भाजपाच्या यशात रवींद्र चव्हाण यांची प्रभावी रणनीती आणि सूक्ष्म नियोजनाचा मोठा वाटा
- dhadakkamgarunion0
- 60 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
भाजपाच्या यशात रवींद्र चव्हाण यांची प्रभावी रणनीती आणि सूक्ष्म नियोजनाचा मोठा वाटा
● महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूक्ष्म आणि प्रभावी निवडणूक नियोजनाच्या जोरावर पक्षाने विरोधकांना धूळ चारत राज्यभरात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद आणि विकासाचा अजेंडा मतदारांनी स्वीकारला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. या विजयाचे मुख्य शिल्पकार म्हणून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे नाव पुढे येत आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी आखलेली 'गाव-वस्ती संपर्क' मोहीम आणि बुथ स्तरावरील नियोजनामुळे भाजपाला हे यश संपादन करता आले. रविंद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच संघटनात्मक बांधणीवर विशेष भर दिला होता. नगरपरिषद निवडणुकीसाठी त्यांनी प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र अभ्यास करून उमेदवारांची निवड केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजना घराघरांत पोहोचवल्या, ज्याचा मोठा फायदा या निवडणुकीत दिसून आला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments