पैसे वाटपाचा खोटा आरोप करून रवींद्र चव्हाणांना बदनाम करण्याचा डाव
- dhadakkamgarunion0
- 12 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
पैसे वाटपाचा खोटा आरोप करून रवींद्र चव्हाणांना बदनाम करण्याचा डाव
● सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाने निवडणुकीच्या काळात पैसे वाटले, हा आरोप पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांना जाणूनबुजून बदनाम करण्यासाठी हा 'खोटा प्रचार' केला जात आहे. विरोधक तथ्यहीन आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर वैयक्तिक टीका करून त्यांना लक्ष्य करण्याचा हा डाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाची वाढती ताकद आणि जनमानसातील त्यांची लोकप्रियता विरोधकांना सहन होत नाहीय. म्हणूनच, राजकीय सूडबुद्धीने त्यांच्या विरोधात अशा प्रकारचा अप्रचार केला जात आहे. सिंधुदुर्गातील काही विरोधी पक्ष जाणीवपूर्वक भाजपाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. निवडणूक आयोगाकडे किंवा कोणत्याही संबंधित प्राधिकरणाकडे या 'पैसे वाटप' संदर्भात कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही. निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी विरोधकांकडून हा 'राजकीय स्टंट' केला जात आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments