लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला...
- dhadakkamgarunion0
- 24 hours ago
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे आता तस्तरी वाजणार हे निश्चित आहे. यूपी पोलिसांची तयारी पाहता, या आंदोलनकर्त्यांना कठोर स्वागत मिळणार हे स्पष्ट आहे. चुकीची जागा निवडल्याने त्यांचा सामना उत्तरप्रदेश पोलिसांच्या शिस्तबद्ध आणि कठोर कारवाईशी होणार आहे. योगी सरकारने कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली आहे, त्यामुळे कोणत्याही गोंधळाला येथे जागा नाही. आंदोलनाचा अधिकार लोकशाहीत आहे, पण तो हिंसाचार किंवा अराजकतेत बदलला तर राज्ययंत्रणा कठोरपणे हस्तक्षेप करणारच. यूपी पोलिस २४ तास सज्ज आहेत आणि योगी बाबा स्पष्ट संदेश देत आहेत—राज्याच्या शांततेशी खेळ करणाऱ्यांना येथे मोकळीक नाही. हे आंदोलन आता त्यांच्या स्वतःच्या चुकांची किंमत ठरू शकते.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
एफडीए अधिकाऱ्यांच्या कारवाया केवळ कागदपत्र तपासणीपुरत्या मर्यादित नसतात; त्यांना बनावट औषधांचे कारखाने, ड्रग्ज रॅकेट्स आणि संघटित गुन्हेगारीशी थेट सामना करावा लागतो. अशा वेळी धमक्या, हिंसक प्रतिकार किंवा पुरावे नष्ट करण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र विशेष पोलिस पथकाची साथ असणे ही काळाची गरज आहे. यामुळे अधिकाऱ्यांचे जीवित सुरक्षित राहील, गुन्हेगारांविरुद्ध कारवाई प्रभावी होईल, आरोपी पळून जाण्याची शक्यता कमी होईल आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या माफियांना कठोर आळा बसेल. बनावट औषधे हा केवळ आर्थिक गुन्हा नसून लाखो लोकांच्या जीवाशी खेळणारा गंभीर अपराध आहे. म्हणूनच शासनाने एफडीए अधिकाऱ्यांच्या सुरक्षेला तितक्याच ताकदीने प्राधान्य द्यायला हवे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
केरळातील बेलोरियन ईस्टर्न चर्चवरून तब्बल ७ हजार कोटींचा काळा पैसा जप्त झाला, आणि तो चर्च बिशप जोहाना वाग्यारा यांच्या नावावर चालत होता ही धक्कादायक बाब आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरचा घोटाळा उघडकीस आला तरीही तथाकथित सेक्युलर सोशल मीडियावर शांतता आहे. जर हेच एखाद्या हिंदू मंदिरात घडले असते तर देशभरात गदारोळ झाला असता, चौकशा, आंदोलनं, आणि हिंदू समाजाला दोष देणारे लेख झळकले असते. पण चर्चविषयी मात्र मौन पाळले जाते, ही दुहेरी भूमिका उघड आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा कोणत्याही धर्मसंस्थेत असो, त्यावर समान निकषाने कारवाई व्हायला हवी. अन्यथा न्यायव्यवस्था आणि माध्यमांची विश्वासार्हता प्रश्नांकित ठरेल. समाजाला खरी पारदर्शकता हवी आहे, निवडक संताप नव्हे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
सध्या भाजपबद्दल थोडं समाधान वाटतंय कारण एफडीआय खात्याने भेसळ रोखण्यासाठी कारवाई सुरू केली आहे, जी आधी कधी झाली नव्हती. हे स्वागतार्ह पाऊल आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये योगी, शर्मा आणि देवेंद्र हे तीन नेते ठोस कामगिरी करत आहेत, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा मजबूत होतेय. मात्र हिंदू प्रश्न आणि शेतकरी समस्यांवर अजून स्पष्ट उत्तर आलेलं नाही, ही खंत आहे. तरीही लवकरच ठोस उपाययोजना जाहीर होतील अशी आशा आहे. शासनाने लोकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिलं तरच विश्वास टिकेल. भाजपने आतापर्यंत दाखवलेली कारवाई योग्य दिशेने आहे, पण पुढील पावलं निर्णायक ठरतील. जनतेला केवळ आश्वासनं नव्हे तर प्रत्यक्ष बदल हवा आहे, आणि तोच पक्षाच्या भविष्यासाठी कसोटी ठरेल.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
नेहरूंच्या तुरुंगवासाबद्दल काँग्रेस आज पोस्ट्स टाकतेय, पण वास्तव वेगळं होतं. अहमदनगर किल्ल्यातील त्यांचा ‘कैद’ हा आरामशीर होता—मोठी कोठडी, स्नानगृह-शौचालय, पलंग-गादी, टेबल-खुर्ची, पंखा, लेखनसाहित्य, रोज आवडीचा नाश्ता-भोजन, स्वतंत्र कूक व नोकर, व्यायामासाठी बॅडमिंटन कोर्ट, पसंतीची वर्तमानपत्रे-नियतकालिके, आणि नातेवाईक-मित्रांना भेटण्याची मुभा. आज अनेकांच्या घरातही या सुविधा नाहीत, मग अशा वास्तव्याला तुरुंगवास म्हणायचा का? इंग्रज सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्या नेहरूंना इंग्रजांनी इतक्या सोयी का दिल्या, हा प्रश्न भारतीयांना पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनांना नाटकाचा रंग होता असा संशय चुकीचा नाही. ब्रिटीशांनी त्यांना राजकीय कैदी म्हणून या सगळ्या सुविधा दिल्या असे समजायचे असेल तर अश्या पद्धतीच्या सुविधा गांधीजी आणि नेहरू वगळता अन्य कुणालाही मिळाल्या नाहीत हे पण विसरून चालणार नाही.
🔽
#UPPolice #LawAndOrder #PublicOrder #PoliticalProtest #FDA #DrugMafia #CrimeControl #FakeMedicines #HealthSafety #AntiAdulteration #BlackMoney #Corruption #FinancialCrime #ChurchScandal #KeralaNews #BJP #IndianPolitics #GovernanceMatters #FDIAction #FoodSafety #FarmerIssues #Congress #IndianHistory #AhmednagarFort #FreedomMovement #PoliticalDebate #HistoricalFacts #BritishRaj #NationalDiscourse









Comments