top of page

मुंबईतील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाजपा कामगार आघाडीचा हायड्रेशन किट वाटप उपक्रम

dhadakkamgarunion0
Jun 8
1 min read

वाढत्या उन्हाळ्याच्या पाश्वभूमीवर मुंबईत भाजपा कामगार आघाडी मुंबईकडून मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या बाहेर हायड्रेशन कीट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत असून, त्याच पाश्वभूमीवर आज मालाड (पू.) रेल्वे स्थानकाबाहेर आज भाजपा मुंबई सरचिटणीस विनोद शेलार व भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई प्रदेशचे मुंबई सचिव नामदेव चव्हाण आणि उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष सतीश पुजारी यांनी केले होते.

यावेळी भाजपा कामगार आघाडीचे पदाधिकारी ॲड. नारायण पाणीकर, धर्मेंद्र पाल, राजकुमार सरोज, डॉ. राठोड, अमित गाडा, उपेंद्र पंडित, गार्गी रॉय, अमृता मिश्रा, अभय झा, फरहाद अरोरा, गुंजन जयस्वाल, रवी बनसोडे, किरण मोरे उपस्थित होते. तसेच धडक कामगार युनियन चे पदाधिकारी झुल्लूर यादव, नितीन तोरसकर, अमित सावंत, बबन आगडे, सिद्धार्थ राणे, निरज रावल, आणि मोहन जाधव उपस्थित होते.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page