मुंबई ‘भोंगेमुक्त’; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
- dhadakkamgarunion0
- Jul 14
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुंबई ‘भोंगेमुक्त’; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
● मुंबईतील १ हजार ६०८ धार्मिक स्थळांवरील भोंगे पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. त्यात १ हजार १४९ मशिदींचा समावेश आहे. त्यात ४८ मंदिरे, १० चर्च, ४ गुरुद्वारा तसेच १४८ इतर ठिकाणांचा देखील समावेश आहे. यामुळे मुंबई आता पूर्णपणे भोंगेमुक्त झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात १७५९ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले आहेत अशा प्रकारे आतापर्यंत ३ हजार ३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्याची कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सामंजस्याने सर्व कारवाई पूर्ण करण्यात आल्याबद्दल मुंबई पोलिसांचे फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. मात्र यानंतर जर कोणत्या धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लावण्यात आले तर संबंधित पोलीस ठाण्याच्या इन्चार्जला जबाबदार धरण्यात येईल असेही ते म्हणाले. राज्यातील ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी भरारीपथकाची देखील स्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments