महाराष्ट्रात अनधिकृत पुतळ्यांच्या उभारणीमुळे...
- dhadakkamgarunion0
- Apr 8
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्रात अनधिकृत पुतळ्यांच्या उभारणीमुळे गावगाड्यातील वर्चस्ववादाची लढाई तीव्र झाली आहे. सोशल मीडियावर वातावरण निर्मिती करून बाळ्या आवारेसारखे लोक मध्यरात्री पुतळे बसवतात, त्यातून दंगल, गुन्हे आणि धमक्या सुरू होतात. पुतळ्यांच्या कारखान्यातून महाग विक्री करून तो स्वतःला समाजसेवक दाखवतो, पण प्रत्यक्षात गावातील फुटीचा फायदा घेतो. चिखला, अंजनगाव, भूम यांसारख्या ठिकाणी पुतळ्यांवरून संघर्ष पेटला आणि समाजांना शिवद्रोही ठरवले गेले. यात वंजारी, दलित, धनगर, माळी आणि मुस्लिम समाज लक्ष्य झाले. पोलिसांनी आवारेला अटक केली असली तरी ही इकोसिस्टम नवनवीन कॉन्फ्लिक्ट निर्माण करत राहणार आहे. लोकांनी अशा प्रवृत्तीविरोधात संविधानिक मार्गाने लढा देत महापुरुषांचा आदर राखणे हेच खरे उत्तर आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या “आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल” या धमकीने मध्यपूर्वेतील तणाव अधिकच वाढवला आहे. अशा वक्तव्यांनी जागतिक शांततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. पश्चिम आशियातील संघर्ष आधीच धोकादायक पातळीवर पोहोचला आहे आणि ट्रम्प यांच्या अशा आक्रमक भाषणामुळे परिस्थिती आणखी अस्थिर होऊ शकते. अण्वस्त्रांचा उल्लेख किंवा संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी ही केवळ इराणपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण जगासाठी भयावह संदेश आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाने जबाबदार भूमिका घेणे आवश्यक आहे; कारण अशा वक्तव्यांमुळे मित्र राष्ट्रांमध्ये अस्वस्थता वाढते आणि विरोधकांना आक्रमकतेचे कारण मिळते. युद्धाच्या धमक्या देऊन सभ्यता वाचत नाही; उलट ती अधिक असुरक्षित होते. शब्द हे शस्त्रासारखे असतात ते वापरताना जबाबदारी आणि संयम आवश्यक आहे
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
खोटे आरोप केल्याबद्दल काँग्रेसचा प्रवक्ता पवन खेडा विरुद्ध आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या पत्नीने पवन खेडा विरुद्ध एफ आय आर दाखल केला असून आज आसाम पोलिसांकडून पवन खेडा च्या दिल्लीतील घराची झडतीही घेण्यात आली.त्या वेळी पवन खेडा घरात नव्हता मात्र त्याच्या घरी काही आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाल्याचे आसाम पोलिसांनी जाहीर केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुजरातच्या जनतेबद्दल आणि भाजप बद्दल काढलेल्या अनुद्गारांबद्दल त्यांच्या विरुद्ध एफ आय आर करण्याचा विचार गुजरात भाजपा करत आहे. महाराष्ट्र भाजपा आणि त्यांचे नेते मात्र शांतीब्रह्म असल्याने त्यांच्यावर काहीही आणि कितीही अभिरुचीहीन टीका झाली तरी ते त्यावर काहीही कारवाई करत नाहीत आणि त्यामुळे समाजकंटक मंडळींची हिंमत वाढते आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पश्चिम बंगालमधील मालदा येथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गेलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना १०-१२ तास ओलीस ठेवले जाणे, ही लोकशाहीसाठी अत्यंत लाजीरवाणी घटना आहे. खुद्द सरन्यायाधीशांना मध्यरात्री २ वाजेपर्यंत यावर लक्ष ठेवून कठोर निर्देश द्यावे लागले, यावरून परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होते. 'संविधान धोक्यात आहे' अशी ओरड करणारी तथाकथित सेक्युलर मंडळी आणि राजकीय नेते आज मालदा प्रकरणावर सोयीस्कर मौन बाळगून आहेत. हिंदू संघटनांच्या बाबतीत आरडाओरडा करणारे हे 'संविधानप्रेमी' विशिष्ट समुदायाच्या उन्मत्तपणावर चकार शब्दही काढत नाहीत. "बंगाल हे सर्वाधिक ध्रुवीकृत राज्य आहे," ही सरन्यायाधीशांची टिप्पणी म्हणजे व्होट बँकसाठी अराजकतेला खतपाणी घालणाऱ्यांच्या थोबाडीत लगावलेली सणसणीत चपराक आहे. न्यायव्यवस्थेची अडवणूक करणाऱ्या या प्रवृत्तीच खऱ्या अर्थाने संविधानासाठी सर्वात मोठा धोका आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पश्चिम बंगालात ममताविरुद्ध निवडणूक जिंकणे सोपं नाही. अनेक मतदानकेंद्रांवर ईव्हीएमसमोरच्या बटणाला अत्तर लावलं जातं, ज्यामुळे मतदार कोणाला मत दिलं हे बाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांना लगेच कळतं. अत्तराचा वास आला तर मतदार सुखात घरी जातो; वास नसेल तर त्याचं घरदार पेटवलं जातं, कुटुंब त्रासाला जातं. निकालानंतरच्या हिंसेच्या बातम्या वायरल होतात, पण अशा दबावाच्या घटना दाबून ठेवल्या जातात. विरोधी पक्षाला मत देणं म्हणजे थेट जीवावर बेतणं, म्हणून लोक घाबरतात. ही परिस्थिती दाखवते की ममताविरुद्ध उभं राहणं किती भयंकर आणि धोकादायक आहे. निवडणूक ही फक्त मतदानाची प्रक्रिया नसून, इथे ती भय आणि दडपशाहीची लढाई बनली आहे.
🔽
#PawanKhera #HimantaBiswaSarma #MallikarjunKharge #MamataBanerjee #DonaldTrump #MaharashtraPolitics #ConstitutionalValues #NuclearThreat #MiddleEastCrisis #PoliticalControversy #ConstitutionMatters #WestBengalPolitics #CongressvsBJP







Comments