अमित साटम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला
- dhadakkamgarunion0
- 9 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
अमित साटम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला
● भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा कब्जा मिळवण्यासाठी ‘मामूंची टोळी’ सक्रिय झाली असल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. अमित साटम यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असूनही मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते आणि शुद्ध पाणी मिळू शकले नाही, अशी टीका त्यांनी केली. 'मामूंच्या टोळी'ला केवळ कंत्राटदारांचे खिसे भरायचे आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपाने मुंबईकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 'आवाज मुंबईकरांचा' ही मोहीम राबवली असून त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्याचे त्यांनी सांगितले. अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाचा त्याग केल्याचाही आरोप केला. सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून ठाकरेंनी मुंबईच्या मराठी माणसाचा विश्वासघात केला आहे, असे ते म्हणाले. 'मामूंच्या टोळी'चे मनसुबे मुंबईकर उधळून लावतील आणि पारदर्शक कारभाराला पसंती देतील, असे साटम यांनी नमूद केले. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments