top of page

१० जून २०२६ रोजी नरेंद्र मोदी यांनी सलग कार्यकाळाच्या बाबतीत...

  • dhadakkamgarunion0
  • 2 days ago
  • 2 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

१० जून २०२६ रोजी नरेंद्र मोदी यांनी सलग कार्यकाळाच्या बाबतीत नेहरूंचा विक्रम मोडला, हा भारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक क्षण आहे. मात्र “मोदी विरुद्ध नेहरू” तुलना पूर्णपणे न्याय्य नाही. नेहरूंना फाळणीच्या जखमा, अन्नटंचाई, औद्योगिक मागासलेपणा अशा संकटांचा सामना करावा लागला; त्यांनी पंचवार्षिक योजना, सार्वजनिक उद्योग, आयआयटी-एम्स, अंतराळ व अणुऊर्जा कार्यक्रम यांसारख्या पायाभूत संस्था उभारल्या. मोदींना मजबूत लोकशाही व विकसित अर्थव्यवस्था लाभली; त्यांनी डिजिटल इंडिया, जनधन, यूपीआय, पायाभूत गुंतवणूक, संरक्षणातील आत्मनिर्भरता, कोविड लसीकरण, जी-२० अध्यक्षपद यांसारखे उपक्रम राबवले. नेहरूंची कसोटी होती राष्ट्र उभे करणे, तर मोदींची कसोटी आहे राष्ट्राला विकसित भारताकडे नेणे. दोघांची आव्हाने वेगळी होती, पण योगदान दोघांचेही महत्त्वाचे आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

SIPRIच्या अहवालातले “१२ वारहेड्स” हे फक्त हेडलाइन आहे; खरी कथा भारताच्या न्यूक्लिअर स्ट्रॅटेजीच्या परिपक्वतेची आहे. भारताकडे आधीपासूनच २००–३०० शस्त्रास्त्रांचा साठा आहे, पण आता संकेत असा आहे की Sea-Based Deterrent सतत ऑपरेशनल राहू शकतो. म्हणजे Storage वरून Operational Readinessकडे झेप. चीनच्या ६०० पेक्षा जास्त शस्त्रास्त्रांच्या विस्ताराला भारत शस्त्र-शस्त्र स्पर्धेत उतरू इच्छित नाही; त्याला फक्त Second Strike Capability टिकवायची आहे. सबमरीनमधून मिळणारी Survivability ही खरी ताकद आहे. पाकिस्तानसाठीही हा मानसिक संदेश आहे की Nuclear Blackmail आता निष्फळ ठरतो आहे. पश्चिमेसाठीही भारत सांगतो आहे—संयमित राहू, पण हात बांधून नाही. म्हणूनच या अहवालाची खरी बातमी १२ नाही, तर भारताची अधिक ऑपरेशनल, Survivable Nuclear Posture आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

शामलीतील आयुष मलिक–चांदनी कुरेशी प्रकरणाने पुन्हा एकदा समाजाला सावधगिरीचा इशारा दिला आहे. जिममध्ये सुरू झालेली ओळख निकाहपर्यंत पोहोचली आणि आयुषचा मोहम्मद अली झाला. FIRनुसार तो हळूहळू हिंदू संस्कृतीपासून दूर गेला, दाढी–टोपीसह नवे आयुष्य स्वीकारले. प्रश्न फक्त मुलींच्या पालकांचा नाही; वयात आलेल्या मुलांच्या घरांनीही तितकीच जागरूकता दाखवायला हवी. धर्म बदलल्यावर परिणामही त्यालाच भोगावे लागतात. लिबरल–सेक्युलरपणाच्या आड पुढच्या पिढ्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, ही खरी जबाबदारी आहे. समाजाने वेळेवर डोळे उघडले नाहीत तर अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवणे कठीण होईल. म्हणूनच सावध राहणे हीच खरी गरज आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

केदारनाथ धामातील व्यवस्थेची दुर्दशा यात्रेकरूंना त्रासदायक ठरत आहे. मी स्वतः १५ दिवस उत्तराखंडात उत्कृष्ट सेवा अनुभवली, पण केदारनाथात मात्र पायदळी जाणाऱ्यांचे हाल बघून मन खिन्न झाले. घोडा-खच्चरवाले सरळ यात्रेकरूंवर घोडे घालतात, एक महिला खाली पडली तरी मदत न करता पळून गेले. मृत घोडे वरून फेकले जातात, विष्ठेमुळे रस्ता घाणेरडा होतो, पावसाने परिस्थिती बिकट होते. प्रशासनाने कोणतीही सोय उपलब्ध केली नाही, रोज यात्रेकरू वादात अडकतात, कधी मारहाणही होते. धामी सरकारचे लक्ष या पवित्र स्थळाकडे नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यवस्थेसाठी तातडीने उपाययोजना करणे हीच खरी गरज आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

फक्त 'येथे सार्वजनिक ठिकाणी थुंकू नकोस' एवढेच सांगितल्याने, सांगणार्‍या सज्जन वयोवृद्ध सद्गृहस्थास पाय तुटेपर्यंत मारहाण झालीये. ही मारहाण होत असताना बघ्यांची गर्दी व्हिडीओ काढण्यात गर्क आहे, एकही माईचा लाल माणुसकीच्या नात्याने पुढे आलेला नाही. ही घटना आपल्या समाजाची खालावलेली मानसिकता व झालेले नैतिक अधःपतन स्पष्ट करते. सध्या आपली मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक पातळी इतकी रसातळाला गेलेली आहे की, लोकांच्या संवेदनशीलतेचा व सहनशीलतेचा अंत झालेला आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर खच्चीकरण झालेल्या समाजघटकांचा वैयक्तिक रोष अशा प्रकारे असहाय व दुर्बलांच्या समोर उफाळून येत आहे. आपण मानसिक असंतोष आणि सामाजिक उद्रेकाच्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत...

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page