‘भ्रष्टाचाराच्या रावणा'वर अमित साटम यांचा प्रहार!
- dhadakkamgarunion0
- 9 minutes ago
- 1 min read

🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
‘भ्रष्टाचाराच्या रावणा'वर अमित साटम यांचा प्रहार!
● मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपाचे आमदार अमित साटम यांनी मुंबादेवी परिसरात कार्यकर्त्यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मुंबईतील सध्याच्या परिस्थितीवर आणि महापालिकेतील कारभारावर टीका करताना त्यांनी 'भ्रष्टाचाराच्या रावणा'चे दहन करण्याचे आवाहन केले. भ्रष्टाचारी शक्तींना निवडणुकीत पराभूत करून महापालिकेची सत्ता पुन्हा जनतेच्या हाती आणण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. साटम यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. विशेषतः, युवा शक्तीने या लढ्यात पुढे यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. "कार्यकर्ता हाच कोणत्याही पक्षाचा आधारस्तंभ असतो. प्रत्येक कार्यकर्त्यांने महापालिकेतील गैरकारभाराची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे," असे मार्गदर्शन त्यांनी केले. प्रत्येक विभागात, प्रत्येक गल्लीत जाऊन जनतेशी संवाद साधून 'भ्रष्टाचारमुक्त महापालिके'चे स्वप्न साकार करण्यासाठी झटण्याचे निर्देश त्यांनी दिले. आमदार साटम यांनी भाजपाच्या वतीने महापालिकेत पारदर्शक प्रशासन आणण्याचे व्हिजन मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या पैशाचा योग्य आणि प्रामाणिक वापर करणे, हेच त्यांचे ध्येय आहे. 'भ्रष्टाचारमुक्त मुंबई' ही केवळ घोषणा न राहता, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments