top of page

शरद पवार हा माणूस अशक्य आहे. त्यांच्या इतका पराकोटीचा...

  • dhadakkamgarunion0
  • 5 days ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

शरद पवार हा माणूस अशक्य आहे. त्यांच्या इतका पराकोटीचा द्वेष कोणीही करू शकत नाही. त्यांच्या इतका हुशार राजकारणी दूसरा कोणीही नाही. त्यांना राज्यसभा खासदार व्हायचे होते महाविकास आघाडी च्या इतर पक्षांनी विरोध करू नये आणि भाजपाने सुद्धा निवडून आणावे म्हणून ते राजकीय आजारी पडले, रुबी हॉल मध्ये अॅडमिट झाले आणि राज्यसभा निवड पक्की झाल्यावर टूणटुणीत होऊन बाहेर आले. त्यांचे आणि अजित पवारांचे ताणलेले संबंध सर्वश्रूत आहेत. त्यामुळे अजित दादांच्या पत्नी सुमित्राताईंच्या अनुकंपा आमदारकीला विरोध करणे तर शक्य नाही म्हणून आता परत एकदा मतदानापूर्वी राजकीय आजारी पडले असून त्यांनी मतदान करता येत नाही म्हणून व्यथा व्यक्त करणारी एक मोठ पोस्ट सुद्धा दवाखान्यात बसून खरडली आहे. .

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आझिम प्रेमजी युनिव्हर्सिटीतील “Annihilate Hinduism” सेमिनार, नाशिक टीसीएसमधील कॉआझिम प्रेमजी युनिव्हर्सिटीतील “Annihilate Hinduism” सेमिनार, नाशिक TCS मधील कॉर्पोरेट जिहाद, लेन्सकार्टमध्ये बिंदी-तिलकावर बंदी पण हिजाबाला मोकळीक, आणि दाढी ठेवून साडी-इअररिंग्ज घालणाऱ्या व्यक्तीचे प्रदर्शन—हे सगळे वेगळे प्रसंग नाहीत. या मागे आहे एकच विचारसरणी: सांस्कृतिक मार्क्सवाद आणि ‘वोक’ अजेंडा, ज्याने जिहादी इस्लामशी हातमिळवणी करून पश्चिमी संस्कृतीला हादरवले आणि आता भारतातही पाय रोवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिक्षण, मीडिया, मनोरंजन, कॉर्पोरेट—सर्व क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवून ते आकर्षक शब्दांच्या आडून विध्वंसाचे बीज पेरतात. या मुखवट्यांमागचा खरा चेहरा ओळखणे आणि त्याला तोंड देणे हे आपल्या संस्कृती, धर्म आणि देशाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहे

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जनआक्रोश महिला यात्रेत घडलेला प्रसंग गिरीश महाजनांच्या राजकीय प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे. नेत्यांच्या रॅलीमुळे झालेल्या ट्रॅफिक जामवरून एका महिलेने थेट जाब विचारला काढले, हे वेगळ्याच प्रकारचे नारी वंदन झाले आहे . याआधीही प्रजासत्ताक दिनी वनविभागातील महिलेने महाजनांना असेच नारी वंदन केले होते. दोन्ही वेळा ‘संकटमोचक हनुमान’ म्हणून ओळखले जाणारे गिरीशजी संकटापासून पळ काढताना दिसले. यातून हे सिद्ध होते आहे की जनतेचा आक्रोश आता थेट सत्ताधाऱ्यांवर संतापाच्या रूपाने उमटतो आहे. लोकशाहीत सत्ता कितीही मोठी असली तरी जनतेचा आवाज त्याहून मोठा असतो. महाजनांसारख्या अनुभवी नेत्यांनाही या आक्रोशापुढे मागे हटावे लागते, हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. हा प्रसंग राजकारणात जनतेच्या असंतोषाची नवी दिशा दाखवतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

२००७ च्या गुजरात निवडणुकीत सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना “मौत का सौदागर” म्हटले, पण मोदींनी एक शब्दही न बोलता मतदारांवर विश्वास ठेवला. निकाल लागला आणि भाजपने ११७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेले शीर्षक “Vote ka Saudagar” हेच जनतेचे उत्तर होते. मोदींची खासियत म्हणजे ते टीकेला थेट प्रतिसाद देत नाहीत; मतदारच मतपेटीतून निकाल लावतात. आज काँग्रेसचे कामचलाऊ अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संघाच्या स्वयंसेवकांवर “देशद्रोही”चा आरोप करून ऐतिहासिक पाप केले आहे. नेहरू, पटेल, इंदिरा गांधी, नरसिंहराव यांनी संघावर बंदी घातली होती, पण कधीही स्वयंसेवकाला देशद्रोही म्हटले नाही. खरगेजींना मतदारच चोख उत्तर देतील—सूद दर सूद—कारण लोकशाहीत अंतिम निर्णय मतपेटीचाच असतो

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बंगालच्या मागील निवडणुकीत भाजपाने प्रचंड हवा केली होती, पण तृणमूल कार्यकर्त्यांच्या दहशतीचा अंदाज न आल्याने सत्ता मिळवता आली नाही. मोदी-शहा यांच्याकडून झालेल्या या miscalculation मुळे समर्थक संतप्त झाले, कारण नंतर तृणमूलच्या गुंडांनी भाजपाला मदत करणाऱ्यांवर हल्ले केले, घरे जाळली, खूनही केले. यावेळी मात्र केंद्र सरकारने दोन लाख केंद्रीय सुरक्षा जवान नेमले आहेत, जे मतदानानंतरही काही काळ राहतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिक निर्भयपणे मतदान करतील, ही लोकशाहीसाठी महत्त्वाची बाब आहे. भाजपाने १०० जागा ओलांडल्या तर ममता बॅनर्जीचा आक्रस्ताळेपणा कमी होईल आणि राजधर्म पाळावा लागेल. काँग्रेस-डाव्यांशी भाजपाने जुळवून घेतले तर लोकसभेतील कटुता कमी होईल. दीर्घकालीन लाभासाठी द्विपक्षीय लोकशाहीकडे वाटचाल हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page