🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 20
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
२१ जुलै ला संसदेचे पावसाळी सत्र सुरू होणार असून पुढे एक महिना चालणार आहे याकाळात राहुल गांधीला संसदेत पाकिस्तान ने भारताची किती जेट विमाने मे २०२५ मध्ये झालेल्या लढाईत पाडली ? हा प्रश्न विचारता येईल.पण तिथे हा प्रश्न तो विचारणार नाही आणि समाज माध्यमांवर विचारलेल्या त्याच्या प्रश्नाला मोदी कधीच उत्तर देणार नाहीत.त्यामुळे मग राहुल गांधीला मोदींच्या नावाने बोंबलायला आणखी एक संधी मिळेल. राहुल गांधी जे काही प्रश्न समाज माध्यमांवर विचारतो त्यांना मोदी का उत्तरे देत नाहीत? कारण मोदींनी या राहुल गांधी ला एकदाच उत्तर दिले आहे की हे पहा,तुम्ही खासदार आहात.तुम्हाला जर तुमच्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर संसदेचे अधिवेशन सुरू असताना तिथे तुमचे प्रश्न विचारा. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही देशाच्या सुरक्षा समितीचे एक सदस्य सुद्धा आहात.देशाच्या सुरक्षे संबंधीचे तुमचे प्रश्न त्या त्या विषयांच्या चर्चेवेळी तुम्ही सुरक्षा समितीच्या बैठकीत विचारू शकता.मात्र तुम्ही तसे न करता समाज माध्यमांवर सुरक्षेसंबंधी कोणतेही प्रश्न विचारलेत तर त्याचे उत्तर दिले जाणार नाही. तरीही तो तीच गोष्ट वारंवार करून जाणीवपूर्वक मोदींच्या विरुद्ध वातावरण निर्मिती करतो आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
माँरीशस जवळचा भारताचा गुप्ततळ सध्या अमेरिकेची झोप उडवण्यात यशस्वी ठरला आहे. “अँगलेगा आयलेंड " माँरीशस जवळ असणारे भारतीय सिक्रेट बेस असणारे लष्करी तळ सध्या अमेरीका युरोप ची चिंता वाढवणारे आहे ,२६ किमी लांबी व ७ किमी रूंदी असणारी पट्टी भारताने १०० वर्षासाठी लिज वर माँरीशस कडून घेतली आहे तिथे सध्या ३ किमी रनवे व मोठी विमाने बसणारे मोठे हँगर सोबत मिल्टृी चे प्रेझेंस सध्या चर्चेचा विषय आहे . १५ दिवसापुर्वी अल जझीरा " या कतार च्या न्युज चँनेलने १ तासाची डाँक्युमेंटृी या सिक्रेट बेस ची माहिती जगाला पुरविली भारतीय अवँक्स विमाने यावर सदैव तयार असतात , ब्रिटीश F35 विमान जे राँयल नेव्ही च्या जहाजावरून उडाल्यापासुन त्यावर नजर ठेवण्याचे काम याच बेस वरून करण्यात आले ,शेवटी ते ञिवेंद्रम (केरळ )येथे उभारून आहे .तहव्वूर राणा ला विमानाने भारतात आणताना सर्व्हीलेंस करणारे अवँक्स येथूनच उडाले होते .मल्लाका स्टृेट जवळ भारत चीनची नाकेबंदी करू शकतो ,तसेच अँगलेगा आयलेंड वरून दक्षिण अफ्रिका , मँडागास्कर खंडा पर्यंत आपला प्रभाव ठेवतो . आता चीन आणि अमेरिका दोघांवर समुद्रात आपले लक्ष असणार आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आसाम विधानसभेचा निकाल राहुल गांधी यांनी आत्ताच लावून टाकला आहे. पुढच्या वर्षी आसाम मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ही लढत गौरव गोगोई विरुद्ध हिमंता बिस्व सरमा अशी होईल अशी चिन्हे होती. पण केवळ मुसलमानांना खुश करण्यासाठी, हिमंता बिस्व सरमा यांना जेल मध्ये टाकायची भाषा करून काल राहुल गांधी यांनी सगळी समीकरणेच बदलून टाकली आहेत. आता ही लढत थेट राहुल गांधी विरुद्ध हिमंता अशी केली आहे!!एक लोकप्रिय, यशस्वी मुख्यमंत्री जो जिहादी मानसिकतेच्या विळख्यातून आसामची सुटका करतोय, स्थानिक आसामींच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक ओळखीच्या रक्षणासाठी काम करतोय, अहोरात्र झटतोय.. तो जिथे त्या स्थानिक गोगोईला गेल्या 10 वर्षात डिकोड करायला जमलं नाही, तिथे काँग्रेसने राहुल गांधी ला समोर आणून खूप मोठा सेल्फ-गोलच केलाय. भाजप आणि हिमंता यांचे काम त्यामुळे अजून सोपे झाले आहे. आसाम मधील संपूर्ण हिंदू समाज हिमंता बिस्व सरमा यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून काँग्रेस आणि राहुलचं आसामला पुन्हा दहशतवाद, अराजकता आणि इस्लामी कट्टरतेच्या काळ्याकुट्ट भूतकाळात ढकलण्याचं स्वप्न हिंदू समाज 100% उध्वस्त करणार आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
तीन-चार दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर पत्रकारांबरोबर बोलत असताना पडळकरांवर राजकीय वैमनस्यातून पडलेल्या खोट्या केसचा संदर्भ घेऊन शेरेबाजी केली. त्यावर काल पडळकर यांनी आव्हाड यांना शिवीगाळ केली केली आणि आज कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. सत्तेमध्ये असताना अनंत करमुसे, सुरज वडगावकर यांच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना स्वतःवरचे विनोदी मीम व्हायरल केले म्हणून घरात नेऊन काठ्या बेल्ट व बॅटन यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत झोडपणारे खोटे एफ आय आर टाकून सर्वसामान्य नागरिकांना केसेस मध्ये गोवणारे आव्हाड मला मारण्याचा कट होता म्हणून रडत आहेत. पडळकर सारखा माणूस सत्तेमध्ये नसताना सुद्धा जेंव्हा भाजपचा आवाज बुलंद करत होता, हजारो विरोधक अंगावर घेत होता तोच व्यक्ती आता जेव्हा पस्तीस हजार मताने लोकातून निवडून आलेला आहे. सत्तारूढ पार्टीमध्ये आहे त्यावेळी जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाच्या शिव्या ऐकून घ्यायला तो काही रिकामा बसलेला नाही. तुमची सत्ता असताना तुम्ही ज्या पद्धतीने अनिर्बंध सत्ता राबवली ती गोष्ट काळ आल्यानंतर तुमच्यावर फिरून उलटल्यावर आता रुदाल्या का गायल्या जात आहेत?
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर यांनी एक काम असे केले आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमी त्यांचे आभार मानतील. भारताला स्वातंत्र्यमिळून 80 वर्षे होत आली. महाराष्ट्र राज्य अस्तीत्वात येऊन 65 वर्षे झाली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याला असणार्या गावाचे नाव मात्र छत्र निजामपुर असे इस्लामी होते. आजवर एकाही राज्यकर्त्याला हे नाव बदलावे वाटले नव्हते. परंतु गोपीचंदजींनी हा विषय देवेन्द्रजींच्या समोर मांडला आणि तत्काल शासकीय आदेश निघाला. यापुढे रायगडच्या पायथ्याशी असलेल्या छत्र निजामपुर ग्रामपंचायतीचे नाव बदलून आता रायगडवाडी असे केले गेले आहे. शिवसेना असेल किंवा शरद पवार या सगळ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त राजकारण केले परंतु देवेन्द्रजींनी मात्र महाराजांच्या किल्ल्यांना यूनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट करवून त्यांच्या संवर्धंनाचे आणि जागतिक पातळीवर महाराजांचे नाव पोचवण्याचे कार्य हाती घेतले आहे. मुघली राजवटीच्या निशाणी ठरणार्या प्रत्येक गावाचे , शहराचे आणि ग्रामपंचायतीचे नाव बदलून त्यांना मूळ ओळख प्रदान केली जात आहे. देवेंद्रजी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे शोभतात.
🔽







Comments