मालवणच्या सर्वांगीण विकासाचा रवींद्र चव्हाण यांचा निर्धार
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
मालवणच्या सर्वांगीण विकासाचा रवींद्र चव्हाण यांचा निर्धार
● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मालवण शहराला एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार केला आहे. विशेषतः पर्यटन क्षेत्राला गती देऊन स्थानिक नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यावर त्यांनी भर दिला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने मालवणच्या विकासाला निधी आणि प्रकल्पांची कमतरता भासणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, देशात आणि राज्यात एकाच विचाराचे, म्हणजेच भाजपा-एनडीएचे सरकार असणे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर समन्वय असतो, तेव्हा विकासाचे प्रकल्प वेगाने पूर्ण होतात आणि निधी सहज उपलब्ध होतो. त्यामुळे मालवणकरांनी विकासासाठी 'कमळ' चिन्हाला मतदान करून, शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपाला शतप्रतिशत सत्ता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मालवण हे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. या शहराचा विकास करताना, येथील पर्यटन क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवले जाईल.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments