‘२०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष’; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
- dhadakkamgarunion0
- Oct 7
- 1 min read
Updated: 7 hours ago
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
‘२०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष’; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
● राज्य शासनाच्या प्रशासकीय रचनेत मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. दीर्घकाळ प्रलंबित असलेले सेवा प्रवेश नियम आता बदलणार असून, आगामी २०२६ हे वर्ष ‘मोठ्या प्रमाणावर पदभरतीचे वर्ष’ ठरेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील जबाबदाऱ्या काळानुरूप बदलल्या आहेत, मात्र नियम मात्र जुनेच आहेत. हे नियम बदलल्याशिवाय शासन गतिशील होऊ शकत नाही.’ याच पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील सर्व पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे ही दया नव्हे, ती शासनाची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर संकट आलं, तर त्या कुटुंबाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे.’ त्यांनी सांगितले की, आतापर्यंत ८०% अनुकंपा नियुक्त्या पूर्ण झाल्या असून, उर्वरितही लवकरच होतील.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments