महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी जर्मन कंपन्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमंत्रण
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी जर्मन कंपन्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमंत्रण
● महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर्मनीतील उद्योजकांना आणि कंपन्यांना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी खास आमंत्रण दिले आहे. जागतिक परिषदेमध्ये आभासी माध्यमातून सहभागी होत त्यांनी भारत आणि जर्मनीचे संबंध अधिक दृढ करण्यावर तसेच महाराष्ट्राच्या दमदार आर्थिक प्रगतीवर सविस्तर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत झाले असून, जर्मनीने अभियांत्रिकी क्षेत्रात, तर भारताने ऊर्जा आणि जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांमध्ये सहकार्य वाढवले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि धोरणात्मक सुधारणांवर भर देत आहे. तसेच, राज्यात मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जात आहेत, ज्यामुळे कुशल मनुष्यबळ मोठ्या संख्येने उपलब्ध होत आहे. बंदरे, जहाज बांधणी, लॉजिस्टिक आणि उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. जर्मनीच्या सहकार्याने या संधींना आणखी चालना मिळेल आणि राज्याच्या विकासाला वेग येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)
Comments