top of page

भारतीय क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच टी. दिलीपसरांनी गेल्या काही महिन्यांपासून...

  • dhadakkamgarunion0
  • 2 hours ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारतीय क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच टी. दिलीपसरांनी गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी एक प्रोग्राम सुरु केलाय,त्यात त्यांनी सामन्यात उत्कृष्ट फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूला रोख 10 हजार किंवा 20 हजार रुपयांचे रोख बक्षीस देणे सुरु केलंय.. हे बक्षीस BCCI कडून नसून त्यांच्या स्वतःच्या खिशातून देत आहेत... आता जे खेळाडू करोडो रुपये कमावतात त्यांना 10 किंवा 20 हजार रुपयांची काय किमंत असणार...पण आपल्या गुरु कडून मिळणाऱ्या या बक्षीस रूपात मिळणाऱ्या या अमूल्य बक्षीसात मिळणाऱ्या या आशीर्वादला कोणता खेळाडू नाही म्हणेल..? पण या त्यांच्या या कृत्याला संघाच्या खेळाडूंनी सकारात्मक घेतले..अन भारतीय संघाची फिल्डिंग कमालीची सुधारली... त्याची झलक गेल्या काही सामन्यांमधून देश बघतोय... असे कोच असतील तर देशाचा संघ नेहमीच सकारात्मक कामगिरी करण्यास तयार असेल...

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ईराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दोन विधानांनी परिस्थिती स्पष्ट केली आहे. पहिले म्हणजे IRGC वर सरकारचे नियंत्रण नाही. सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर ही फौज आता विखुरलेली आहे, ज्यात खालच्या स्तरावरील कमांडर स्वतः निर्णय घेत आहेत. त्यामुळे खाडी देशांवरील हल्ले सरकारच्या आदेशाशिवाय होत आहेत. दुसरे विधान म्हणजे, अमेरिका हल्ले थांबवेल तर चर्चा शक्य आहे. याचा अर्थ सत्ता बदल निश्चित आहे. पुढे गृहयुद्ध होण्याची शक्यता आहे—एका बाजूला सरकारी फौज, तर दुसऱ्या बाजूला IRGC. सरकारी फौज शरणागतीस तयार आहे, पण IRGC कमांडर लढाई सुरू ठेवतील कारण सत्ताबदलानंतर त्यांना जनतेचा रोष सहन करावा लागेल. आगामी ८-१० दिवसांत जमीनी कारवाई सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात

शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेतील सदस्यत्व मे २०२६ मध्ये संपणार आहे. त्यांच्या फेरनिवडीबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, पक्ष आणि आमदारांना उद्धव ठाकरे पुन्हा सभागृहात यावेत अशी तीव्र इच्छा आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचे समीकरण गुंतागुंतीचे असले तरी ठाकरे गटाकडे सर्वाधिक आमदार आहेत. येत्या निवडणुकीत आघाडीला एक जागा निश्चित मिळू शकते, मात्र दुसऱ्या जागेसाठी मित्रपक्षांचे पाठबळ आवश्यक आहे.उद्धव ठाकरे यांची उमेदवारी केवळ वैयक्तिक निर्णय नसून, संपूर्ण आघाडीच्या रणनीतीवर अवलंबून आहे. एकजुटीचा संदेश देण्यासाठी महाविकास आघाडीला परिपक्वता दाखवावी लागेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी आणि मिस इंडिया अर्थ २०१९ स्पर्धक सायली सुर्वे हिने विवाहानंतर धर्मांतर करून अतेजा तासे हे नाव घेतले होते. मात्र, लग्नानंतर तिला सातत्याने शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागला. पोलिसांकडे तक्रारी करूनही अपेक्षित न्याय न मिळाल्याने अखेर तिने हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने शुद्धीकरण विधी करून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. तिचे नवीन नाव अद्या सुर्वे असे ठेवण्यात आले आहे.तिने सांगितले की, चार मुलांच्या आई म्हणून संसार टिकवण्याचा प्रयत्न केला, पण अन्याय असह्य झाल्याने कठोर निर्णय घ्यावा लागला. तिच्या या धैर्यामुळे धर्मांतर, प्रेमविवाह आणि वैवाहिक वाद या संवेदनशील विषयांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अश्या घटना उघड झाल्यावर तरी महाराष्ट्र शासनाने लव्ह जिहाद प्रतिबंधक कायदा करणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ठाण्याचे रहिवासी आणि व्हीजेटीआयचे माजी विद्यार्थी डॉ. विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियन सरकारने ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा मानाचा पुरस्कार दिला आहे. भारतातील पद्मश्रीच्या दर्जाचा हा सन्मान मानला जातो. जोशी यांनी लोखंड उत्पादनातून निघणाऱ्या मळीचे (स्लॅग) रिसायकलिंग करून टिकाऊ रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्रज्ञानाचा वापर सिडनी एअरपोर्टच्या तिसऱ्या रनवेपासून ते प्रमुख रस्त्यांपर्यंत करण्यात आला. त्यामुळे रेती, खडी आणि माती यासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीची तब्बल २ कोटी टन बचत झाली. गेल्या २० वर्षांपासून ते सिडनीत स्थायिक असून, त्यांच्या संशोधनामुळे ऑस्ट्रेलियात रस्तेबांधणी अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक झाली आहे. भारताला हे तंत्रज्ञान विनामोबदला देण्याची त्यांनी तयारी दाखवली होती, मात्र टोल वसुलीचा भस्म्या रोग झालेल्या आपल्या मंत्र्यांना असे काही रचनात्मक करण्यापेक्षा नागरिकांचे खिसे कापण्यात अधिक रस असतो.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page