top of page

ठाकरे बंधूंना मुंबईकर धडा शिकवणार; अमित साटम यांना विश्वास

  • dhadakkamgarunion0
  • 11 minutes ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]

▪️==================▪️

ठाकरे बंधूंना मुंबईकर धडा शिकवणार; अमित साटम यांना विश्वास

● मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील कथित घोळावरून आणि 'वोट जिहाद'च्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीसह भाजपावरही टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ‘समाजात विष कालवण्याचे आणि लोकांना भाषिक, प्रांतीय तसेच जातीय आधारावर लढवण्याचे काम कुणीही करू नये. केवळ राजकारणासाठी अशा गोष्टींचा वापर करणे योग्य नाही,’ असे परखड मत साटम यांनी व्यक्त केले आहे. अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ‘ज्यांचे राजकारण जवळपास संपुष्टात आले आहे, असे लोक आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी समाजात भाषिक आणि प्रांताचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ अशी सणसणीत टीका साटम यांनी केली. भाषेचा उपयोग संपर्क साधण्यासाठी करायचा असतो, संघर्षासाठी नाही. परंतु काही राजकीय नेते आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि राजकारणाला हवा देण्यासाठी भाषिक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईतील मराठी माणसाच्या हितासाठी लढणारे नेते असल्याचा दावा करणाऱ्या ठाकरे बंधूंना मुंबईकर जनता नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वासही साटम यांनी व्यक्त केला.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page