top of page

मुंबईच्या विकासाचा 'अँग्री यंग मॅन' ते 'व्हिजनरी लीडर'; अमित साटम यांचा धडाडीचा प्रवास

  • dhadakkamgarunion0
  • 2 hours ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]


▪️==================▪️


मुंबईच्या विकासाचा 'अँग्री यंग मॅन' ते 'व्हिजनरी लीडर'; अमित साटम यांचा धडाडीचा प्रवास


● मुंबई भाजपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून अमित साटम यांनी पक्ष संघटनेत चैतन्य फुंकले आहे. ‘मुंबईचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा’ असे म्हणत त्यांनी केवळ टीका करण्यापेक्षा 'डेव्हलपमेंट मॉडेल' लोकांसमोर मांडण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारींची दखल घेणे आणि प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणे ही साटम यांची खासियत आहे. सामान्यांसाठी उपलब्ध असलेला नेता ही त्यांची प्रतिमा त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळी ठरवते. अमित साटम यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून नाही, तर मुंबईच्या नागरी समस्यांची सखोल जाण असलेला नेता म्हणून आहे. त्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे आणि केलेली कामे मुंबईकरांसाठी आश्वासक ठरत आहेत. महापालिकेतील विविध कामांमधील अनियंत्रित कारभारावर साटम यांनी वेळोवेळी पुराव्यासह बोट ठेवून पारदर्शकतेचा आग्रह धरला आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यात साटम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


© -अभिजीत राणे


(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page