एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस यांचे सौहार्दपूर्ण संबंध
- dhadakkamgarunion0
- 8 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस यांचे सौहार्दपूर्ण संबंध
● राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या संबंधांवर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही दुरावा किंवा मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काही प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक हा दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. माध्यमांनी टीआरपीसाठी चुकीच्या बातम्या तयार करणे थांबवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्यात कोणताही दुरावा नाही. काही विशिष्ट माध्यमांनी असा दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, परंतु ते त्यांच्या या प्रयत्नात तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत.’ महायुतीमधील दोन प्रमुख नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत होती. या चर्चांना फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आमचे संबंध केवळ मैत्रीपूर्ण नाहीत, तर आमचे समन्वय अत्यंत सौहार्दपूर्ण आहेत. आम्ही दररोज अनेक विषयांवर चर्चा करतो आणि एकत्र काम करतो. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसून आलेला 'अबोल' हा माध्यमांनी तयार केलेला गैरसमज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरुद्ध लढत असले तरी, याचा अर्थ राज्याच्या नेतृत्वात कोणतीही कटुता नाही, असेही त्यांनी नमूद केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments