top of page

रवींद्र चव्हाण यांनी सिद्ध केले कार्याचे तेज

  • dhadakkamgarunion0
  • 1 hour ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]

▪️==================▪️

रवींद्र चव्हाण यांनी सिद्ध केले कार्याचे तेज

● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाने अल्पावधीतच आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. पक्षासाठी केवळ पद नव्हे, तर विचारांवर आधारित निष्ठा ठेवणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास आणि राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची धमक त्यांच्यात आहे. डोंबिवलीसारख्या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येणारे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळणारे चव्हाण यांनी आपले संघटन कौशल्य 'संघटन पर्व' अभियानादरम्यान दाखवून दिले, ज्यामुळे भाजपा महाराष्ट्रातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला पक्ष बनला. २०२४ च्या सुरुवातीला भाजपाने 'संघटन पर्व' अभियान हाती घेतले. या महत्त्वाकांक्षी अभियानाची प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. या काळात, केवळ तीन महिन्यांच्या अवधीत महाराष्ट्रात १ कोटी ५१ लाख प्राथमिक आणि सुमारे १ लाख ५० हजार सक्रिय सदस्यांची नोंदणी झाली. या विक्रमी सदस्य नोंदणीमुळे भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पक्षाच्या विचारधारेला तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यात त्यांचे संघटन कौशल्य अत्यंत महत्त्वाचे ठरले.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page