मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक; मित्रपक्षांच्या सामंजस्यावर सारे अवलंबून
- dhadakkamgarunion0
- 8 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक; मित्रपक्षांच्या सामंजस्यावर सारे अवलंबून
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती व्हावी अशी मनापासून इच्छा असल्याचे भाजपाच्या निवडणूक प्रभारींनी स्पष्ट केले आहे. मात्र, ही युती केवळ भाजपाच्या इच्छेवर अवलंबून नसून मित्रपक्षांच्या भूमिकेवरही तितकीच अवलंबून आहे. मित्रपक्षांनी जर जागावाटपाच्या बाबतीत सामंजस्य आणि समजूतदारपणा दाखवला, तरच ही युती प्रत्यक्षात येऊ शकते, असे सूचक संकेत भाजपाकडून देण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूरचे असल्याने या निवडणुकीकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यांना नागपुरात विरोधकांना कोणतीही संधी द्यायची नाहीय. त्यामुळेच ते महायुतीसाठी आग्रही आहेत. दुसरीकडे, भाजपाने आपल्या स्तरावर १८०० हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत. पक्षाने स्वबळाची तयारीही पूर्ण केली असून, आता चेंडू मित्रपक्षांच्या मैदानात आहे. मित्रपक्ष किती सामंजस्य दाखवतात, यावरच नागपूरच्या सत्तेचे समीकरण ठरणार आहे. नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. मित्रपक्षांच्या मागणीनुसार जागा सोडणे भाजपासाठी एक मोठे आव्हान आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच युती धर्माचे पालन करण्यावर भर दिला आहे, परंतु स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना आणि जागांचे गणित जुळवणे आवश्यक आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments