🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 28
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जगातील अन्य कोणत्याही धर्माच्या नागरिकाने दहशतवादी कृत्य केले असेल तर त्याचे समर्थन त्या धर्मातील सुद्धा मोजकेच लोक करतात. याला इस्लाम अपवाद आहे. फ्रांस मधील 41 वर्षाच्या तुरुंगवासा नंतर इस्लामिक दहशतवादी जार्ज इब्राहिम अब्दुल्ला याची काल सुटका करण्यात आली. त्याच्या स्वागतासाठी नेहमीप्रमाणे जसा दहशतवाद्यांच्या स्वागताला किंवा जनाजाला असतो तसा लाखोच्या संख्येत मुस्लिम समुदाय उपस्थित होता. जगातील तमाम सोकॅाल्ड मानवतावादी कार्यकर्ते, पुरोगामी पत्रकार, डावे लेखक त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील होते. १९८२ मध्ये अमेरिकन लेफ्टनंट कर्नल चार्ल्स आर. रे यांच्या हत्येमध्ये सहभागी असल्याबद्दल आणि इस्रायलच्या याकोव्ह बार-सिमांटोव्ह यांच्या हत्येमध्ये सहभागी असल्याबद्दल अब्दुल्लाला १९८७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दहशतवाद्याच्या स्वागताला लाखोच्या संख्येने हजर राहणे हा शिरस्ता आहे या लोकांचा. आपल्याकडे सुद्धा मुंबईत बॉम्बस्फोट घडवल्याने फाशी दिलेल्या याकुब मेमनच्या जनाज्याला लक्षावधी लोक आले होते. इस्लाम या धर्माचा आधुनिक जग द्वेष करते त्याचे हेच कारण आहे. सामान्य मुस्लिमांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पुण्यनगरीत फार थोडे पुण्य उरले असून बाकी सगळे पापच आहे. पुण्यामुंबईत नियमित छोट्या - मोठ्या रेव्ह पार्ट्या होत असतात. आडवाटेवरचे खाजगी बंगले - फार्म हाउसेस - होम स्टेसाठी उपलब्ध बंगले अशी ठिकाणे यासाठी निवडली जातात. टेलिग्राम वर पेड ग्रुप बनवून आमंत्रणे / निरोप दिली जातात. अनेक उच्चभ्रू घरातील मुले - मुली, पुण्यात शिक्षणासाठी आलेले परप्रांतीय विध्यार्थी -विद्यार्थिनी, आयटी कंपन्यातील कर्मचारी यात सामिल होतात. शुक्रवारी आणि शनिवारी अश्या पार्ट्यांचे प्रमाण जास्त असते. दारू ड्रग्ज आणि उत्तेजक द्रव्ये यांचा महापूर वाहतो. फिमेल एस्कॉर्टस सुद्धा असतात. अनेक चांगल्या घरातील तरुण मुली सुद्धा थ्रिल म्हणून किंवा मित्र,मैत्रिणी, ऑफिस मधले सहकारी यांच्या प्रेशर मुळे या पार्ट्यांत सहभागी होतात. पार्टीत स्वेच्छेने सामील झालेल्या नवख्या आकर्षक मुलींचे सामूहिक शोषण पण होते. पण ड्रग्ज च्या अमलाखाली दोन दिवस - दोन रात्री काय होतंय आणि कोण कोण काय काय करतंय काहीही कळत नाही. पुढे याच मुली धंद्याला लावल्या जातात. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि अश्या प्रकरणांमध्ये राजकीय सहभाग नवीन नाही. आदुबाळ ज्या नाइट लाईफ चे कौतुक करायचा ते हेच. हमाम मे सब नंगे...
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
उपराष्ट्रपती धनखड राजीनामा प्रकरण बरंच गाजतंय. या प्रकरणात माझ्या मते श्री. मोदीजी आणि श्री अमित शहा यांना एक धडा नक्कीच शिकायला मिळाला असणार, आणि असायलाही हवा. माजी उपराष्ट्रपती काही संघाच्या किंवा बीजेपीच्या मुशीतुन आलेलं व्यक्तीमत्व नव्हते. राजस्तानात निवडणुक हारलेलं एक व्यक्तीमत्व. उच्च पदांवर आयात लोक मुळीच ठेवायचे नसतात हाच तो धडा असणार. प्रणबदांनंतर, रामनाथ कोवींद, आणि विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मीजी, ही नावंही कुणाला माहीत नव्हती. पण या दोघांचं वागणं आणि या धनखड यांचं वागणं यात जमिन आस्मानाचा फरक दिसून येतो. इथे शिशुपालाचे १०० अपराध माफ होऊन संपावेत अशीच ही परिस्थीती होती, आणि तसंच झालं. धखडांना राजीनामा द्यायला लावलं गेलं. कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या त्यांच्या वकीली फौजेच्या नादी लागून धनखड आता माजी झालेत. कुणीही नाहीत. याचे हिशोब होतीत तेव्हा कॉंग्रेस धावून येईल मदतीला ?.. वाट बघा. अशी माणसं वापरुन फेकून द्यायची असतात हे कॉंग्रेसला चांगलंच माहीत आहे.पाठीत खंजीर खुपसणं म्हणजे काय ? हे धनखडांनी दाखवून दिलं. सो... ते गेलेत आता ते माजी झालेत. पण, भाजपा सर्वोच्च नेतेमंडळींनी इथून पुढे तरी असल्या चुका करु नयेत असं वाटतं... सत्यपाल मलिक जसा आस्तीन का साप निघाला तसेच हे धनखड.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
काँग्रेस पक्ष हिंदूंना मुस्लीम बनवणाऱ्या “गजवा ए हिंद” मोहिमेचा भाग आहे का ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील अल फारूक इंटर कॉलेजचा ट्रस्टी आणि मॅनेजर शब्बीर अहमद याने आपल्या कॉलेजमध्ये आणि एनजीओमध्ये नोकरीचे आमिष दाखवून १६ हिंदूंचे धर्मांतर केल्याचा प्रकार समोर आला आहे. आता याच शब्बीरच्या बचावासाठी काँग्रेसने तीन वकिलांची टीम आपल्या खर्चाने उभी केली आहे.काही वर्षांपूर्वी शब्बीर अहमद सिद्धार्थनगर गोरखपूर रोडवर जीप चालवत होता. मात्र, मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर तो अचानक करोडपती बनतो. त्याने इंटर कॉलेज सुरू केले आणि मुलायमसिंहांनी त्याला मान्यता दिली. त्यानंतर, शब्बीरने नोकरीच्या माध्यमातून हिंदू धर्मीयांचं धर्मांतर सुरू केलं.छांगूर गँगशीही त्याचे संबंध होते, असे पुरावे समोर आले आहेत.जे हिंदू मुस्लिम बनण्यास नकार देत होते, त्यांचे पगार थांबवले जायचे, आणि नंतर त्यांच्यावर चोरी किंवा अन्य गुन्हेगारी खटल्यांची धमकी दिली जायची.पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे धर्मांतराच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या या मुस्लिम आरोपीचा खटला काँग्रेस पक्ष स्वतःच्या खर्चाने का लढतो आहे?काँग्रेसचा या आरोपी शब्बीर अहमदशी नक्की काय संबंध आहे? काँग्रेस पक्ष हिंदूंच्या धर्मांतरामध्ये सहभागी आहे का?
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कर्नाटक सरकारमधील मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यातील वाद आता आगीच्या डोंबात रूपांतर होताना दिसतोय,मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे ओएसडी मोहन कुमार आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचे ओएसडी एच अंजनेय यांच्यात कर्नाटक भवनात वाद झाला, म्हणजे चांगलीच हाणामारी झाली. डी के शिवकुमार यांच्या ओएसडीने ट्विट करून सांगितले की मला बुटाने मारण्यात आले,ज्यामुळे माझी प्रतिष्ठा आणि स्वाभिमान दुखावला गेला आहे. सिद्धरामय्या अन डिके या प्रकरणी गप्प जरी असले तरी ही लढाई दोन ओएसडी मधील नसून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यातील आहे.ह्या दोन नेत्यामधील वाद काँग्रेसने वेळीच सोडवला नाही तर,डी के लवकरच भाजपात असतील अन कदाचित मुख्यमंत्री पदी ही पहायला मिळतील,पण अमित शाह यांनी लक्ष घातले तरच,राजस्थानमध्ये गेहलोत-पायलट,छत्तीसगड मध्ये बघेल-सिंहदेव, मध्यप्रदेश मध्ये कमलनाथ- सिंधीया,हिमाचल मध्ये सुक्खू-विक्रमसिंह,हरियाणात हुड्डा-शैलजा,पंजाबात अमरिंदर-सिद्धू नंतर कर्नाटकात सिद्धरामय्या-शिवकुमार हा एपिसोड काँग्रेसच्या पतनाचे आणखी एक कारण ठरणार आहे.
🔽
#Politics #Terrorism #Islamism #Conversion #DrugAbuse #YouthCrisis #Congress #BJP #IndiaNews #SocialIssues #Security #Corruption #WakeUpIndia












Comments