आक्रमक आणि सुशिक्षित नेतृत्व अमित साटम यांच्या हाती
- dhadakkamgarunion0
- 6 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
आक्रमक आणि सुशिक्षित नेतृत्व अमित साटम यांच्या हाती
● आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या चर्चा आणि महाविकास आघाडीचे आव्हान, या पार्श्वभूमीवर भाजपाने साटम यांच्या रूपाने एक आक्रमक चेहरा मैदानात उतरवला आहे. मुंबईच्या विकासावर आणि पारदर्शक प्रशासनावर त्यांचा भर राहणार आहे. साटम यांनी महायुतीतील अंतर्गत समन्वयाची गरज असल्याचे बोलून दाखवले आहे, तसेच ठाकरे गटावर टीका करताना मुंबईतील कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे वारंवार उपस्थित केले आहेत. मुंबईकरांना चांगल्या सुविधा देणे हे आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या युवा मोर्चातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम केल्यामुळे त्यांना मुंबईतील स्थानिक समस्यांची माहिती आहे. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्यांची प्रतिमा सुशिक्षित आणि विचारशील नेता अशी झाली आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments