top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • 2 days ago
  • 2 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची तथाकथित अणुशक्ती हा वास्तवात अमेरिकेच्या गुप्त भांडाराचा साठा होता हे उघड झाले. 1998 पासून पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे अण्वस्त्र साठवले गेले, जे भारताच्या मिसाइल स्ट्राइकच्या टप्प्यावर होते. मोदी सरकारच्या निर्णायक नेतृत्वामुळे चार दिवसांत पाकिस्तानची बे अब्रू झाली आणि अमेरिका हादरला. पाकिस्तानकडून अणुशक्तीचा दिखावा, IMF कडून मिळणारे बेलआउट्स—हे सगळं अमेरिकेच्या भाड्याच्या राजकारणाचा भाग होता. भारताच्या आक्रमणामुळे अमेरिका शांततेचा वास्ता देत राहिला आणि अखेर आपले अण्वस्त्र हटवण्याची तयारी दाखवली. ही लढाई केवळ सीमित युद्ध नव्हती, ती जागतिक सामर्थ्याच्या नव्या व्याख्या होती. भारत आता केवळ एक देश नाही, तर जागतिक परिणाम घडवणारी शक्ती आहे.यातून भारतीय नागरिकांनी एकच धडा घेणे आवश्यक आहे - नेतृत्व मजबूत असेल, तर जग झुकते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्र बार कौन्सिल ने असीम सरोडे यांची सनद तीन महिन्यांसाठी संस्थगित केली त्यावेळी समस्त पुरोगामी धाय मोकलून रडत होते. आता असीम सरोदे यांच्या सनदप्रकरणी बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिलेली स्थगिती हा न्यायाच्या बाजूने उभा राहणारा निर्णय आल्याचा साक्षात्कार पुरोगामी मंडळींना झाला आहे. पूर्वी याच संस्था भाजपच्या दावणीला बांधल्या असल्याचा आरोप ही मंडळी करत होती. बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार शर्मा हे भाजपचे राज्यसभा सदस्य असूनही त्यांनी सरोदे यांना न्याय दिला, हे पाहता डॉ. चौधरींचं अभिनंदन म्हणजे विस्मरणाचं विडंबन ठरतं. जातीय द्वेष पसरवणाऱ्यांसाठीही ही एक शिकवण आहे—न्याय न जात पाहतो, न पक्ष. सत्याचं स्वागत करताना पूर्वी केलेल्या आरोपांची आठवण ठेवली पाहिजे, अन्यथा तेच सत्य कधीतरी आपल्याला उघडं पाडतं.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

लाल किल्ल्याजवळील शू बॉम्ब स्फोट हा केवळ एकाकी हल्ला नव्हता, तर आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा एक सुबक कट होता. उमरने बुटात लपवलेली मायक्रो-ट्रिगर यंत्रणा, अमोनियम नायट्रेट आणि टीएनटीचा वापर, आणि जैश-ए-मोहम्मदकडून मिळालेलं प्रशिक्षण—या सगळ्याने भारतातील सुरक्षेच्या पायाभूत रचनेला आव्हान दिलं आहे. एफएसएल अहवाल आणि एनआयएच्या तपासातून हे स्पष्ट होतंय की, ही पद्धत रिचर्ड रीडसारख्या कुप्रसिद्ध दहशतवाद्यांच्या मार्गावरूनच आली आहे. शाहीन नावाच्या डॉक्टरकडून मिळालेला आर्थिक पाठिंबा हा या कटाचा आणखी एक गंभीर पैलू आहे.ही घटना केवळ सुरक्षा यंत्रणांसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे—दहशतवाद आता पारंपरिक चौकटीबाहेर गेला आहे. जागरूकता, तांत्रिक दक्षता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हाच यावर उपाय आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘PMO सचिव’ असल्याचे भासवून फुशारक्या मारणाऱ्या अशोक ठोंबरे याला पोलिसांनी अटक करून एक महत्त्वाचा प्रकार उघड केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर यांच्या सतर्कतेमुळे हा बनावट अधिकारी गजाआड गेला. सुटकेसह मिळालेल्या ‘भारत सरकार’च्या पाट्या, राष्ट्रध्वज, आणि खाजगी बॉडीगार्डसह केलेली साज-सज्जा ही केवळ दिखावा होता.या प्रकारातून एक गोष्ट स्पष्ट होते—सत्तेच्या आसपास वावरण्याची हौस काहींना इतकी असते की ती फसवणुकीच्या मार्गानेही पूर्ण करतात.पोलिसांची तत्परता आणि बारकाईने केलेली चौकशी हीच अशा तोतयागिरीला आळा घालण्याची खरी किल्ली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्यावरील लाचखोरीचा आरोप म्हणजे न्यायसंस्थेच्या विश्वासाला बसलेला जबर धक्का आहे. एका व्यापाऱ्याला न्याय मिळवण्यासाठी २५ लाखांची मागणी करणारा क्लर्क, आणि त्यामागे उभा असलेला न्यायाधीश—ही केवळ व्यक्तीगत भ्रष्टाचाराची कथा नाही, तर संपूर्ण यंत्रणेत खोलवर रुजलेल्या सड्याचं लक्षण आहे. न्यायालयातील ‘विशेष सहकारी’ हे अनेकदा लाचखोरीचे अप्रत्यक्ष साधन बनतात. पकडले गेले तरी न्यायाधीश सुरक्षित राहतात, कारण सिस्टीम त्यांना झाकते. परंतु या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या तत्परतेमुळे भांडाफोड झाला. कारण जेव्हा न्याय विकला जातो, तेव्हा लोकशाहीची मुळं हादरतात. त्यामुळे आता न्याय‍धीशांनाही पारदर्शकतेची आणि जबाबदारीची जाणीव करून देणारी यंत्रणा उभी करणे आवश्यक झाले आहे.

🔽

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page