शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
- dhadakkamgarunion0
- Nov 5
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
● राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने कर्जमाफीबाबत विचार करणे सुरू केले असून, त्या संदर्भात 'कर्जमाफी करणार नाही' असे कधीही म्हटले नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सध्याच्या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट मदत देणे हे सरकारचे पहिले प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले. आंदोलकांनी मात्र रेल्वे रोको किंवा रास्ता रोकोसारखी कृती करून सर्वसामान्य जनतेला त्रास देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. समस्यांचे निराकरण आंदोलनातून नव्हे, तर चर्चेतून केले जाईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती कर्जमाफीचे स्वरूप आणि शेतकऱ्यांना थेट होणारा लाभ यावर लक्ष केंद्रित करत आहे. मागील कर्जमाफी योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांना न होता तो बँकांना झाला होता, असा अनुभव आहे. त्यामुळे भविष्यात करण्यात येणारी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या हिताची असावी, यासाठी सरकार नियोजन करत आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments