युवाशक्तीला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि हक्काच्या रोजगाराची जोड; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
युवाशक्तीला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि हक्काच्या रोजगाराची जोड; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय
● राज्यातील युवा वर्गाला जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन स्किल्ड वर्कफोर्स घडवण्याचा निर्धार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा-महायुती सरकारने केला आहे. याच अनुषंगाने 'पीएम सेतू' योजनेद्वारे राज्यातील आयटीआय संस्था आता जागतिक स्तरावर झेप घेण्यास सज्ज आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर, संभाजीनगर आणि पुणे या जिल्ह्यांतून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, त्यानंतर ही योजना लवकरच प्रत्येक जिल्ह्यातील आयटीआय संस्थांमध्ये सुरु करण्यात येईल. युवकांच्या आयुष्यातील अनिश्चितता संपवून त्यांना आर्थिक स्थैर्य देणारा हा 'विकास सेतू' राज्याच्या प्रगतीची नवी पायाभरणी करेल. महाराष्ट्रातील युवाशक्तीला अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. युवकांच्या आयुष्यातील बेरोजगारीची आणि अनिश्चिततेची भीती संपवण्यासाठी हा 'विकास सेतू' मैलाचा दगड ठरेल. या योजनेअंतर्गत 'हब आणि स्पोक' मॉडेलचा वापर केला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रगत प्रयोगशाळा आणि आधुनिक यंत्रसामग्रीवर सराव करण्याची संधी मिळेल. हा उपक्रम महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीची नवी पायाभरणी करणारा ठरणार आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments