🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 3 hours ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नागपूर खंडपीठाने नुकताच एक स्पष्ट आणि सकारात्मक निर्णय दिला आहे. बौद्ध धर्मीय व्यक्तींना अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करता येणार नाही, आणि त्यामुळे त्यांना अट्रॉसिटी कायद्यांतर्गत संरक्षण मिळणार नाही. हा निर्णय केवळ कायदेशीर दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तर सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्याही विचार करायला लावणारा आहे. बौद्ध धर्म स्वीकारलेली व्यक्ती अनुसूचित जातीच्या विशेषाधिकारांची मागणी करू शकत नाही. उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की, बौद्ध धर्म हा स्वतंत्र धर्म आहे, तो जात नाही. त्यामुळे अनुसूचित जातींवरील अन्याय किंवा अट्रॉसिटी कायद्याखाली बौद्ध धर्मीयांना संरक्षण मागण्याचा अधिकार नाही.हा निर्णय ऐतिहासिक आहे. अनुसूचित जातींमध्ये काही समुदायांनी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी, त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना जातीय संरक्षण कायमस्वरूपी लाभत राहील. धर्म आणि जात यातील सीमारेषा स्पष्ट करण्याचा हा निर्णय कायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. बौद्ध धर्मीयांनी स्वतःच्या हक्कांसाठी स्वतंत्रपणे लढा द्यावा, पण अनुसूचित जातींसाठी असलेल्या आरक्षण व कायदेशीर संरक्षणाचा अन्यायकारक गैरवापर होऊ नये, हीच या निर्णयाची प्रमुख भूमिका आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नाही, तर महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेच्या अधःपतनावर हा शिक्कामोर्तब आहे. एक वैद्यकीय अधिकारी पोलिसांना खोटे फिटनेस प्रमाणपत्र देत नाही असे म्हणते आणि तिला त्रास देण्यास सुरुवात होते. या कालावधीत ती 21 वेळा वैद्यकीय आणि पोलिसांच्या वरिष्ठाकडे तक्रार देते.. 6 महिन्यात तिच्यावर 4 वेळा बलात्कार केला जातो पोलिसांकडून बदला म्हणून आणि ही बाब स्थानिक खासदाराला माहिती असते, त्यांच्याकडे सुद्धा ती तक्रार करते आणि तरी ती सुरक्षित होऊ शकत नाही आणि एक दिवस ती आत्महत्या करते, दोषी कोण?, एक असेल तर नाव घ्यावं, संपूर्ण प्रणालीच येथे दोषी आहे. वैद्यकीय डिन, खासदार, जिल्ह्याचा एस पी. गृहखाते आणि एकंदर भ्रष्ट आणि कायदयाचं भक्षक असलेली प्रणाली. एक तरुण, प्रामाणिक डॉक्टर नैराश्यातून मृत्यूला कवटाळते. महाराष्ट्र शासनाच्या तोंडाला काळिमा फासणारी ही घटना आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बांगलादेश: नव्या संघर्षाच्या उंबरठ्यावर? जागतिक राजकारणात सध्या अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यातील वर्चस्वाची लढाई निर्णायक टप्प्यावर आहे. व्यापार, संसाधने आणि प्रभावाच्या या संघर्षात तिसऱ्या जगातील देशांचे भवितव्य धोक्यात आले आहे. अरब राष्ट्रांपासून युक्रेन, इराण, पाकिस्तानपर्यंत अनेक देश या संघर्षात चिरडले गेले. आता बांगलादेश या वावटळीत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोबेल विजेते युनूस यांची भूमिका आणि त्यांच्यावरचे आरोप, तसेच आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांचे हस्तक्षेप, हे बांगलादेशच्या अंतर्गत स्थैर्याला हादरा देणारे ठरत आहेत. भारताशी असलेली भौगोलिक आणि राजनैतिक जवळीक या देशासाठी वरदान ठरू शकते, पण तीच गोष्ट त्याला संघर्षाच्या केंद्रस्थानीही आणू शकते. या तीन हत्तींच्या लढाईत जगातील ‘गवत’ चिरडले जात असताना, बांगलादेश पुढचा बळी ठरणार का, हाच गंभीर प्रश्न आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
संघावर बंदी की संवादाचा मार्ग? छत्रपती संभाजीनगरातील ‘जॉइन आरएसएस’ मोहिमेवरून निर्माण झालेला तणाव आणि त्यानंतर सुजात आंबेडकर यांची संघावर बंदीची मागणी ही केवळ प्रतिक्रियात्मक राजकारणाचे लक्षण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर यापूर्वीही तीन वेळा बंदी घालण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रत्येकवेळी ती उठवण्यात आली. संघाच्या कार्यपद्धतीवर मतभेद असू शकतात, पण बंदी हा उपाय नव्हे. लोकशाहीत विचारांचा मुकाबला विचारांनीच व्हावा, हीच परंपरा आहे. संघाच्या शाखांमध्ये शिस्त, संघटन आणि सामाजिक कार्यावर भर दिला जातो, हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र, संघाच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर टीका करणाऱ्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे, मतभिन्नता असली तरी ती दडपशाहीने नव्हे, तर वैचारिक चर्चेनेच मिटवावी लागेल. अन्यथा, बंदीची मागणी ही लोकशाहीच्या मूल्यांनाच आव्हान ठरेल. समाजात संवाद हवा, संघर्ष नव्हे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
१९७२ च्या दुष्काळात खेड्यापाड्यातील सामाजिक स्थलांतराची सुरुवात झाली. मराठवाडा, विदर्भातून पुणे-मुंबईकडे आलेल्या दलीत समाजाने चाळीत, झोपडपट्ट्यांत आपले अस्तित्व टिकवले. विशेषतः बौद्ध समाजाने या शहरांमध्ये आपले पाय रोवले. आज मुंबईत जो काही मराठी टक्का शिल्लक आहे, त्यात याच समाजाचा मोठा वाटा आहे. सवर्ण मराठी मात्र उपनगरांत, नव्या वस्त्यांत विसावले. या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांचे राजकीय प्रवेश हे केवळ एक ‘लॉन्चिंग’ नाही, एका मोठ्या वोट बँकेला एकत्र करण्याचा प्रयास आहे. काँग्रेस आणि तथाकथित प्रगतीशील उबाठा गटासाठी हा स्पष्ट इशारा आहे. आता या मतांचा प्रवाह महा विकास आघाडीकडे जाणार नाही. सुजात आंबेडकर हे या समाजाचे नेतृत्व म्हणून उभे रहात आहेत. सुजात हे नव्या पिढीच्या आकांक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पाच-दहा नगरसेवक निवडून येतीलच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, रिपब्लिकन चळवळीला एक तरुण चेहरा मिळतो आहे.
🔽
#Justice #LawAndSociety #SystemFailure #HumanRights #GlobalPolitics #BangladeshCrisis #Democracy #DialogueNotBan #SocialChange #Leadership #AbhijeetRaneWrites












Comments