विधानपरिषद निवडणुकीत नाशिकमध्ये खरा गेम झाला...
- dhadakkamgarunion0
- 1 day ago
- 2 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
विधानपरिषद निवडणुकीत नाशिकमध्ये खरा गेम झाला. एकनाथ शिंदेंच्या पक्षाने पैशांच्या जोरावर नरेंद्र दराडेंना पुन्हा उमेदवारी दिली, पण गोकुळ गीतेंनी गनिमी कावा करून त्यांचा पराभव केला. दराडेंनी भाजपच्या गणेश गीतेंना माघार घ्यायला लावली होती, तरीही गोकुळ गीतेंनी अपक्ष म्हणून ३५६ मते मिळवून विजय मिळवला. दराडे-गीते यांची कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाली होती, ज्यात दबाव दिसत होता. भाजपने शिंदेंच्या नकारानंतर गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला आणि तडजोडीच्या बैठका फोल ठरल्या. हा पराभव ‘सगळं मलाच हवे’ या अट्टहासाचा परिणाम आहे. एक दिवस असाच शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा गेम वाजणार आहे आणि त्यांना कळणारही नाही.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
विधानपरिषदेच्या १७ जागांच्या निवडणुकीत महायुतीने जवळपास एकतर्फी विजय मिळवला. १६ उमेदवार महायुतीचे तर एक बंडखोर भाजप उमेदवार विजयी ठरला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस श.प. आणि शिवसेना उभाठा यांना एकही जागा मिळाली नाही. महायुतीच्या विजयी आमदारांमध्ये ११ भाजपचे, ३ शिवसेनेचे आणि २ अजित पवार गटाचे आहेत. निकालाने स्पष्ट केले की मविआचा खेळ पूर्णपणे कोसळला आहे. बोऱ्या वाजणे म्हणजे काय हे पाहायचे असेल तर या पराभवाकडे पाहावे लागेल. महायुतीने संघटन, रणनीती आणि ताकदीच्या जोरावर विरोधकांना पूर्णपणे नामोहरम केले आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
भरत तिवारी हा बिहारमध्ये भ्रष्टाचार उघड करणारा तरुण कार्यकर्ता होता. दलित-आदिवासींच्या व्यथा तो व्हिडिओद्वारे मांडत होता आणि त्याच्यावर कोणतीही गुन्हेगारी केस नव्हती. पोलिसांनी गुप्त सूचनेवरून त्याच्या घरी धाड टाकली; पोलिस म्हणतात भरतने गोळीबार केला, तर त्याची आई सांगते की त्याने सरेंडर करूनही पोलिसांनी ठार मारले. या फेक एन्काऊंटरनंतर हजारो लोक रस्त्यावर उतरले, अंत्यसंस्काराला ५० हजारांहून अधिक लोक जमले. भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना गोळीच मिळते, हेच वास्तव आहे. रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्यात पोर्टेबल टॉयलेटसाठी प्रती टॉयलेट ६७ हजार रुपये खर्च करून जवळपास १ कोटी उडवले गेले, आणि ती टॉयलेट्स भंगार अवस्थेत होती. लोकांचा पैसा लुटणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेला विरोध करणाऱ्यांचा शेवट अशा गोळ्यांनीच होतो.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
भाईचारा, गंगा-जमुना तहजीब, "मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना" हे ऐकायला गोड वाटतं, पण वास्तव वेगळं आहे. इतिहास सांगतो की पाकिस्तान निर्मितीच्या वेळी लाखो हिंदूंचा नरसंहार झाला, माता-भगिनींची अब्रू लुटली गेली, आणि हे सर्व शेजारी मुसलमानांनीच केलं. आजही काश्मीर खोऱ्यातील हिंदूंच्या वेदना विचारल्या तर सत्य समजेल. काही ठिकाणी हिंदूंचे प्राण वाचवले गेले, पण त्या बातम्या रंगवून दाखवल्या जातात, तर खरे अत्याचार लपवले जातात. आपण बहुसंख्य आहोत म्हणून या गोष्टी बाहेर येतात; एकदा अल्पसंख्य झालो तर आपल्या मुलींची लचके तोडलेली प्रेतंही बाहेर येणार नाहीत. म्हणूनच जाग जाग बांधावा प्राण संकटी, अन्यथा इतिहास पुन्हा रक्ताने लिहिला जाईल.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
मुंबईत विधानपरिषदेच्या निकालाच्या धुरळ्यात अजून एक नाट्य रंगले – "ऑपरेशन टायगर" विरुद्ध "ऑपरेशन तुडवा"! खासदार संजयांमध्ये झालेल्या वादानंतरच्या वल्गना हवेतच विरल्या, कारण सहा खासदारांनी वाय.बी. चव्हाण सभागृहात धनुष्यबाणाच्या शिवसेनेत प्रवेश केला. सुप्रिया सुळेंच्या कन्येचा विवाह संघ परिवारात झाला हे काँग्रेस-ठाकरेंच्या गोटाला पचवता न पचवता, तोच विवाह अंबानीच्या जिओ सिटीत पार पडल्याची बातमी आली आणि अडानी-अंबानीसह सर्वपक्षीय प्रेमाचे दर्शन घडले. यामुळे काँग्रेसच्या गुलामांना विधानपरिषदेतल्या घाऊक मतफुटीचा चटका अजून तीव्र झाला. अखेर शिंदेंनी "ऑपरेशन तुडवा"ची लक्तरे मुंबईच्या वेशीला टांगून पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पवारांच्या संस्थेच्या सभागृहात घेऊन विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.
🔽









Comments