🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Nov 10
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
गिरणी कामगारांचा संप: अर्धसत्य आणि वेदना. निखिल वागळे यांनी ठाकरे आणि पवारांवर गिरणी कामगारांचे नुकसान केल्याचा आरोप करणे, राजकीय भाष्य असले तरी ते अर्धसत्य आहे. गिरणी कामगारांच्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या या दुर्दैवी संपाचे मूळ त्या काळातील तीव्र राजकीय उत्साहात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कामगारांना इशारा दिला होता, "हा संप असाच चालला, तर गिरण्यांच्या जमिनी विकून मालक मोकळे होतील आणि तुमच्या हाती काहीच लागणार नाही." मात्र, कामगार 'कोण म्हणतो देणार नाय' या जोशपूर्ण घोषणेत होते. त्या क्षणी भाकीत केलेले भीषण वास्तव आज समोर उभे आहे—जमीन गेली आणि हक्काचे काहीच उरले नाही. गिरणगावात लहानाचा मोठा झालेला मी, ही वेदना जवळून पाहिली आहे. या दीर्घ संपाची जबाबदारी केवळ एका नेत्यावर ढकलणे सोपे आहे, पण कामगारांच्या भावना आणि त्यावेळची राजकीय दिशाहीनता हा या शोकांतिकेचा खरा गाभा आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सोनियांची नाराजी आणि चाणक्यनीतीचा 'तेजाब'. सोनिया गांधींची कथित नाराजी हा केवळ 'ट्रेलर' आहे, खरी 'मेन फिल्म' तर चाणक्यनीतीची आहे. चाणक्याने सांगितले होते: "ज्या झाडाची मुळे खोलवर आहेत, ते तोडू नका, तर तेजाब (ऍसिड) टाकून हळूहळू सुकवा." वाजपेयींनी 'महानता' दाखवली, तर 'चायवाला' खरा चाणक्य निघाला. त्यांनी कुऱ्हाड नव्हे, तर 'समानता', 'प्रोटोकॉलचा अभाव', 'कानून की बराबरी' आणि 'धर्मांतरावर ब्रेक' हे तेजाब वापरले. परदेशी पाहुण्यांचे '१० जनपथ' येथील भेटीगाठी बंद करून आंतरराष्ट्रीय वैधता संपवली. 'राजपुत्राला' (राहुल गांधी) कायद्यासमोर सामान्य व्यक्ती बनवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, व्हॅटिकनच्या 'अनाधिकृत साम्राज्या'वर धर्मांतरण कायदे आणि FCRA च्या कठोरतेचा 'तेजाब' टाकला. झाड तोडल्यास सहानुभूती मिळेल, म्हणून झाड सुकवण्याचे काम सुरू आहे—आणि 'पर्यावरणप्रेमी' झोपले आहेत! सोनियाजींची नाराजी म्हणजे चाणक्यनीती यशस्वी होत असल्याचा पुरावा आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
रिसिन — जगातलं सगळ्यात घातक विष! काही थेंब पुरेसे असतात माणूस संपवायला. वास नाही, रंग नाही, चव नाही… आणि ते पाण्यात किंवा जेवणात टाकलं तरी कळणारही नाही. गुजरात ATS ने एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला. डॉ. अहमद मोहीउद्दीन सय्यद — चीनहून MBBS केलेला डॉक्टर — हा कास्टरच्या बियांपासून रिसिन काढून दिल्ली, अहमदाबाद आणि लखनऊ इथे मोठं विषप्रयोगाचं कारस्थान रचत होता. पाणी आणि देवस्थानातील प्रसादात हे विष टाकायचं त्याचं प्लॅनिंग होतं. त्याच्यासोबत मोहम्मद सुहेल आणि आझाद हे दोघे होते. हे लोक टेलिग्रामवर ISIS च्या हँडलर्सशी संपर्कात होते आणि पाकिस्तानहून ड्रोनने शस्त्रं टाकण्याचं नेटवर्क तयार केलं होतं. हा प्लॅन जर खरा झाला असता तर किती लोकांचा बळी गेला असता, कल्पनाच करवत नाही. आपल्या दहशतवादविरोधी यंत्रणा खरंच अभिमानास्पद काम करतायत. गेल्या काही वर्षांत त्यांनी किती कट उधळले असतील, याची आपल्याला कल्पनाही नाही. आपण आज सुरक्षित आणि शांत आहोत, ते त्यांच्या मेहनतीमुळेच. त्या सगळ्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना मनापासून सलाम.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
माजी CIA अधिकारी रिचर्ड बार्लो यांनी एक आश्चर्यकारक खुलासा करत म्हटले की, अमेरिकन सरकारला माहित होते की पाकिस्तानकडे त्यांच्या एफ-16 विमानांवर अण्वस्त्रे तैनात करण्याची क्षमता आहे, परंतु तरीही शीतयुद्धातील मदत सुरू ठेवण्यासाठी इस्लामाबादकडे “अण्वस्त्रे नाहीत” म्हणून प्रमाणित केले. “आम्ही अण्वस्त्रे हवाई तळांवर हलवताना आणि एफ-16 विमानांवर ठेवण्यात येत असल्याचे पाहिले,” असे बार्लो यांनी ANI ला सांगितले, त्याने “क्यूबन क्षेपणास्त्र संकटानंतरची सर्वात भयानक गोष्ट” असे वर्णन केले. त्यांनी पुढे म्हटले की, त्यानंतरच्या अमेरिकन प्रत्येक राष्ट्रपतींनी व “CIA या गुप्तचर यंत्रणेने दुर्लक्ष केले. आणि तरीही पाकिस्तानकडे अण्वस्त्रे नाहीत हे प्रमाणित केले.” 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला भारत आणि इस्रायलने पाकिस्तानच्या "कहुटा" अणुसुत्रावर बॉम्बहल्ला करण्याच्या प्रस्तावित संयुक्त गुप्त कारवाईमुळे इस्लामाबादची अणु महत्त्वाकांक्षा थांबली असती तर "बऱ्याच समस्या सोडवता आल्या असत्या." हे बरोबर आहे! पण तत्कालीन सरकार ही कारवाई करू शकली नाही. हा गौप्यस्फोट आणि ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींनी उच्चारलेले वाक्य आम्ही पाकिस्तानचे आण्विक खोटारडेपणा कायमचा नष्ट केला आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला एक सोन्याचा दिवस ठरला. सततच्या पराभवांनी वैफल्यग्रस्त झालेला काँग्रेस पक्ष आणि देशावर राज्य करणे हा आपला वंशपरंपरागत हक्क असल्याच्या भ्रमात वावरणारे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर सतत चिखलफेक करून भारतातील निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता नष्ट करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न चालविला आहे. बिहारच्या जनतेने काल या प्रयत्नांना सणसणीत चपराक दिली. बिहार विधानसभेसाठी होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात काल विक्रमी मतदान झाले आणि मतदानाचा टक्का बिहारमध्ये 1951 पासून झालेल्या निवडणुकांच्या इतिहासात सर्वाधिक राहिला. एकही आक्षेप न नोंदवली गेलेली, मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाची पारदर्शकपणे पार पडलेली #SIR प्रक्रिया आणि काल झालेले विक्रमी मतदान यांनी भारतातील लोकशाही व निवडणूक प्रक्रिया ठणठणीत असल्याची ग्वाही दिली आहे. या कामगिरीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेशकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
🔽
#FromTheDeskOfAbhijeetRane #DevendraFadnavis #CMOMaharashtra #Opinion #Analysis #Politics #CurrentAffairs #IndiaNews #Breaking #Insight #Editorial #Security #Democracy #GlobalAffairs #Geopolitics #Truth












Comments