🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 3 hours ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
प्रतिनिधित्वाचं गणित आणि अब्दुलचं मौन. बिहारच्या महागठबंधनने मुख्यमंत्रीपदासाठी १३% यादव समाजाचे तेजस्वी यादव आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी २% मल्लाह समाजाचे मुकेश सहनी यांची नावं जाहीर केली. त्यानंतर एका मुस्लिम नेत्याने खंत व्यक्त केली—१८% मुस्लिम समाजासाठी मात्र ‘दरी-बिछाव मंत्री’चीच जागा राखीव. आणि वर सांगितलं जातं, “अब्दुल चूप राहा, नाहीतर भाजप येईल.” ही टीका केवळ भावनिक नाही, तर राजकीय वास्तवाचं भेदक दर्शन आहे. मुस्लिम समाजाचा आकड्यांमधला वाटा मोठा असला, तरी सत्ता-संभागात त्यांचं स्थान नगण्यच. आणि जेव्हा ते आवाज उठवतात, तेव्हा त्यांना गप्प बसण्याचा सल्ला दिला जातो—जणू त्यांची भूमिका केवळ मतदानापुरतीच मर्यादित आहे. लोकशाहीत प्रतिनिधित्व हे आकड्यांवर नव्हे, तर समावेशकतेवर आधारित असावं लागतं. पण इथे आकडेच दाखवतात की कोणाला काय मिळतं आणि कोणाला काय नाकारलं जातं. अब्दुलचं मौन हे आता राजकारणाचं साधन होऊ नये.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
काँग्रेस स्वबळावर—उबाठा आणि मनसेचे काय ??? मुंबई मनपा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतल्यास इंडी आघाडीचा स्थानिक अस्तित्वच संपुष्टात येईल. राष्ट्रवादीचा मुंबईत फारसा प्रभाव नसल्याने उबाठा आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार. परिणामी, अनेक मतदारसंघांत महायुती विरुद्ध काँग्रेस व उबाठा/मनसे अशी तिरंगी लढत होईल. अशा लढतीत महायुतीचे मत एकवटेल, तर इंडी आघाडीचे मत विभागले जाईल—विजयाचा फायदा महायुतीला. संज्याच्या भविष्यवाणीनुसार उबाठा ७५ जागा जिंकेल, पण काँग्रेसने स्वतंत्र लढत घेतल्यास ही संख्या गाठणंही कठीण होईल. दोन ठाकरे एकत्र आले तरी ठिकऱ्या उडवण्याऐवजी स्वतःच्याच ठिकऱ्या उडण्याची शक्यता अधिक. काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय म्हणजे उबाठा-मनसेसाठी राजकीय आव्हान, आणि महायुतीसाठी संधी. मुंबईकरांच्या मतांची दिशा आता नव्या समीकरणांनी ठरणार आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
वरवंट्याची भीती की मतांची चिंता? राज ठाकरे यांनी मतदारांना भाजपला मत दिल्यास “गुजरातचा वरवंटा” फिरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. पण प्रश्न असा आहे—शिवसेनेच्या दीर्घ सत्ताकाळात महाराष्ट्रातील शहरांमध्ये गुजराती-मारवाडी समाजाचे आर्थिक वर्चस्व नव्हते का? हे समाज शतकानुशतकांपासून इथे स्थायिक आहेत, व्यापारी आणि उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. मग आजच अचानक वरवंट्याची भीती का? भाजपला मराठी मतदारांचा कल असल्याची भीती वाटतेय का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उबाठा आणि मनसे एकत्र आले तरी मराठी मत भाजपकडे वळेल, हीच खरी चिंता वाटते. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भावनिक इशारे देण्याऐवजी, मतदारांच्या विश्वासासाठी ठोस विकासदृष्टी आणि समावेशकता आवश्यक आहे. वरवंटा फिरतो तेव्हा पीठ तयार होतं—पण राजकारणात तो मतांचा निकाल ठरवतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
‘शेतकरी’ की करमुक्त उद्योजक? हजारो एकरांवर शेती करणारे, कोट्यवधींचं उत्पन्न मिळवणारे राजकारणी आणि फिल्मी मंडळी स्वतःला ‘शेतकरी’ म्हणवतात. त्यांना शेती उत्पन्नावर कर नाही, कर्जमाफी मिळते, बियाणं, वीज, हमीभाव, नुकसानभरपाई—सर्व काही सरकारकडून. मग हे सवलतीचे हक्क फक्त ‘शेतकऱ्यां’नाच का? किरकोळ व्यापारी, लघुउद्योजक, सेवाभावी व्यावसायिक यांना हेच लाभ का नाहीत? गरजू, खऱ्या शेतकऱ्यांना मदत हीच न्याय्य भूमिका आहे. पण ‘शेतकरी’ या नावाखाली करमुक्त कोट्यधीश तयार करणं ही धोरणात्मक फसवणूक आहे. शेती हा व्यवसाय असेल, तर त्यातील नफ्यावरही कर हवा. अन्यथा, ‘शेतकरी’ ही संज्ञा सवलतींचा बुरखा बनते. समाजहितासाठी गरज आहे स्पष्ट भेदाची—गरजवंत शेतकरी आणि सवलतींचा गैरफायदा घेणारे धनदांडगे यांच्यात. अन्यथा, करदात्यांच्या खिशातून चालणाऱ्या या करमुक्त साम्राज्याला ‘शेती’ म्हणणं हीच खरी विडंबना ठरेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मिठाई, माया आणि सीमारेषा. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने काल एक बातमी दिली. भारताने केवळ दिवाळीच्या सणाची म्हणून 6.05 लाख कोटी रुपयांची खरेदी केली. पाकिस्तानच्या चलंनानुसार ही रक्कम तब्बल 18 लाख कोटी रुपये होते. ही रक्कम ऐकून पाकिस्तानी नेत्यांची छाती दडपली आहे. भारत-चीन सीमारेषेवर मिठाईचे आदानप्रदान सुद्धा झाले, पण पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर मिठाईचा प्रश्नच नाही—कारण ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. एकीकडे आर्थिक उत्सव, दुसरीकडे सामरिक सजगता असे भारताचे धोरण आहे. भारताची दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई नव्हे, तर आर्थिक ताकदीचं प्रदर्शन आहे आणि सीमारेषेवरची मिठाई म्हणजे शांततेचा संकेत देणे आहे, पाकिस्तान दळभद्री देश आहे त्याची भारताशी मैत्री करण्याची लायकी नाही त्यामुळे पाकिस्तानसाठी ही दिवाळी केवळ आकडे ऐकूनच धडधड वाढवणारी ठरली.
🔽
#Politics #India #AbhijeetRaneWrites #PowerAndRepresentation #Congress #BJP #MNS #ShivSena #MaharashtraPolitics #BiharPolitics #FarmPolicy #TaxJustice #IndiaEconomy #BorderSecurity #Diwali2025 #PoliticalInsight












Comments