आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे माध्यम उरले नसून...
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे माध्यम उरले नसून, ते एका विशिष्ट षडयंत्राचे केंद्र बनत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या हिंदू तरुणींना लक्ष्य करण्याची एक नवी पद्धत समोर आली आहे. प्रेमाचे नाटक करून ओळख वाढवणे, त्यानंतर विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखवणे आणि शेवटी धर्मांतरासाठी दबाव टाकणे, असा एक ठराविक 'पॅटर्न' यात दिसून येतो.अनेक प्रकरणांमध्ये, पीडित मुलींना केवळ धार्मिकच नव्हे तर मानसिक आणि शारीरिक छळालाही सामोरे जावे लागते. प्रेमाच्या नावाखाली चालणारा हा धर्मांतराचा खेळ केवळ वैयक्तिक फसवणूक नसून, तो सामाजिक सौहार्दाला तडा देणारा प्रकार आहे. पालकांनी आणि तरुणांनी सोशल मीडियावरील अनोळखी लोकांशी संवाद साधताना सतर्क राहणे काळाची गरज आहे. केवळ कायद्याने नव्हे, तर सामाजिक जागरूकतेनेच अशा प्रवृत्तींना आळा घालता येईल. वाढती गुन्हेगारी पाहता, या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सरकार जाहीर करते की गॅस सिलेंडरची कमतरता नाही, पण नागरिकांचा अनुभव वेगळाच आहे. ४ मार्चला बुक केलेला सिलेंडर १२ मार्चला मिळतो, तोही अनेकदा एजन्सीच्या दारात जाऊन चौकशी केल्यानंतर. अॅपवर डिलिव्हरी दाखवली जाते, पण प्रत्यक्षात सिलेंडर मिळत नाही. शेवटी रात्री उशिरा सिलेंडर येतो, पण वाढीव दर आकारला जातो, पावती दिली जात नाही, आणि OTP प्रक्रियाही टाळली जाते. हा प्रकार फक्त पैशाचा नाही, तर भ्रष्ट वृत्तीचा आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तर प्रशासन मौन बाळगते. ही सुरुवात आहे, पुढे परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिकांचा सन्मान यांची मागणी आता अधिक तीव्रतेने करावी लागेल. काळाबाजार करण्याची लोकांची प्रवृत्ती सरकारने ठेचून काढणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतावर थेट परिणाम नसला तरी अप्रत्यक्ष धोका नक्कीच आहे. कारण जगातील ९५% पेक्षा जास्त डेटा समुद्राखालील फायबर-ऑप्टिक केबल्समधून जातो. भारताला युरोपशी जोडणाऱ्या SEA-ME-WE, I-ME-WE आणि FLAG सारख्या केबल्स रेड सी व अरब समुद्रातून जातात. युद्धामुळे जहाजांची हालचाल, लष्करी कारवाया आणि बंदिस्त क्षेत्रे वाढतात, ज्यामुळे या केबल्सना नुकसान होऊ शकते. मात्र इंटरनेट एकाच मार्गावर अवलंबून नसते; पर्यायी मार्गांमुळे पूर्ण बंद होण्याची शक्यता कमी असते. तरीही विलंब, latency आणि फायनान्शियल ट्रेडिंगवर परिणाम होऊ शकतो. ही परिस्थिती दाखवते की आधुनिक जगाची खरी ताकद सैन्यात नाही, तर समुद्राखालील त्या फायबरच्या धाग्यांमध्ये आहे. सीमा आता जमिनीवर नाहीत, तर डिजिटल पायाभूत सुविधांच्या नसा आहेत. जग खर्या अर्थाने ग्लोबल विलेज झाले असून इथे प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
इस्रायल–इराण युद्धाने एक महत्त्वाचा धडा दिला आहे. तिथे सरकार आणि विरोधक रणांगणावर एकत्र उभे राहतात. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आला की कोणताही नेता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या राष्ट्राची प्रतिमा मलिन करत नाही. शत्रूला मदत होईल अशी गुपिते उघड केली जात नाहीत. ‘राष्ट्र प्रथम’ ही त्यांची मानसिकता आहे. दुर्दैवाने भारतात परिस्थिती उलट दिसते. सर्जिकल स्ट्राईकसारख्या कारवायांवर पुराव्यांची मागणी केली जाते, परदेशात जाऊन लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. शत्रूच्या आकड्यांवर विश्वास ठेवून आपल्या सैन्याच्या शौर्यावर संशय घेतला जातो. ही वृत्ती देशाच्या सुरक्षेसाठी बाह्य शत्रूपेक्षा अधिक घातक आहे. अंतर्गत विषयांवर सरकारला घेरणे योग्य आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर देशविघातक वक्तव्ये टाळली पाहिजेत. राष्ट्र प्रथम हीच खरी लोकशाहीची कसोटी आहे. परंतु आपल्याकडील वाचाळ मीडियाला तितके तारतम्य नाही आहे ना आपल्याकडील विरोधीपक्षांमध्ये तितकी राष्ट्रभक्ती शिल्लक उरली आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कोरोना काळाने दाखवून दिले की रोगापेक्षा भीती अधिक घातक ठरते. रुग्णालये, डॉक्टर, नर्सेस यांनी घाबरून रुग्णांना हात लावला नाही, तर मीडिया सततच्या भीतीदायक बातम्यांनी लोकांना मानसिकदृष्ट्या खचवले. अँब्युलन्सचे सायरन, टीव्हीवरील ओरड, सततचे आकडे — यामुळे अनेकांना स्ट्रेस, शुगर, बीपी, अॅसिडिटीसारखे आजार कायमचे लागले. काही तरुणांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. लसीकरणानंतरही रक्तगुठळ्या, अचानक मृत्यू, मानसिक अस्थिरता यासारख्या घटना दिसल्या. आज इराण युद्धाच्या निमित्ताने पुन्हा भीतीचे वातावरण तयार केले जात आहे — पेट्रोल संपले, गॅस नाही, शाळा बंद. लोक घाबरून जास्त पैसे देऊन सिलेंडर साठवतात. सरकार मात्र मौनात आहे. खरी समस्या म्हणजे भीतीचे विष समाजात पसरवले जाते. ही मानसिक महामारी थांबवणे हेच खरे राष्ट्रकार्य आहे.
🔽
#SocialMediaAwareness #DigitalSafety #CyberCrime #PublicAwareness #EnergyIssues #GasCylinder #BlackMarket #GlobalSecurity #MiddleEastConflict #DataCables #NationalInterest #MediaResponsibility #PublicHealth #FearPsychology #StayAlert








Comments