बॉम्बे'चे 'मुंबई' नामकरणात भाजपाचा मोठा वाटा; मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका
- dhadakkamgarunion0
- 13 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
बॉम्बे'चे 'मुंबई' नामकरणात भाजपाचा मोठा वाटा; मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका
● राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'बॉम्बे'चे नामकरण 'मुंबई' करण्यात भाजपाचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले आहे. केवळ शहराच्या नावापुरतेच नव्हे, तर जिथे जिथे 'बॉम्बे' हा शब्दप्रयोग वापरला जातो, तिथे तो हद्दपार होऊन त्या जागी 'मुंबई' हे नाव आले पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. या संदर्भात, त्यांनी आता 'आयआयटी बॉम्बे' या संस्थेचे नाव बदलून 'आयआयटी मुंबई' करावे, अशी मागणी केली असून लवकरच ते याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहेत. फडणवीस म्हणाले की, 'बॉम्बे'चे 'मुंबई' हे नामकरण केवळ भावनिक नाही, तर स्थानिक अस्मिता आणि सांस्कृतिक ओळख जपण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 'बॉम्बे' या नावाला मूळात पोर्तुगीज इतिहास आहे, तर 'मुंबई' हे नाव कोळी बांधवांची कुलदेवता मुंबादेवीच्या नावावरून आले आहे. या नामकरणाच्या लढ्यात भाजपाचे दिवंगत नेते रामाभाई नाईक यांचा मोठा वाटा आहे आणि ही ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यात भाजपाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ०४ मे १९९५ रोजी शिवसेना-भाजपा युतीच्या काळात महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अधिकृतपणे नामकरणाचा निर्णय घेतला होता.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments