मुख्यमंत्री फडणवीसांचा 'दावोस'मध्ये धमाका: महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींचे गुंतवणूक करार
- dhadakkamgarunion0
- 8 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीसांचा 'दावोस'मध्ये धमाका: महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींचे गुंतवणूक करार
● स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार, विविध जागतिक कंपन्यांसोबत राज्याने तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा वेग प्रचंड वाढणार असून, भविष्यात सुमारे ४० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या एकूण करारांपैकी ८३% गुंतवणूक ही थेट परकीय गुंतवणुकीच्या स्वरूपात असून १८ विविध देशांनी महाराष्ट्रावर विश्वास दर्शवला आहे. या गुंतवणुकीचा सर्वात मोठा भाग नवी मुंबई विमानतळाजवळील 'तिसरी मुंबई' प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. रायगड-पेण क्षेत्रात एक भव्य 'ग्रोथ सेंटर' उभारण्याची घोषणा करण्यात आली असून, यासाठी १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली आहे. हे क्षेत्र जागतिक स्तरावरील फिनटेक हब आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित केले जाईल. यामुळे कोकण आणि रायगड परिसराचा कायापालट होणार असून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments