मुंबईकरांच्या हितासाठी भाजपा कटिबद्ध; अमित साटम यांचा विरोधकांवर प्रहार
- dhadakkamgarunion0
- Dec 22, 2025
- 1 min read

🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
मुंबईकरांच्या हितासाठी भाजपा कटिबद्ध; अमित साटम यांचा विरोधकांवर प्रहार
● भाजपाचे नेते अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘आम्ही केवळ राजकारणाचा विचार करणारे लोक नाही, तर आम्हाला खऱ्या अर्थाने मुंबईची आणि मुंबईकरांची काळजी आहे,’ असे म्हणत साटम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साटम यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अमित साटम यांनी मुंबईच्या रखडलेल्या विकासकामांवरून ठाकरे गटाला धारेवर धरले. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत सत्ता उपभोगणाऱ्यांनी शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईतील रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेला त्यांनी ठाकरे बंधूंची राजकीय भूमिका जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आम्ही केवळ खुर्चीसाठी राजकारण करत नसून मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी म्हटले. भाजपाचे ध्येय हे केवळ निवडणूक जिंकणे नसून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवणे हे आहे. कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प आणि मुंबईतील सुशोभीकरण यांसारख्या कामांचा उल्लेख करत साटम यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments