्र पवारांकडून आखले जात आहे. आनंद दवे यांनी या चित्रपटाचे टीजर्स बघून आक्षेप घेतला आहे. आनंद दवे यांच्या संस्थेचे नाव आजवर कोणी ऐकले नव्हते. आनंद दवे नावाचा एक ब्राह्मण आहे आणि तो पवारांचा पित्त्या आहे हे मात्र उभ्या महाराष्ट्राला माहिती होते. आज आनंद दवे यांनी चित्रपटाला आक्षेप घेतल्याने समस्त ब्राह्मणांच्या विरुद्ध रान पेटवण्याची सुसंधी परत एकदा ब्रिगेडी मंडळींना प्राप्त झाली आहे. महापुरुषांच्या जीवनावरील चित्रपट हे त्याकाळातील सामाजिक परंपरा आणि इतिहास दाखवणारे असतात. आजच्या काळाशी त्याचा काहीही संबंध नसतो. परंतु असे चित्रपट निर्माण करणारी मंडळी ही तद्दन व्यावसायिक दृष्टीकोण ठेवून चित्रपट वादग्रस्त कसा होईल याची काळजी घेत आपला गल्ला भरण्याची तजवीज करतात आणि राजकीय नेते स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी याचा वापर करतात. पण या सगळ्यातून् शेवटी काय होते ? महापुरुष जातीत वाटले जातात. समस्त महापुरुषांनी आपले आयुष्य सामाजिक ऐक्य साधले जावे आणि सगळ्याच समाजांची प्रगती व्हावी म्हणून खर्च केले असते आणि आपण मात्र त्यांना जातींमध्ये वाटण्याची मर्दुमकी गाजवतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
2019च्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रात जे पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रयोग झाले त्या काळापासून महाराष्ट्रात सकाळी 9 वाजता एक भोंगा वाजतो उर्फ संजय राऊत बरळतात आणि आपला मिडिया त्याला कव्हर करून दिवसभर त्या बाष्कळ बडबडीवर चर्चा करत बसतो. हा माणूस राजकरणात इतकी वर्षे होता, सामना चा संपादक होता पण याच्याकडे कोणीही कधीही लक्ष दिले नाही कारण तो अदखलपात्रच होता. राजकीय उलथापालथ घडत असताना त्याला प्रवक्ता नेमले आणि त्याने सातत्याने दर्जाहीन वक्तव्य करून त्याच्या सारखीच अक्कल असलेल्या बाकीच्या संपूर्ण मीडियाला भुरळ पाडली. तहव्वुर राणा प्रकरणावर पण यांनी आपली अक्कल पाजळली. त्याला बिहार निवडणुकीच्या आधी फासावर लटकवून निवडणूक जिंकण्याचे राजकारण भाजपा करत आहे. असे परम मूर्ख वक्तव्य त्यांनी केले. पत्रकारांना पाचपोच नसल्याने त्यांनी याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे मत विचारले. देवेंद्रजींनी मी मूर्खांना उत्तर देत नाही. मूर्खांची वक्तव्ये मला सांगत जाऊ नका असे स्पष्ट बोलून संजय राऊत आणि त्यांना मोठे करणारा मिडिया दोघांची सुद्धा लायकी काढली आहे. देवेन्द्रजींचे अभिनंदन.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे एका वाक्यात वर्णन करायचे असेल तर “भविष्याचा वेध घेणारा द्रष्टा नेता.” असेच करावे लागेल. जातीयवादाने , घराणेशाहीने आणि अहंकाराने पोखरलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला सकारात्मकतेची , ऋजुपणाची आणि भविष्याचा वेध घेऊ शकेल अश्या विकासात्मक योजनांची वाट दाखवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. शरद पवार , उद्धव ठाकरे आणि कोंग्रेसी घराणेशाही या अहंकारी , भ्रष्ट आणि स्वार्थलोलुप नेत्यांनी आपली कृष्णकृत्ये दडलेली रहावीत म्हणून सामान्य नागरिकांना जातीयवाद , मराठी अस्मिता , प्रांत वाद या सगळ्या वादांमध्ये कायमच गुंतवून ठेवले. महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट सुलभ व्हावी म्हणून पुरोगामी महाराष्ट्र , महापुरुषांचा महाराष्ट्र अशी मखलाशी चालू ठेवली. ठाकर्यांनी बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालवले. नावे वेगवेगळी असतील पण या मंडळींनी चक्क दुकानदारी करत नुसती लुटालूट केली आहे. निरपेक्ष, सर्वसमावेशक आणि कुणावरही अन्याय न करणारा ,प्रकल्प बाधितांना रास्त परतफेड देणारा विकास केला जाऊ शकतो हे केवळ आणि केवळ देवेंद्रजींनीच करून दाखवले आहे. या गोष्टीची साक्ष देणार्या प्रकल्पांची यादीच आहे. अटल सेतू प्रकल्प,वाढवण बंदर,नवी मुंबई एअरपोर्ट,बुलेट ट्रेन,मल्टिमोडल कॉरिडॉर,कोस्टल रोड,भुयारी मार्ग,मेट्रो प्रकल्प. मुंबई तीनची निर्मिती सुरू असतानाच समांतर पातळीवर मुंबई चार चे काम सुद्धा वाढवण बंदराच्या माध्यमातून वेगाने सुरू होते आहे. महामुंबईसाठी देवाभाऊचे योगदान अफाट आहे. या महाप्रकल्पांना कुठेही निधीची कमतरता पडू दिली जात नाही. आज पासून पाच वर्षांनी ज्यावेळी हे सगळे प्रकल्प पूर्ण झाले असतील त्यावेळी महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या संपूर्ण आशियातील अग्रणी स्थान झालेले असेल यात संशय नाही. महाराष्ट्रचे इतर राजकीय नेते महापुरुषांबद्दल बोलतात परंतु कृतीशून्य आहेत. सामान्य लोक घटनांच्या बद्दल बडबड करतात. परंतु देवेंद्रजी हा असा एकमेव नेता आहे जो आकाशाला गवसणी घालणार्या संकल्पनांबद्दल बोलतात आणि त्यांच्या पूर्ततेसाठी स्वतःला अक्षरशः झोकून देतात. द्रष्टा हा शब्द देवेन्द्रजींना अत्यंत चपखल लागू होतो. विकसित महाराष्ट्राच्या महामुख्यमंत्र्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो.
🔽
#DevendraFadnavis #NarendraModi #mumbaicity #shahinbagh #WaqfAmendmentBill #mohammadyunus #china #mahatmafule #movie #ananddave #sanjayraut #devendrafadnavis #maharashtra #politics #AbhijeetRane






Comments