मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्यावर मोठी धुरा!
- dhadakkamgarunion0
- Dec 4
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्यावर मोठी धुरा!
● भाजपाचे मुंबईतील एक आक्रमक आणि अनुभवी चेहरा म्हणून अमित साटम यांची ओळख आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून, महायुतीचा झेंडा पालिकेवर फडकवण्याचे त्यांचे ध्येय आहे. साटम यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे हे पाऊल महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अमित साटम यांनी पदभार स्वीकारताच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा धडाका लावला आहे. मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आणि त्यानंतर प्रत्येक वॉर्डातील राजकीय परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात येत आहे. वॉर्डनिहाय ताकद, समस्या आणि विरोधी पक्षांची स्थिती याची माहिती गोळा करून त्यानुसार संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. ज्या वॉर्डांमध्ये भाजपाची ताकद कमी आहे, तिथे सदस्य नोंदणी वाढवून पक्षसंघटन विस्तारण्याचे स्पष्ट आदेश साटम यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. अमित साटम हे भाजपमध्ये २००० च्या दशकापासून सक्रिय आहेत. त्यांची आक्रमक कार्यशैली आणि विकासकामांवर भर देण्याची वृत्ती निवडणुकीत पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments