top of page

जय भीम’ म्हणता म्हणता कायद्यानेच केला ‘जय भीम’! कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते...

  • dhadakkamgarunion0
  • 11 hours ago
  • 3 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

‘जय भीम’ म्हणता म्हणता कायद्यानेच केला ‘जय भीम’! कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका कायम “जय भीम म्हणजे समानतेचा नारा” असे सांगत समाजाला समतेचे डोस पाजत असतात. पण आता नियतीने त्यांच्यासाठी भन्नाट प्रात्यक्षिकच आयोजित केल्याचे दिसते! दलित भगवान सहाय धानका यांच्या तक्रारीवरून रांका यांच्याविरुद्ध मारहाण, अडवणूक, धमकी आदी आरोपांसह SC-ST कायद्यातील कलमांखालीही गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. म्हणजे कालपर्यंत ज्या कायद्याच्या समर्थनार्थ व्याख्याने दिली, आज त्याच कायद्याच्या कलमांनी दारावर टकटक केली! आरोप सिद्ध झाले की नाही, हे अर्थात न्यायालय ठरवेल. पण राजकीय विनोद मात्र तयार आहे—समानतेचा नारा देणाऱ्यालाही कायदा समानतेने लागू झाला पाहिजे! भगवान सहाय यांनी बहुधा एवढेच सांगितले असावे— “भाईसाहब, जय भीम फक्त म्हणायचा नसतो… कधी कधी अनुभवायचाही असतो!”

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

पीएम केअर्स फंडाबाबत नव्याने समोर आलेल्या आकडेवारीमुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. हा फंड सरकारी असेल तर त्याचे CAG ऑडिट आणि RTI अंतर्गत पारदर्शकता का नाही? आणि तो खासगी सार्वजनिक न्यास असेल तर पंतप्रधान त्याचे पदसिद्ध अध्यक्ष, केंद्रीय मंत्री पदसिद्ध विश्वस्त आणि वेबसाईट .gov.in डोमेनवर कशी? उपलब्ध हिशेबानुसार 2023-24 मध्ये सुमारे ₹7,173 कोटी आणि 2024-25 मध्ये ₹8,452 कोटींची शिल्लक असताना अनुक्रमे अवघे ₹15.60 कोटी आणि ₹0.88 कोटी खर्च झाल्याचे दिसते. मग एवढी प्रचंड रक्कम नेमकी कशासाठी साठवली आहे? हजारो कोटींच्या निधीचे CAGऐवजी खासगी CA फर्मकडून ऑडिट पुरेसे मानायचे का? पीएम केअर्समध्ये गैरव्यवहार झाला असा आरोप पुराव्याशिवाय करता येणार नाही; पण सार्वजनिक देणग्यांच्या हजारो कोटींचा प्रश्न असेल तर संशयाला उत्तर एकच—कमाल पारदर्शकता!

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

आयफोन, इन्स्टा, रील्स आणि Gen-Z—आजच्या पिढीला मिळालेल्या सुविधा पाहताना त्या उभ्या करण्यासाठी मागच्या पिढ्यांनी काय भोगले, हेही सांगितले पाहिजे. एकेकाळी दोन वेळचे अन्न, स्वच्छतागृह, गॅस, टेलिफोन, स्कूटर तर सोडाच साधी सायकल, चांगला रस्ता आणि वेळेवर पोहोचणारे पत्रसुद्धा अनेकांसाठी चैनीच्या गोष्टी होत्या. सरकारी काम म्हणजे महिन्यांची पायपीट आणि सरकारी योजना म्हणजे कागदपत्रांचा डोंगर! आज इंटरनेट, एक्सप्रेसवे, डिजिटल व्यवहार, स्वच्छ इंधन आणि घरपोच सेवा सहज मिळतात म्हणून त्या आकाशातून पडलेल्या नाहीत. अनेक पिढ्यांच्या कष्टातून भारत इथपर्यंत पोहोचला आहे. “हम लाये हैं तूफान से कश्ती निकाल के…” हे केवळ जुन्या चित्रपटातील गीत नव्हते; ती एका पिढीची जबाबदारी होती. आता ही कश्ती Gen-Zच्या हाती आहे. नव्या पिढीला दोष देण्यापेक्षा तिला इतिहास समजावून सांगणे ही आपली जबाबदारी आहे!

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

मोदी-शहा यांची खरी ताकद केवळ भाजपाचा IT Cell कधीच नव्हता; सोशल मीडियापासून प्रत्यक्ष मैदानापर्यंत स्वतःहून लढणारे लाखो समर्थक ही त्यांची खरी ताकद होती. त्यात सवर्ण समाजाचा मोठा वाटा होता. विरोधकांचा प्रत्येक आरोप खोडून काढण्यासाठी हे लोक कोणत्याही आदेशाशिवाय पुढे येत होते. पण आज याच वर्गातील अनेकांना सातत्याने उपेक्षित आणि गृहीत धरले जात असल्याची भावना निर्माण झाली, तर ते शांत होणे स्वाभाविक आहे. आणि समर्थकांची ही शांतता कोणत्याही विरोधी आंदोलनापेक्षा भाजपासाठी अधिक धोकादायक ठरू शकते. IT Cell पगारावर चालू शकतो; राजकीय विश्वास पगारावर विकत घेता येत नाही! वर्षानुवर्षे अभेद्य भिंत बनून उभ्या राहिलेल्या आपल्या समर्थकांनाच दूर केले, तर विरोधकांचा प्रत्येक वार थेट नेतृत्वापर्यंत पोहोचणारच. राजकारणात समर्थन मागून मिळत नाही; ते सन्मान आणि विश्वासातून कमवावे लागते!

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*,

SC-ST कायदा आणि आरक्षणाचा प्रश्न इतका राजकीयदृष्ट्या संवेदनशील झाला आहे की कोणताही मोठा पक्ष त्याविरोधात स्पष्ट भूमिका घेण्याची हिंमत करत नाही. उलट प्रत्येक निवडणुकीत अधिक प्रतिनिधित्व, अधिक सवलती आणि अधिक आरक्षणाच्या मागण्यांची स्पर्धा वाढत चालली आहे. दुसरीकडे सवर्ण समाजातील एक वर्ग आता संघटितपणे रस्त्यावर उतरून समान संधी, कायद्यापुढे समानता आणि आरक्षणव्यवस्थेच्या पुनरावलोकनाची मागणी करू लागला आहे. या संघर्षाला दलित विरुद्ध सवर्ण अशा सामाजिक युद्धात बदलू देणे सर्वांत घातक ठरेल. शिवीगाळ, हिंसा, धमक्या किंवा खोटे गुन्हे यांतून प्रश्न सुटणार नाही; उलट हिंदू समाजातच खोल दरी निर्माण होईल. मोदी सरकार असो किंवा पुढचे कोणतेही सरकार—या प्रश्नापासून कायम पळता येणार नाही. या आगीमध्ये सर्वप्रथम समाज नव्हे, मतपेटी जळेल; आणि जुन्या राजकीय समीकरणांची राख होईल!

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page